Marathi govt jobs   »   Result   »   MPSC AMVI Result

MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI ) पूर्व परीक्षा 2020-21 निकाल | MPSC AMVI Result

MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI ) पूर्व परीक्षा 2020-21 निकाल | MPSC AMVI Result out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 15 मार्च, 2020 रोजी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) (पूर्व) परीक्षा 2020 चा निकाल दिनांक 24 ऑगस्ट, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निकाल तपासा: MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI ) पूर्व परीक्षा 2020-21 निकाल | MPSC AMVI Result 

MPSC AMVI Prelims 2020 Result out

MPSC AMVI Prelims 2020-21 Result out: MPSC ने AMVI निकाल 2021 पूर्व परीक्षेसाठी घोषित केला आहे आणि प्रीलिम परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. MPSC AMVI Prelims निकाल 2021 तपासण्यासाठी MPSC ने जाहीर केलेली बैठक क्रमांकाची यादी पाहता येईल. MPSC Assistant Motor Vehicle Inspector (AMVI) निकाल 2021 Result पाहण्यासाठी, लेखातील खाली दिलेली लिंक तपासा. सदर पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी व गुणांची सीमारेषा तुम्ही या पोस्ट मध्ये पाहू शकता.

MPSC AMVI निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC AMVI 2020-21 Prelims Result PDF Link

MPSC AMVI 2020-21 Prelims Result PDF Link: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 15 मार्च, 2020 रोजी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) (पूर्व) परीक्षा 2020 चा निकाल दिनांक 24 ऑगस्ट, 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून पात्र उमेदवारांची यादी खालील पडफ मध्ये पाहू शकता.

MPSC AMVI: List of Qualified Candidates | पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांचौ पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणा-या व परीक्षा शुल्क भरणा-या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. अशा तपासणीनुसार अपात्र ठरणाच्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. विचाराधीन पदाच्या खेळाडू आरक्षित पदाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या क्रिडाविषयक दाव्यांची/कागदपत्रांची वैधता तपासण्याच्या अधीन राहून मुख्य परीक्षेकरीता केवळ तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/ मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. व्दारे कळविण्यात येईल. त्यावेळी उमेदवाराने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या ऑनलाईन पध्दतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील.

MPSC AMVI 2020-21 Prelims Cut Off

MPSC AMVI 2020-21 Prelims Cut Off: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा – 2020-21 चे Cut Off (गुणांची सीमारेषा) तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

MPSC AMVI 2020-21 Prelims Cut Off/गुणांची सीमारेषा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

FAQs: MPSC AMVI Result 2021

Q1. MPSC AMVI 2020-21 प्रीलिम्स  निकाल लागला आहे का?

उत्तर होय, MPSC AMVI 2020-21 प्रीलिम्स निकाल 24 ऑगस्ट 2021 रोजी लागला आहे.

Q2. MPSC AMVI 2020-21 prelims चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC AMVI prelims 2021 निकाल तपासू शकतात.

Q3. MPSC AMVI 2020-21 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर MPSC AMVI 2020-21 चा निकाल 24 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC AMVI 2020-21 निकाल 2021 कधी जाहीर करेल?

उत्तर MPSC ने 24 ऑगस्ट 2021 रोजी MPSC AMVI 2020-21 निकाल 2021 जाहीर केला आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!