सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   Classification of Living Organisms Part 2...

सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी | Classification of Living Organisms Part 2 – Animals

सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी | Classification of Living Organisms Part 2 – Animals | Revision Material for MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. या लेखात आपण पाहुयात; Classification of Living Organisms | सजीवांचे वर्गीकरण.

संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र

Classification of Living Organisms (Animals)

Classification of Living Organisms (Animals)  | सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी: MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे; Classification of Living Organisms (Animals)  | सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी.

सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती | Classification of Living Organisms Part 1-Microorganisms and Plants

Classification of Living Organisms-Animals  | सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी

सभोवताली असणाऱ्या करोडो सजीवांचा एकत्रित अभ्यास करणे व तो लक्षात ठेवणे हे अत्यंत अवघड असते. यासाठी विविध शास्त्रज्ञांनी सजीवांचे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास केला. रॉबर्ट व्हिटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ यांनी 1969 साली सजीवांची 5 गटांत विभागणी केली. त्यानुसार या लेखात आपण प्राणी वर्गीकरण पाहणार आहोत. राज्यसेवेच्या सर्वच परीक्षांना हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो. विषेशत: गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेत या टॉपिक वर दरवर्षी कमीतकमी 2 प्रश्न विचारले जातात.

प्राणी वर्गीकरणाचा इतिहास | History of Animal Classification

अ‍ॅरिस्टॉटल – सर्वात पहिल्यांदा प्राणी वर्गीकरण केले. प्राण्यांच्या शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी अधिवास या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण.

प्राणी वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धती:- अ‍ॅरिस्टॉटल, थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनिअस

उत्क्रांतीवादावर आधारित वर्गीकरण:-  डॉब्झन्स्की, मेयर, कार्ल वूज

प्राणी वर्गीकरणाची पारंपारिक पद्धती | Traditional Method of Animal Classification

 1. असमपृष्ठरज्जू प्राणी (Non-Chordates)
 • पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक नसतो.
 • ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात
 • चेतारज्जू (Nerve cord) असेल तर युग्मांगी, भरीव, आणि शरीराच्या अधीर बाजूस असते.
 • हृद्य असेल तर शरीराच्या पृष्ठ बाजूस असते.

2. समपृष्ठरज्जू प्राणी (Chordates)

 • शरीरामध्ये पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक असतो.
 • श्वसनासाठी कल्लविदरे (Gill Slits) किंवा फुफ्फुसे असतात
 • एकच चेतारज्जू असतो
 • हृद्य शरीराच्या अधर बाजूस असते

वरील पद्धतीनुसार प्राणीसृष्टीचे वर्गीकरण;

सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_50.1
प्राणीसृष्टी वर्गीकरण

रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे | Parameters of Modern Method of Animal Classification

a) रचनात्मक संघटन (Grades of Organization)

 • एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जीवनद्रव्य -स्तर (Protoplasmic grade) प्रकारचे असते. उदा.अमिबा
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_60.1
जीवनद्रव्य -स्तर (Protoplasmic grade)
 • बहुपेशीय पण ऊती नसलेल्या प्राण्यांचे शरीराचे संघटन पेशीस्तर (Cellular grade Organization) प्रकारचे असते. उदा. रंध्रीय प्राणी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_70.1
पेशीस्तर (Cellular grade Organization)
 • पेशी एकत्र येऊन ऊती तयार झाल्या असल्यास पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue grade Organization) असते. उदा. नीडारिया संघ
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_80.1
पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-Tissue grade Organization)
 • ऊती एकत्र येऊन अवयव तयार झाले असल्यास ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue -Organ grade Organization) असते. उदा. चपट्या कृमी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_90.1
ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue -Organ grade Organization)
 • अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार झाल्यास (Organ System grade Organization) असते. उदा. मानव, कुत्रा इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_100.1
अवयव संस्था (Organ System grade Organization)

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे) | Important Rivers in Maharashtra

b) शारीरिक सममिती (Body Symmetry)

 • असममित शरीर (Asymmetrical body) – उदा. अमिबा, पॅरामेशियम, काही प्रकारचे स्पंज
 • अरिय सममिती (Radial Symmetry )- उदा. तारामासा
 • द्विपार्श्व सममिती (Bilateral symmetry) – उदा. मासे, बेडूक, पक्षी, मानव

c) आद्यस्तर/ जननस्तर (Germinal layers) 

