Table of Contents
Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams. In this article, you will get Maharashtra Current Affairs 2021 which helps in your upcoming all Competitive Exams
Maharashtra Current Affairs 2021 | |
Catagory | Current Affairs |
Article Name | Maharashtra Current Affairs 2021 |
Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams
Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job, Last One Year Imp Current Affairs for MPSC and Other Exams: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे, जर आपला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला या परीक्षांमध्ये सहज चांगले गुण मिळवता येतील. MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, MHADA भरती, जिल्हा परिषद भरती या सर्व पदांचा अभ्यासक्रम पाहिला असेल तर आपल्याला लक्षात येईल की, चालू घडामोडी किती महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या परीक्षेत महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर अधिक भर असतो. त्यामुळे चालू घडामोडी मध्ये महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीवर (Maharashtra Current Affairs 2021) परीक्षेत जास्त प्रश्न विचारल्या जातात. आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये Maharashtra Current Affairs 2021 वर नक्की प्रश्न येतील. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Adda247 मराठी महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर (Maharashtra Current Affairs 2021) एक लेखमलिका (Article Series) घेऊन येत आहे. आज या लेखात आपण 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी (Maharashtra Current Affairs 2021 Part 1) भाग 1 बघणार आहे.
Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job | 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी
Maharashtra Current Affairs 2021 for Govt Job: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर चालू घडामोडी महत्वाच्या आहेतच. सोबतच वर्तमान घडामोडींमध्ये बातम्या, माहिती, जागरुकता आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन यांचा समावेश असतो – हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज दैनिक चालू घडामोडी,साप्ताहिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न व आता 2021 मधील महाराष्ट्र्रातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी (Maharashtra Current Affairs 2021) घेऊन येत आहे. आज या Maharashtra Current Affairs 2021 Part 1 मध्ये जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 मधील आपण राज्य बातम्या (State News), नियुक्ती बातम्या (Appointment News), पर्यावरण बातम्या (Environment News) पाहणार आहे. ज्याचा फायदा आपणास नक्की होईल.
Maharashtra Current Affairs 2021 – State News (राज्य बातम्या)
1. महानगर पालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पध्दती लागू
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापि, कोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय?
- 1 सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदार एकाच उमेदवाराला मत देता येणार आहे. पण मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकतात. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करु शकतात. तर नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल.
महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकेत कशी आहे प्रभाग पद्धत:
- नागपूर: सध्या नागपुरात 37 प्रभाग आहेत. 36 प्रभागात प्रत्येकी चार सदस्य आहेत आणि 37व्या एका प्रभागात 3 सदस्य आहेत. 2022 च्या सुरुवातीला नागपूर महानगरपालिका निवडणूक होणार आहे.
- उस्मानाबाद: उस्मानाबाद महानगरपालिकामध्ये 19 प्रभाग आहेत. 18 प्रभागात प्रत्येक 2 सदस्य आहेत आणि 19 व्या प्रभागात 3 सदस्य आहेत. डिसेंबर 2021मध्ये निवडणूक होणार आहेत
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका 81 प्रभागात आत्तापर्यंत एक प्रभाग एक नगरसेवक अशा पद्धतीने निवडणूक झाली आहे.
- अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेची 2023 च्या डिसेंबरला निवडणूक आहे. सध्या अहमदनगर शहरात 17 प्रभाग असून 68 नगरसेवक आहेत प्रत्येक प्रभागात 4 सदस्य आहेत.
- परभणी: परभणीत 16 प्रभाग आहेत. 16 प्रभागात प्रत्येकी चार सदस्य आहेत. 64 नगरसेवकची महापालिका आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये महानगरपालिका निवडणूक होणार आहे.
2. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर
- महाराष्ट्र सरकारने आपले इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. वाढते प्रदुषण पाहता संभाव्य धोके डोळ्यासमोर ठेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे धोरण जाहीर केले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार यापुढे राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीस प्राधन्य देण्यात येईल. तसेच, 2025 पर्यंत महाराष्ट्रात जेवढी वाहने खरेदी केली जातील त्यात 10% वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिक व्याप्त स्वरुपात राबविले जाईल. इलेक्ट्रिक वाहन खरेदीस प्राधान्य मिळावे यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरांमध्ये 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे 25% विद्युतीकरण केले जाणार आहे.
- नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार जर एखाद्या ग्राहकाने इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार, इव्हीएस (EVs) वाहनासाठी 10%, दुचाकी (Two-Wheelers) वाहनांसाठी 20% तसेच, तीन आणि चार चाकी वाहनांच्या खरेदीसाठी 5% योगदान राज्य सरकाह देणार आहे. सरकारचे हे योगदान 2025 पर्यंत असणार आहे.
3. महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी 2015 ते 2018 या कालावधीत सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सहा आमदारांना उत्कृष्ट संसदपटू, तर इतर सहा आमदारांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे हे पुरस्कार दिले जातात.
उत्कृष्ट संसदपटू सन्मानित व्यक्ती (विधान परिषद)
- 2015-16 – अनिल परब
- 2016-17 – भाई गिरकर
- 2017-18 – संजय दत्त
उत्कृष्ट संसदपटू सन्मानित व्यक्ती (विधानसभा)
- 2015-16 – डॉ. अनिल बोंडे
- 2016-17 – सुभाष साबणे
- 2017-18 – राहुल कुल
उत्कृष्ट भाषण सन्मानित व्यक्ती (विधान परिषद)
- 2015-16 – अॅड. राहुल नार्वेकर
- 2016-17 – कपिल पाटील
- 2017-18 – प्रवीण दरेकर
उत्कृष्ट भाषण सन्मानित व्यक्ती (विधानसभा)
- 2015-16 – प्रा. श्रीमती वर्षा गायकवाड
- 2016-17 – राजेश टोपे
- 2017-18 – धैर्यशील माने
Maharashtra Current Affairs 2021 – Appointment News (नियुक्ती बातम्या)
4. मागासवर्गीय आयोगावर सदस्यांनी नियुक्ती
- उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्गीय आयोगावर नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांमध्ये डॉ. तायवाडे यांच्यासह अँड. चंदुलाल मेश्राम, डॉ. बालाजी भिल्लारीकर, डॉ. संजय सोनवणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. नीलिमा सराफ लखाडे, प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके आणि अलका राठोड यांचा समावेश आहे.
- महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 14 ऑगस्ट 2006 नुसार सन 2006 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 34 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती याव्यतिरिक्त इतर मागासवर्गीयाकरीता राज्यस्तरीय आयोग गठीत करण्यासाठी तरतुद करण्याकरीता आणि तत्संबंधीत किंवा तदनुषंगिक बाबींची तरतूद करण्याकरीता मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती.
5. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या.
- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे नवी जबाबदारी आली आहे. चाकणकर यांची अखेर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
- विजया रहाटकर यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून हे पद रिक्त होते.
6. न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ
- मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली राजभवन येथे दिनांक 19 ऑगस्ट 2021 झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.
- न्या एम एल तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपल्यापासून सदर पद रिक्त होते.
- 22 जून 1955 रोजी जन्मलेल्या न्या. कानडे यांनी सन 1979 साली मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. न्या. कानडे यांची दिनांक 12 ऑक्टोबर 2001 रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिनांक 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2015 या कालावधीत व त्यानंतर 15 जानेवारी ते 20 जानेवारी 2016 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते
Maharashtra Current Affairs 2021 – Environment News (पर्यावरण बातम्या)
7. राज्य सरकारने कांदळवन, प्रवाळ संवर्धनाचा निर्णय घेतला.
- राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन व प्रवाळ संवर्धन करण्याचा आणि परिसंस्थांवर आधारित उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी हरित पर्यावरण निधी (ग्रीन क्लायमेट फंड) च्या साहाय्याने प्रकल्प राबविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
- हा प्रकल्प सिंधुदुर्ग (देवगड, मालवण, वेंगुर्ला), रत्नागिरी (दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी), रायगड (श्रीवर्धन व अलिबाग) आणि पालघर (पालघर, डहाणू) या ठिकाणी राबविला जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रकल्प सुकाणू समिती नियुक्त करण्यात येईल.
- प्रकल्पाचा एकूण मंजूर आराखडा 130 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा असून त्यातील हरित पर्यावरण निधीचा हिस्सा 43.41 दशलक्ष डॉलर्स इतका राहणार आहे. महाराष्ट्र शासनास प्रकल्प व्यवस्थापनासाठी 2.11 दशलक्ष डॉलर्स व परिसंस्था पुन:स्थापन व उपजीविकाविषयक उपक्रमांसाठी 9 दशलक्ष डॉलर्स असे एकूण 11.43 दशलक्ष डॉलर्स इतके अनुदान प्राप्त होणार आहे. राज्य शासनाची सह आर्थिक बांधिलकी 19 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे रु 141 कोटी रुपये) इतकी आहे.
