Marathi govt jobs   »   Study Materials   »   Economic Survey of Maharashtra 2021-22

Economic Survey of Maharashtra 2021-22, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22

Economic Survey of Maharashtra 2021-22, In this article you will get detailed information about the Economic Survey of Maharashtra 2021-22. Along with this some important points of the Economic Survey of Maharashtra 2021-22 discuss in this article.

Economic Survey of Maharashtra 2021-22
Catagory Study Material
Useful for Exam All Competitive Exam
Name Economic Survey of Maharashtra 2021-22
Economic Survey 2022 Presented by Hon. Min. Ajit Pawar
Date 10th March 2022

Economic Survey of Maharashtra 2021-22

Economic Survey of Maharashtra 2021-22: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा वार्षिक दस्तऐवज आहे. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी विधान मंडळात अर्थसंकल्पाच्या अगदी आधी सादर केल्या जातो. हा दस्तऐवज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान मंडळातील दोन्ही सभागृहांना सादर केला जातो.  MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), सरळसेवा भरतीच्या परीक्षेत यावर प्रश्न विचारल्या जातात त्यामुळे याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखात परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Economic Survey of Maharashtra 2021-22 | महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22

Economic Survey of Maharashtra 2021-22: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2021-22 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दिनांक 10 मार्च 2022 सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अहवाल मांडला. 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) 8.9 टक्के असताना व करोनाच्या हाहाकाराशी दोन हात करूनही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक दराने राज्याच्या सकल उत्पन्नात होत असलेली वाढ ही अत्यंत आशादायी असल्याचे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असून ती 11.7टक्क्यांवरून 4.4 टक्के इतकी कमी झाली आहे. राज्यातील उद्योग क्षेत्राने मात्र भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी उद्योग क्षेत्राची वाढ उणे 11.7 टक्के होती, ती यंदा 11.9 टक्के असल्याचे आर्थिक पाहाणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर सेवा क्षेत्रही उणे 9 टक्क्यांवरून 13.5 टक्क्यांनी वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Economic Survey of Maharashtra 2021-22: Key Highlight | महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22: महत्वाचे मुद्दे

 • 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली खर्च 3,79,213 कोटी रुपये आहे, 2020-21 मध्ये 3,35,675 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा.
 • 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार GSDP मधील वित्तीय तुटीची टक्केवारी 2.1 टक्के आणि GSDP मधील कर्जाचा साठा 19.2 टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.
 • सर्वेक्षणानुसार, राष्ट्रीय जीडीपीमध्ये राज्याचा सरासरी हिस्सा १४.२ टक्के इतका आहे. प्रगत अंदाजानुसार, 2021-22 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न 2,25,073 रुपये अपेक्षित आहे.
 • 2021-22 च्या खरीप हंगामात 155.15 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस आणि ऊस यांचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 11 टक्के, 27 टक्के, 13 टक्के, 30 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे.
 • 2021-22 च्या रब्बी हंगामात जानेवारीच्या अखेरीस 52.47 लाख हेक्टर जमिनीवर पेरणी पूर्ण झाली.
 • कडधान्यांचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, तर तृणधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 21 टक्के आणि 7 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
 • अहवालानुसार, राज्यात 21.09 लाख हेक्‍टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली असून, 291.43 लाख हेक्‍टर क्षेत्रावर उत्पादन अपेक्षित आहे.
 • जून 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत, राज्यात 3.34 लाख अपेक्षित रोजगारांसह 1.88 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 • ऑक्टोबर 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते, असे नमूद करण्यात आले.
 • सर्वेक्षण अहवालानुसार, 15 जानेवारी 2022 पर्यंत राज्यात एकूण 71.70 लाख कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. किमान 67.60 लाख लोक संसर्गातून बरे झाले आहेत आणि पुनर्प्राप्तीचा दर 94.3 टक्के आहे.

Economic Survey of Maharashtra 2021-22: State Economy | राज्य अर्थव्यवस्था

Economic Survey of Maharashtra 2021-22: State Economy: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्य अर्थव्यवस्थेशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • सन 2021-22 च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 12.1 टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. सन 2021-22 च्या पूर्वानुमानानुसार दिसत असलेली वाढ ही सन 2021-22 मधील घटीच्या पार्श्वभूमीवर आहे.
 • सन 2021-22 मध्ये ‘कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 4.4 टक्के वाढ, ‘उद्योग’ क्षेत्रात 11.9 टक्के वाढ आणि ‘सेवा’ क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन 2021-22 मध्ये सांकेतिक (‘नॉमिनल’) (चालू किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ 31,97,772 कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (‘रिअल’) (सन 2021-22 च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ 21,18,309 कोटी अपेक्षित आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22
राज्य उत्पन्न

Economic Survey of Maharashtra 2021-22: Population | लोकसंख्या

Economic Survey of Maharashtra 2021-22: Population: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील लोकसंख्येशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • जनगणना 2011 नुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी होती व ती अखिल भारताच्या लोकसंख्येच्या 9.3 टक्के होती. महाराष्ट्र हे देशामध्ये उत्तरप्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. राज्यातील लोकसंख्येची घनता 365 प्रति चौ किमी होती. लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर राज्याकरिता 16 टक्के तर अखिल भारताकरिता 17.7टक्के होता. नागरी लोकसंख्या व साक्षरता या बाबींमध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्य अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर होते.
Economic Survey of Maharashtra 2021-22
लोकसंख्या