 • द्वीस्तरीय (Diploblastic) – फक्त बहिर्जनस्तर (Ectoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm) तयार होतात.
 • त्रिस्तरीय (triploblastic) – बहिर्जनस्तर (Ectoderm) आणि अंतर्जनस्तर (Endoderm) सोबत मध्यस्तर (Mesoderm) तयार होतात

d) देहगुहा (Body Cavity)

 • सत्य देहगुहा (Eucoelomate) – उदा. रंध्रीय प्राणी, निडारिया संघ
 • देहगुहाहीन (Acoelomate) – उदा. चपट्या कृमींचा संघ
 • खोटी / फसवी देहगुहा (Pseudocoelomate) – उदा. गोल कृमी संघ
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_110.1
देहगुहे वरून प्रकार

e) खंडीभवन (Body Segmentation)

 • शरीर छोट्या-छोट्या समान भागांत विभागलेले असेल अशा शरीराला (खंडीभवीत शरीर (Segmented body) म्हणतात.
 • प्रत्येक छोट्या भागाला खंड (Segment) म्हणतात. उदा. वलयी प्राणीसंघातील गांडूळ

महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली | River System in Konkan Region of Maharashtra

प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण | Modern Classification of Animals

1. रंध्रीय प्राणीसंघ (Phylum – Porifera):

 • सर्वात साध्या प्रकारची शरीररचना (स्पंज)
 • शरीरावर असंख्य छिद्रे असतात. (ऑस्टीया-पाणी शरीरात घेणे आणि ऑस्कुला- पाणी शरीराबाहेर सोडणे)
 • जलवासी प्राणी
 • असममित शरीर
 • कॉलर पेशींच्या मदतीने शरीरात पाण्याचे वहन होते
 • प्रचलन करत नाही (स्थानबद्ध प्राणी)
 • शरीरास कंटीकांचा / शुकीकांचा / स्पॉंजिन चा आधार असतो
 • कंटीका कॅल्शियम कार्बोनेट / सिलीकाच्या असतात
 • प्रजनन अलैंगिक (मुकुलायन) / लैंगिक पद्धतीने
 • उदा. सायकॉन, यूस्पॉंजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा इत्यादी.
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_120.1
रंध्रीय प्राणीसंघ (Phylum – Porifera):

2. सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum – Coelenterata / Cnidaria)

 • शरीराचा आकार दंडाकृती असेल तर – बहुशुंडक (Polyp) म्हणतात आणि छत्रीच्या आकाराचा असेल तर छत्रिक (Medusa) म्हणतात
 • बहुतेक समुद्रात आढळतात
 • शरीर – अरिय सममित व द्विस्तरीय
 • मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (Tentacles) असतात – भक्ष पकडण्यासाठी उपयोग
 • उदा. जलव्याल (Hydra), सी-अ‍ॅनिमोन, पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर, प्रवाळ (Corals)
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_130.1
सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum – Coelenterata / Cnidaria)

3. चपट्या कृमींचा प्राणीसंघ (Phylum – Platyhelminthes)

 • शरीर पातळ / पट्टी सारखे चपटी असते
 • बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात
 • देहगुहाहीन आणि द्वीपार्श्व सममित शरीर
 • त्रिस्तरीय असतात
 • प्राणी उभयलिंगी (Hermaphrodite) असतात
 • उदा. प्लॅनेरिया लिव्हरफ्लूक, पट्टकृमी इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_140.1
चपट्या कृमींचा प्राणीसंघ (Phylum – Platyhelminthes)

4. गोलकृमी प्राणीसंघ (Phylum – Aschelminthes)

 • लांबट, बारीक धाग्यासारखे / दंडगोलाकार शरीर
 • स्वतंत्र राहणारे / अंत:परजीवी असतात
 • जलीय / भूचर असतात
 • त्रिस्तरीय शरीर असते
 • आभासी देहगुहा
 • शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते
 • एकलिंगी असतात
 • उदा. पोटातील जंत, डोळ्यातील जंत, हत्ती पाय रोगाचे जंत इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_150.1
गोलकृमी प्राणीसंघ (Phylum – Aschelminthes)

5. वलीय प्राणीसंघ (Phylum – Annelida)

 • लांबट, दंडाकृती शरीर
 • कायखंड खंडीभवन (Metameric Segmentation) आढळते
 • बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात
 • काही प्राणी बाह्यपरजीवी असतात
 • प्राणी समुद्रीय / गोड्या पाण्यात किंवा भूचर असतात
 • त्रिस्तरीय, द्वीपार्श्व सममित आणि सत्य-देहगुहा असते
 • प्रचलन होण्यासाठी दृढरोम, परपाद किंवा चूषक यांसारखे अवयव असतात
 • सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते
 • उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात
 • उदा. गांडुळ, जळू, नेरीस इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_160.1
वलीय प्राणीसंघ (Phylum – Annelida)

6. संधीपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda)

 • छोट्या-छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात
 • संख्येने सर्वात मोठा आणि सर्व प्रकारे यशस्वी झालेला प्राणीसंघ
 • सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात
 • शरीर त्रिस्तरीय, सत्य-देहगुहा युक्त, द्वीपार्श्व सममित आणि खंडीभूत असते
 • शरीराभोवती कायटीन युक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते
 • एकलिंगी प्राणी
 • उदा. खेकडा, कोळी, विंचू, झुरळ इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_170.1
संधीपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda)

7. मृदुकाय प्रणीसंघ (Phylum – Mollusca)

 • शरीर मऊ, बुळबुळीत असते
 • प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ
 • जलचर किंवा भूचर असतात
 • शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते
 • द्वीपार्श्व सममित शरीर (अपवाद – गोगलगाय)
 • शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती असे विभागले असते
 • आंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असते
 • उदा. कालव, गोगलगाय, ऑक्टोपस, शिंपले इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_180.1
मृदुकाय प्रणीसंघ (Phylum – Mollusca)

8. कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum – Echinodermata)

 • त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेट चे काटे असतात
 • फक्त समुद्रातच आढळतात
 • शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त असते.
 • प्रौढांमध्ये पंच-अरिय सममिती आढळते
 • नलिकापादच्या साहय्याने प्रचलन करणे आणि अन्न पकडणे
 • काही प्राणी स्थानबद्ध असतात
 • कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकिंचे किंवा पट्टीचे असते
 • चांगली पुनर्निनिर्मिती क्षमता
 • उदा. तारा मासा, सी-अर्चीन, ब्रीटलस्टार,सी-ककुंबर इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_190.1
कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum – Echinodermata)

9. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum – Hemichordate)

 • प्राण्यांचे शरीर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड असे विभागलेले असते
 • फक्त शुंडामधेच पृष्ठरज्जू असतो म्हणून अर्धसमपृष्ठरज्जू / अ‍ॅकॉनकृमी म्हणतात
 • सागरनिवासी असतात
 • वाळूत बिळे करून राहतात
 • श्वसनासाठी एक / अनेक कल्लविदरे असतात
 • एकलिंगी / उभयलिंगी असतात
 • उदा. बॅलॅनोग्लॉसस (समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी यांच्यातील दुवा), सॅकग्लॉसस इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_200.1
अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum – Hemichordate)

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) | Important rivers in Maharashtra

10. समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum – Chordata)

 • आधार देणारा पृष्ठरज्जू असतो
 • विकासाच्या कोणत्यातरी अवस्थेत ग्रसनी-कल्लविदरे असतात
 • चेतारज्जू एकाच असून पृष्ठ बाजूस नळीसारखा असतो
 • हृदय अधर बाजूस असते

10.1 उपसंघ पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी / कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी (Urochordata)

 • सागरनिवासी
 • शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते
 • अळ्या स्वंतंत्र पणे पोहणाऱ्या असतात
 • फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो म्हणून पुच्छसमपृष्ठरज्जू म्हणतात
 • सामान्यपणे उभयलिंगी असतात
 • उदा. हर्डमानिया, डोलिओलम इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_210.1
उपसंघ पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी / कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी (Urochordata)

10.2 उपसंघ शीर्षसमपृष्ठरज्जू प्राणी (Cephalochordata)