8. राज्यभरातील प्राचीन वृक्षांना संरक्षण
- राज्यातील शहरांमधील 50 वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या वृक्षांना ‘प्राचीन वृक्ष’ (हेरिटेज ट्री) असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतिकार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सुधारणांमध्ये वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण (कॉम्पेनसेटरी प्लँटेशन), मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चिती, वृक्ष गणना, वृक्ष लागवडीसाठी सामूहिक जमिनीची निश्चिती, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्ष संरक्षणासाठी पर्यायी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतुदी या ठळक बाबींचा समावेश आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लागणार आहे. शहरांमधील वाढत्या प्रदूषणाला आणि कार्बन उत्सर्जनाचे परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे,
9. विदर्भात नवीन व्याघ्र प्रकल्पाची सुरवात
- विदर्भात आता यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा वनविभागांतर्गत टिपेश्वर अभयारण्याचा विस्तार करण्यात येऊन नव्या व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे. सध्या विदर्भात मेळघाट, ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा असे पाच व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात आता या नवीन व्याघ्र प्रकल्पाचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
- टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत निसर्ग पर्यटन विकासासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राज्य योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. व्याघ्र प्रकल्प जाहीर केल्यानंतर त्याला बफर आणि इतर क्षेत्रही जाहीर करावे लागणार आहे.
10. ताडोबा अंधारी व्याघ‘ प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्यात आले.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या सतराव्या बैठकीत ताडोबा अंधारी व्याघ‘ प्रकल्पातील अंधारी अभयारण्य क्षेत्राचे विस्तारीकरण करणे आणि वाढ झालेले क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ‘ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे अंधारी अभयारण्याचे क्षेत्र 78.79 वर्ग किमीने वाढले आहे. अंधारी वन्यजीव अभयारण्य हे एकूण 509.27 वर्ग किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रातदेखील उत्तम वनाच्छादन असून, हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे उत्तरपूर्व वनक्षेत्रात वाघांचा चांगला वावर आहे त्यामुळे अभयारण्याचा एकूण 78.89 वर्ग किमी क्षेत्राने विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
11. ‘हेमिडॅक्टिलस’ पोटजातीच्या पालीच्या नव्या प्रजातीचा शोध
- पुण्यातील ताम्हिणी घाटातून हेमिडॅक्टिलस पालीच्या (Hemidactylus sail) नव्या प्रजातीची (A new species) नोंद घेण्यात आली. या नव्या प्रजातीचे वर्णन करणारे संशोधन ‘झुटाक्सा’ (journal Zutaxa) या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत (the international research journal) शुक्रवारी प्रसिद्ध झाले.
- पुण्यातील ताम्हिणी घाट आणि महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ात हेमिडॅक्टिलस पोटजातीच्या पालीची ही नवी प्रजाती सापडली आहे. ताम्हिणी घाटावरून या नव्या प्रजातीला ‘हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सीस’ (Hemidactylus tamhiniensis) असे नाव देण्यात आले आहे.
- सामान्यपणे ‘ताम्हिणी रॉक गेको’ (Tamhini Rock Gecko) किंवा ‘बेसॉल्ट रॉक गेको’ (Basalt Rock Gecko) म्हणून ओळखली जाते. ‘ताम्हिणी रॉक गेको’ ही सर्वांत मोठय़ा भारतीय हेमिडॅक्टिलस गेको (पाल) (Indian hemidactylus geckos sails) पैकी एक आहे.
Importance of Daily Current Affairs in Marathi
Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
See Also
FAQs Maharashtra Current Affairs 2021
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. महाराष्ट्र चालू घडामोडी 2021 मला कुठे पाहायला मिळेल?
Ans.महाराष्ट्र चालू घडामोडी 2021 आपणास Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईट आणि अॅउ वर वाचायला मिळेल.
Q4. Adda247 मराठी मला कोणकोणत्या स्वरुपात मला चालू घडामोडी देत असते.?
Ans. Adda247 मराठी आपणास दैनिक. साप्ताहिक व मासिक घडामोडी पुरवत असते. त्या सर्वांच्या लिंक वर दिलेल्या आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो