Marathi govt jobs   »   Study Materials   »   वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव

वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | Uprising of Vasudev Balwant Phadke : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?

सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे.  ज्याद्वारे  तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.

वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | Uprising of Vasudev Balwant Phadke

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते.
  • इ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रज विरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो वासुदेव बळवंत फड़के यांचा होता.
  • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ ला कुलाबा जिल्हयातील शिरढोण येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
  • पेशवाईत पनवेल जवळच्या कर्नाळा किल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती.
  • प्रथम ते रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले. त्यानंतर लष्करी खात्यात लेखाविभागात नोकरीस लागले. या नोकरीमुळे ते आईच्या अंत्यविधीस पोहच शकले नाही.
  • फडके यांच्यावर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता.
  • १८७३ मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली.
  • समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी ‘ऐक्यवर्धिनी संस्था’ सुरू केळी.
  • पुण्यामध्ये १८७४ मध्ये ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्युशन’ ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
  • लॉर्ड लिटनच्या काळात व्हिक्टोरीया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी दिल्याने फडके यांचा राग अनावर झाला.
  • २० फेब्रुवारी १८७९ नंतर वासुदेव फडके यांनी आपल्या रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.

वासुदेव बळवंत फडकेंचे कार्य

  • वासुदेव बळळंत फडके हे दत्ते उपासक होते. त्यांनी ‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
  • त्यांनी दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा घातला यामध्ये फक्त तीन हजार रुपये मिळाले.
  • सरकारी खजिने लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंतांची घरे लुटण्यावर फडके यांचा भर होता.
  • २५ ते २७ फेबुवारी १८७९ रोजी लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली.
  • ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला.

वासुदेव बळवंत फडके यांचा पहिला जाहीरनामा – इ.स. १८७९ च्या मे महिन्याच्या सुरुवातीस फडके यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यात असे सांगितले की, ‘आम्ही जे करत आहोत ते खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे.’ सरकारने जनतेची केलेली लूट, दुष्काळामुळे झालेली अन्न दशा, करांचे ओझे इ. ची माहिती या जाहीरनाम्यात दिली होती. या जाहीरनाम्यात असे नमूद केले की, ‘आतापर्यंत फक्त तेथील श्रीमंत लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम यानंतर आम्ही युरोपियनांविरुद्ध सुरू करू. युरोपियनांची सापडेल तेथे कत्तल करू आणि इ. स. १८५७ च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू.’ पुण्याचा पोलिस प्रमुख मेजर डॅनियल याने तपास सुरू केला.

वासुदेव बळवंत फडके यांचा दुसरा जाहीरनामा – फडके यांना पकडून देणाऱ्यास ४००० रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर इंग्रजांनी फडके यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. रामोशांनी त्यांची साथ सोडली. पुण्याला विश्रामबाग वाड्यात व बुधवार वाड्याला आग लावण्यात आली. पोलिंसांनी फडके यांच्यावर संशय घेतला. परंतु ही आग कृष्णाजी नारायण रानडे व त्यांच्या मुलाने लावल्याचे नंतर समजले. दि. २३ जुलै १८७९ ला विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौदध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांनर अटक करण्यात आली आणि यांच्या विरुद्ध खटल्याची सुरुवात केली.

वासुदेव बळवंत फडके यांचेवरील खटला

  • दि. २२ आक्टोबर १८७९ पासून त्यांच्यावरील खटल्याला सुरुवात झाली.
  • न्या. अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला.
  • न्यायमूर्तींनी इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडकेंवर ठेवला व खटला सत्र न्यायाधीश न्यूहॅमकडे वर्ग केला.
  • सरकारने फडके यांच्यावर बेकायदेशीर माणसे जमवणे, शस्त्र बाळगणे, दारूगोळा जमवणे, जनतेच्या भावना भडकावणे व समाजात असंतोष पसरवणे असे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले.
  • उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.
  • न्यायाधिशांनी त्यांना राजद्रोही ठरवले व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
  • ३ जानेवारी १८८० ला तेहेरान बोटीने त्यांना एडनला पाठवण्यात आले. तेथील अनन्वित छळाला बळी पडून १७ फेब्रुवारी १८८३ ला त्यांचे निधन झाले.
  • बंगालच्या ‘अमृत बझार’ पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर १८७९ मध्ये लिहिलेल्या लेखात ‘देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष‘ असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | Uprising of Vasudev Balwant Phadke : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_4.1

FAQs

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज ही कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे ?

महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज उपयुक्त आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये कोणते विषय कवर होतील ?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे इतिहास,भूगोल,पर्यावरण,अर्थशास्त्र,सामान्य विज्ञान तसेच पंचायत राज व राज्यशास्त्र हे सर्वच विषय दररोज कवर होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज चा परीक्षांसाठी काय फायदा आहे ?

पाठ्यपुस्तके स्पर्धापरीक्षा अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात. जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्याचसाठी आम्ही ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज घेऊन आलो आहोत.