 • लहान माशाच्या आकाराचे आणि सागरनिवासी प्राणी
 • पृष्ठरज्जू शरीराच्या लांबीइतका असतो
 • ग्रसनी मोठी असून तिला कल्लविदरे असतात
 • एकलिंगी प्राणी
 • उदा. अ‍ॅम्फीऑक्सस
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_220.1
उपसंघ शीर्षसमपृष्ठरज्जू प्राणी (Cephalochordata)

10.3 पृष्ठवंशीय प्राणी (Vertebrata / Craniata)

 • पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याजागी पाठीचा कणा असतो
 • शीर पूर्ण विकसित झालेले असते
 • मेंदू कवटीत असतो
 • अंत:कंकाल कास्ठीमय किंवा अस्थिमय असते
 • काही जबडेविरहीत असतात तर काही प्राण्यांना जबडे असतात

पृष्ठवंशीय प्राणी उपसंघ सहा वर्गात विभागला गेला आहे

a) चक्रमुखी प्राणीवर्ग (Class – Cyclostomata)

 • जबडेविरहीत चूषीमुख असते
 • त्वचा मृदू व खवलेविरहीत असते
 • युग्मित उपांगे नसतात
 • अंत:कंकाल कास्ठीमय असते
 • बहुतेक प्राणी बाह्यपरजीवी असतात
 • उदा. पेट्रोमायझॉन, मिक्झीन इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_230.1
चक्रमुखी प्राणीवर्ग (Class – Cyclostomata)

b) मत्स्य प्राणीवर्ग (Class – Pieces)

 • शीतरक्ती प्राणी
 • समुद्राच्या किंवा गोड्या पाण्यात आढळतात
 • शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते
 • पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात
 • पुच्छ पराचा उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो
 • बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरुपात असते
 • अंत:कंकाल कास्ठीमय किंवा अस्थिमय असते
 • उदा. रोहू, पापलेट,शार्क इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_240.1
मत्स्य प्राणीवर्ग (Class – Pieces)

c) उभयचर प्राणीवर्ग (Class – Amphibia)

 • डिंब अवस्थेत पाण्यात राहून जलीय श्वसन करतात
 • प्रौढावस्थेत जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकतात
 • उपांगांच्या दोन जोड्या असतात
 • अंगुलीना नखे नसतात
 • बाह्यकंकाल नसते
 • त्वचा मृदू असून श्वसनासाठी ओलसर असते
 • बाह्यकर्ण नसतो तर कर्णपटल असते
 • मान नसते
 • उदा. बेडूक, टोड इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_250.1
उभयचर प्राणीवर्ग (Class – Amphibia)

d) सरीसृप प्राणीवर्ग (Class – Reptilia)

 • पूर्णपणे भूचर होऊन पहिले सरपटणारे प्राणी
 • शीतरक्ती असतात
 • त्वचा कोरडी व खवलेयुक्त असते
 • शरीर व धड यांच्यामध्ये मान असते
 • बाह्यकर्ण नसतो
 • अंगुलीना नखे असतात
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_260.1
सरीसृप प्राणीवर्ग (Class – Reptilia)

e) पक्षीवर्ग (Class – Aves)

 • कशेरूस्तंभयुक्त प्राणी
 • उष्णरक्ती असतात
 • शरीराचे तापमान स्थीर राखू शकतात
 • शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते
 • अग्रउपांगे पंखात परावर्तीत झालेले असतात
 • अंगुलीना नखे नसतात
 • बाह्यकंकाल पिसांच्या स्वरुपात असते
 • मान असते
 • जबड्याचे रुपांतर चोचीत झालेले असते
 • उदा. मोर, पोपट, बदक इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_270.1
पक्षीवर्ग (Class – Aves)

f) सस्तन प्राणीवर्ग (Class – Mammalia)

 • दुध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात
 • उष्णरक्ती प्राणी
 • डोके, मान, धड इत्यादी अवयव असतात
 • अंगुलीना नखे, खुर इत्यादी असतात
 • बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरुपात असते
 • उदा. मानव, कांगारू, डॉल्फिन इत्यादी
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_280.1
सस्तन प्राणीवर्ग (Class – Mammalia)

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

सजीवांचे वर्गीकरण भाग 2 - प्राणी | Classification of Living Organisms Part 2- Animals_290.1
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?