Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
Title | अँप लिंक | वेब लिंक |
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | लिंक | लिंक |
कामगार चळवळीचे जनक – नारायण मेघाजी लोखंडे
- कामगार चळवळीचे अग्रदूत नारायण लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये ठाणे येथे झाला.
- त्यांचे मूळ गाव पुणे जिल्हातील खेड तालुक्यातील कन्हेरसर होते.
- त्यांनी १८७० पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली.
- ‘दीनबंधू’ वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न, दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला.
- बॉम्बे मिल ओनर्स असोशिएशन कोणतेही नियम पाळत नसत.
- त्यामुळे श्री. लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी चळवळ हाती घेतली.
- सरकारने 1881 मध्ये फॅक्टरी अॅक्ट पास केला.
- त्यातील तरतुदी संदर्भात श्री. लोखंडे यांनी टिका केली.
- कामगारांच्या हितासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिलहँडस असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली.
- 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा मुंबईतील परळ येथे घेतली. त्यावेळी चार हजार कामगार हजर होते.
- फॅकटरी कमिशनचे अध्यक्ष डब्ल्यू. बी. मूलक यांना कामगारांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
- २४ एप्रिल १८९० रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर १० हजार कामगारांची सभा झाली. यावेळी कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली.
- १० जून १८९० रोजी गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली.
- हा कामगार चळवळीचा मोठा विजय मानला जातो.
- श्री. नारायण लोखंडे यांनी हिंदू-मुस्लिम दंग्यावेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहाद्दूर’ हा किताब दिला. तसेच ‘जस्टिस ऑफ पीस’ या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- प्लेगच्या आजाराने १८९७ मध्ये श्री. नारायण लोखंडे यांचे निधन झाले.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series
टॉपिक | संदर्भ | अँप लिंक | वेब लिंक |
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
राजकीय पक्ष | 10 वी इतिहास व राज्यशास्त्र | लिंक | लिंक |
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
वनस्पतींचे वर्गीकरण | 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान | लिंक | लिंक |
भारतातील नद्या | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | 8 वी इतिहास | लिंक | लिंक |
परिचय शास्त्रज्ञांचा | 9 वी व 10 वी विज्ञान | लिंक | लिंक |
स्त्रीवादी इतिहास लेखन | 10 वी इतिहास | लिंक | लिंक |
हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ | 12 वी पर्यावरण | लिंक | लिंक |