Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज...

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिली?

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिली?

तलाठी भरती 2023 दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत पेपर घेण्यात आले. आपल्याला माहीतच आहे की, तलाठी भरती 2023 साठी एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते. पण त्यातील एकूण 8,64,960 उमेदवारांनी म्हणजेच 83.03 टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. याबाबत एक अधिकृत परिपत्रक जाहीर झाले आहे. सोबतच तलाठी भरती 2023 बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय संख्या जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी तलाठी भरती 2023 साठी आत्तापर्यंत जिल्ह्यानुसार किती अर्ज प्राप्त झाले याविषयी माहिती उघड झाली होती. तलाठी भरती 2023 साठी साठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि किती उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यावरून आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती प्राप्त होते. आज या लेखात आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले: विहंगावलोकन 

प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत तलाठी भरती 2023 साठी एकूण 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली असून तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले व किती उमेदवारांनी परीक्षा दिली याबद्दल थोडक्यात माहिती या लेखात देण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले व किती उमेदवारांनी परीक्षा दिली: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657
लेखाचे नाव तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले?
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या 8,64,960
एकूण अर्ज प्राप्त 10,41,713
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती 2023 ची परीक्षा किती उमेदवारांनी दिली?

तलाठी भरती 2023 ची परीक्षा एकूण 8,64,960 उमेदवारांनी दिली आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक महसूल विभागाद्वारे जाहीर झाले आहे. 19 दिवसात एकूण 57 शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आली. तलाठी भरती 2023 करिता उपस्थित उमेदवारांची आकडेवारी तारीख व शिफ्टनुसार खाली देण्यात आली आहे.

अ. क्र तारीख आणि शिफ्ट एकूण उमेदवार हजर उमेदवार शिफ्टनुसार हजर उमेदवारांची टक्केवारी
दररोज उमेदवारांची उपस्थिती
(% मध्ये)
1 17 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 15126 9922 65.60%
75.26
2 17 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 15126 11989 79.26%
3 17 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 15126 12242 80.93%
4 18 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 17117 13443 78.54%
79.95
5 18 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 17117 13785 80.53%
6 18 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 17047 13769 80.77%
7 19 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 17244 14089 81.70%
83.33
8 19 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 17244 14509 84.14%
9 19 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 17586 14795 84.13%
10 20 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 24168 20086 83.11%
84.11
11 20 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 24088 20392 84.66%
12 20 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 22892 19362 84.58%
13 21 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 17456 14834 84.98%
85.72
14 21 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 17456 15008 85.98%
15 21 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 17386 14990 86.22%
16 22 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 17406 14479 83.18%
84.51
17 22 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 17406 14812 85.10%
18 22 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 17336 14781 85.26%
19 26 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 15769 13202 83.72%
84.73
20 26 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 15553 13200 84.87%
21 26 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 16156 13824 85.57%
22 27 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 16126 13600 84.34%
84.95
23 27 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 14319 12235 85.45%
24 27 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 15204 12943 85.13%
25 28 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 18997 15914 83.77%
84.37
26 28 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 19102 16129 84.44%
27 28 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 19932 16919 84.88%
28 29 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 21436 17937 83.68%
84.32
29 29 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 22132 18708 84.53%
30 29 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 22355 18939 84.72%
31 31 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 1 21912 18158 82.87%
83.59
32 31 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 2 22469 18907 84.15%
33 31 ऑगस्ट 2023 – शिफ्ट 3 22469 18814 83.73%
34 01 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 21426 17605 82.17%
83.36
35 01 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 21426 18045 84.22%
36 01 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 21426 17933 83.70%
37 04 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 20761 16808 80.96%
82.3
38 04 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 20767 17228 82.96%
39 04 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 20761 17225 82.97%
40 05 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 20161 16446 81.57%
82.6
41 05 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 20161 16760 83.13%
42 05 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 20161 16753 83.10%
43 06 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 18632 15316 82.20%
83.15
44 06 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 18633 15595 83.70%
45 06 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 18538 15491 83.56%
46 08 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 16499 13275 80.46%
81.53
47 08 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 16549 13634 82.39%
48 08 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 16529 13512 81.75%
49 10 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 14344 11863 82.70% 83.81
50 10 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 17590 14887 84.63%
51 10 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 17812 14940 83.88%
52 13 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 15012 12106 80.64%
81.89
53 13 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 15461 12701 82.15%
54 13 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 15179 12578 82.86%
55 14 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 1 15209 12359 81.26%
82.28
56 14 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 2 15209 12620 82.98%
57 14 सप्टेंबर 2023 – शिफ्ट 3 15209 12564 82.61%
एकूण 1041713 864960 83.03%

तलाठी भरती 2023 करिता उपस्थित उमेदवारांची आकडेवारी PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरती 2023 करिता उपस्थित उमेदवारांची आकडेवारी PDF

तलाठी भरती 2023 बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय संख्या

महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय बाबतचे प्रपत्र जाहीर करण्यात आले आहे. यात कोणत्या संवर्गातील किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय प्रपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरती 2023 बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय प्रपत्र

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले?

महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली होती. त्यासाठी विविध जिल्ह्यातील तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली होती.

महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तलाठी पद महसूल विभागात सर्वांत तळाचे आहे. रिक्त पदांची संख्या 4644 आहे. त्यासाठी एकूण 10,41,713 अर्ज आले आहेत. 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत दररोज 50 ते 60 हजार उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून तलाठी भरती 2023 ची परीक्षा 20 दिवस चालणार असल्याची माहिती होती.  तलाठी भरती 2023 साठी जिल्ह्यानुसार किती अर्ज प्राप्त झाले याची माहिती खाली देण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त हे पाहणे का गरजेचे आहे?

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले याबद्दल माहिती मिळवणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला स्पर्धा किती आहे. आपली अभ्यासाची तयारी कशापद्धतीने करावी करावी याबद्दल माहिती मिळते. तलाठी भरती 2023 साठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या जाणून घेतल्यामुळे उमेदवारांना परीक्षेशी संबंधित स्पर्धेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते ज्यामुळे अर्जदारांना त्यानुसार त्यांच्या तयारीचे नियोजन आणि धोरण तयार करण्यास मदत होते.

जिल्ह्यानुसार तलाठी भरती 2023 साठी प्राप्त अर्जाची संख्या

जिल्ह्यानुसार तलाठी भरती 2023 साठी प्राप्त अर्जांची संख्या खाली देण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिली?_3.1
जिल्ह्यानुसार तलाठी भरती 2023 साठी प्राप्त अर्जाची संख्या

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम
तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कटऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिली?_5.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

तलाठी भरती 2023 ची परीक्षा किती उमेदवारांनी दिली?

तलाठी भरती 2023 ची परीक्षा 8,64,960 एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली.

तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले?

प्राप्त माहितीनुसार तलाठी भरती 2023 साठी एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते.

तलाठी भरती 2023 अंतर्गत एकूण किती पदांची भरती होणार आहे?

तलाठी भरती 2023 एकूण 4644 तलाठी पदांची भरती होणार आहे.