Last Minute Revision & Tips for MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे | Revision Material for MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21, उद्या म्हणजेच 4 सप्टेंबर 2021 रोजी घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व तयारीची चाचणी उद्या घेतली जाईल आणि त्यांना त्यांच्या कार्यक्षम मेहनतीचे फळही मिळेल. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे ज्याणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. या लेखात आपण पाहुयात; Last Minute Revision & Tips for MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे.
MPSC Group B Combine Preliminary Examination 2020-21: Last Minute Revision | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 04 सप्टेंबर 2021, रविवार रोजी राज्यातील विविध केंद्रांवर MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 घेण्यात येणार आहे. आताचा काळ हा उजळणीचा काळ आहे. आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्स ची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते.
पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते मुद्दे निवडायचे आणि कोणते सोडायचे. या दुविधेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ADDA 247-मराठी च्या टीम ने केलेल्या मागील वर्षांच्या प्रशपत्रिकेच्या सखोल विश्लेषणातून आम्ही महत्त्वाच्या विषयातून काही अतिमहत्त्वाचे मुद्दे काढले आहेत ज्याची जास्तीतजास्त उजळणी तुम्हाला MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. त्याचप्रमाणे आम्ही काही विषयांवर लेख समाविष्ट केले आहेत जे आपण आपल्या उजळणीसाठी वापरू शकता.
Important Topic list for Revision | MPSC उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
MPSC Combine Prelims Exam 2020-21: Important Topic List for Revision | उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे: मागील वर्षांच्या प्रशपत्रिकेच्या सखोल विश्लेषणातून आम्ही महत्त्वाच्या विषयातून काही अतिमहत्त्वाचे मुद्दे काढले आहेत ज्याची सामुर्ण लिस्ट खाली दिलेली आहे. या मुद्यांची उजळणी करून आपली बाजू बळकट करा.
अनु.क्र. | विषयाचे नाव | उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे |
01 | भूगोल (भारत+महाराष्ट्र) |
1. महाराष्ट्र नद्या 2. महाराष्ट्र प्राकृतिक व राजकीय भूगोल 3. महाराष्ट्राची नदीप्रणाली 4. महाराष्ट्रातील महत्त्वाचे विद्युत प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प 5. महाराष्ट्राची खनिजसंपत्ती 6. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 7. भारताचा प्राकृतिक भूगोल आणि सीमारेषा |
02 | इतिहास (भारत+महाराष्ट्र) |
1. महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य 2. वृत्तपत्रे (महाराष्ट्र आणि भारत) 3. 1857 चा उठाव 4. राजकीय व सामाजिक संस्था – स्थापना आणि संस्थापक 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची अधिवेशने (1885 ते 1947) 6. महत्त्वाचे कायदे – 1773 ते 1935 7. क्रांतिकारी चळवळ (भारत व महाराष्ट्र) |
03 | अर्थव्यवस्था |
1. सार्वजनिक वित्त 2. बेरोजगारी व दारिद्र्य 3. राष्ट्रीय उत्पन्न 4.बँकिंग: इतिहास व चालू घडामोडी 5. शासकीय योजना: भारत + महाराष्ट्र 6. परकीय व्यापार |
04 | भारतीय राज्यघटना |
1. संसद 2. पंचायत राज 3. संविधानाचे स्त्रोत 4. संविधान निर्मिती 5. राज्यपाल 6. आणीबाणी 7. राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे 8. संविधानातील परिशिष्ट |
05 | सामान्य विज्ञान |
1. प्राणी वर्गीकरण 2. वनस्पती वर्गीकरण 3. मानवी रोग व पोषण व्यवस्था 4. मानवी पंचनसंस्था 5. प्रकाश, भिंग, मानवी डोळा 6. ध्वनी |
06 | चालू घडामोडी |
1. संरक्षण बातम्या 2. आर्थिक बातम्या 3. निधन बातम्या 4. पुस्तके आणि लेखक बातम्या 5. क्रीडा बातम्या 6. पुरस्कार 7. शासकीय योजना |
07 | गणित व बुद्धिमत्ता चाचणी |
1. बैठक व्यवस्था 2. आकृत्या (सिरीज) 3. संख्यामालिका आणि अक्षरमालिका 4. विधाने – निष्कर्ष, कृती, गृहीतक (निर्णयक्षमता) 5. सरासरी 6. काळ-काम-वेग 7. वयवारी 8. खरे-खोटे |
Important Blogs for Quick Revision | उजळणीसाठी महत्वाचे Blogs
Last-Minute Tips for MPSC Combin Prelims Exam 2021
- प्रत्येक विषयाची संपूर्ण उजळणी करा आणि कोणताही महत्त्वाचा विषय Skip केलेला नाही याची खात्री करा.
- कोणत्याही नवीन विषयाची सुरुवात करू नका कारण नवीन विषयांच्या पूर्ण तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही, तुम्ही आधीच Cover केलेल्या विषयांची उजळणी करा.
- उमेदवारांना ताण आणि कोणत्याही प्रकारचे मानसिक दबाव घेऊ नये
- उमेदवारांनी सुरक्षित राहणे आणि आपल्या देशात चालू असलेल्या साथीच्या रोगामुळे परीक्षेपूर्वी बाहेर जाणे टाळणे आवश्यक आहे
- परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- कोविडमुळे सुरक्षा उपायांसाठी Mask, Gloves आणि Sanitiser Bottle असणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या वेळी आपले मन ताजे आणि सक्रिय ठेवण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेच्या एक दिवस आधी योग्य झोप घेणे आवश्यक आहे.
- परीक्षेदरम्यान एका प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवू नका. जर विद्यार्थी एका प्रश्नावर अडकले असतील तर तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे जा, ज्याणेकरुन आपला वेळ Difficult प्रश्नामुळे वाया जाणार नाही.
- शांत, एकाग्र आणि आत्मविश्वास ठेवा, यामुळे परीक्षेदरम्यान तुमची कामगिरी नक्कीच वाढेल.
Adda247 मराठी च्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…
तुम्ही या परीक्षेसाठी खूप मेहनत केली आहे, म्हणून तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा! Best of Luck!!

—————————————————————————————-
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