Economic Survey of Maharashtra 2021-22: State Income | राज्य उत्पन्न

Economic Survey of Maharashtra 2021-22: State Income: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्य उत्पन्नाशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • पूर्वानुमानानुसार सन 2021-22 च्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात सन २०२०-२१ च्या तुलनेत 12.1 टक्के वाढ अपेक्षित असून ते ₹ 21,18,309 कोटी अंदाजित आहे.
 • सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ₹ 31,97,782 कोटी अंदाजित आहे.
 • सन 2021-22 च्या पूर्वानुमानानुसार दिसत असलेली वाढ ही 2021-22 मधील घटीच्या पार्श्वभूमीवर आहे. महामारीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपुर्ण व अंशत: लॉकडाऊन, टप्प्याटप्प्याने खुले करण्यात आलेले आर्थिक व्यवहार आणि लसीकरण मोहीम यासारख्या विविध उपाययोजनांचा अर्थव्यवस्थेतील घडामोडींवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी, हे अंदाज सुधारीत करतांना त्यात मोठ्या प्रमाणात बदल संभवतात.
 • ‘कृषि व संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘पीक’ क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धित 3.0 टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘पशुसंवर्धन’, ‘वने व लाकूड तोडणी’ आणि ‘मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रांत अनुक्रमे 6.9 टक्के, 7.2 टक्के व १.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘उद्योग’ क्षेत्रात 11.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘वस्तुनिर्माण व ‘बांधकाम क्षेत्रांत अनुक्रमे 9.5 टक्के व 17.4 टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘सेवा’ क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22
राज्य उत्पन्न

Economic Survey of Maharashtra 2021-22: Institutional Finance | राज्यातील औद्योगिक गुंतवणूक

Economic Survey of Maharashtra 2021-22: Institutional Finance: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • उदारिकरणाचे धोरण अंगिकारल्यापासून (ऑगस्ट, १९९१) माहे नोव्हेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत र १५,०९,८११ कोटी गुंतवणुकीसह २१,२१६ औद्योगिक प्रकल्प मंजूर करण्यात आले. सन २०२१ मध्ये माहे नोव्हेंबरपर्यंत ₹७४,३६८ कोटी प्रस्तावित गुंतवणुकीच्या २५८ प्रकल्पांची नोंदणी झाली.
 • देशातील मंजूर झालेले एकूण औद्योगिक प्रकल्प आणि त्यातील गुंतवणुकीमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे १८.० टक्के आणि १०.९ टक्के आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22
औद्योगिक निर्देशांक

Economic Survey of Maharashtra 2021-22: Agriculture | कृषी

Economic Survey of Maharashtra 2021-22: Agriculture: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील कृषीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • अनियमित पाऊस, हवामानातील बदल, जमिनीची धूप व मातीचा कमी होणारा कस, निविष्टांवरील वाढता खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, इत्यादी राज्यातील कृषि क्षेत्राकरिता प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे, या उद्देशाने विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.
 • कृषि आणि संलग्न कार्य क्षेत्रामध्ये पीक क्षेत्राचा सरासरी हिस्सा ६३.७ टक्के आहे. एकूण पीक उत्पादनात फलोत्पादनाचा सरासरी हिस्सा २८.४ टक्के आहे. राज्यात गेल्या काही दशकांत भरड़ तृणधान्यांचे उत्पादन घेण्यावरील भर कमी झाला असून कापूस, ऊस, सोयाबीन, मका, फळे, भाजीपाला आणि फुले यांसारखे अधिक मूल्य मिळवून देणारे शेतीउत्पादन घेण्याकडे कल दिसून येत आहे.
 • शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, ज्ञानाच्या कक्षा रूंदावणे व कार्यक्षमता वृध्दींगत करण्याकरीता शासन माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ व अनुदान थेट जमा करण्यात येत आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधे ऑनलाईन पद्धतीने कृषि उत्पादनाच्या खरेदी विक्रीची सुविधा इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेती उत्पादकता वाढविण्याकरीता शेतीविषयक सर्व आवश्यक माहिती शेतकऱ्यांना कृषिक अपव्दारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या मूल्य निर्धारण प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप व त्रुटी कमी करण्याकरीता राज्यशासनाने महा-मदत ही ई-शासन प्रणाली स्थापित केली आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22
कृषी

Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF

Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) ची pdf डाउनलोड खाराण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF (Marathi)

Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF (English)

FAQs: Economic Survey of Maharashtra 2021-22

Q1. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 कधी जाहीर झाली?

Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22, 10 मार्च 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 कोणी जाहीर केली?

Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22, वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.

Q3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 नुसार ऑक्टोबर 2021 अखेर राज्यात किती स्टार्ट-अप होते?

Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22 नुसार ऑक्टोबर 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते.

Q4. अशीच महत्वपूर्ण माहिती मला कुठे वाचायला मिळेल?
Ans. आपण स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व माहिती Adda247 मराठी वर बघू शकता.

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?