Marathi govt jobs   »   Study Materials   »   Directive Principles Of State Policy (DPSPs)

राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | Directive Principles Of State Policy: DPSPs | Study Material For MPSC

Directive Principles Of State Policy (DPSPs): MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब आणि गट क पूर्व परीक्षा या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रम सारखा आहे. पण परीक्षेची काठिण्यपातळी वेगवेगळी आहे. काही topics MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये सुद्धा common आहेत. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. आजच्या या लेखात आपण राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | Directive Principles Of State Policy: DPSPs यावर चर्चा करणार आहोत.

28 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)- 100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)- 190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी 28 ऑक्टोबर रोजी online Application सुरु झाले आहे. MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदांसाठी आयोगाने जाहिरात दिली आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला होणार आहे. त्याचप्रमाणे MPSC ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ स्पर्धा परीक्षांची लवकरच जाहिरात निघणार आहे. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या या लेखात आपण Directive Principles Of State Policy पाहणार आहोत.

भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

Directive Principles Of State Policy (DPSPs) | राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे

Directive Principles Of State Policy (DPSPs): MPSC घेत असलेले सर्व स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता राज्यशास्त्र या विषयावर MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | Directive Principles Of State Policy: DPSPs याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

घटनाकर्त्यांनी ही मार्गदर्शक तत्वे (DPSPs) 1937 च्या आयरिश घटनेवरून स्विकारली आहे. (आयरिश घटनेत ती स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आली होती.) मार्गदर्शक तत्वे (DPSPs) घटनेच्या भाग IV (कलम 36 ते 51) मध्ये देण्यात आली आहेत. त्यांपैकी 38 ते 51 या कलमांमध्येच मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे.

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Directive Principles Of State Policy(DPSPs)- List of Articles |  मार्गदर्शक तत्वे : कलमांची यादी

Directive Principles Of State Policy(DPSPs)- List of Articles: मार्गदर्शक तत्वे (DPSPs) पुढीलप्रमाणे :

 • कलम 36व्याख्या (Definition): कलमानुसार, ‘राज्यसंस्था’ या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग तीन मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असेल.
 • कलम 37या भागात असलेली तत्वे लागू करणे (Application of the Principles): या कलमानुसार, भाग चार मधील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील, पण तरीसुद्धा ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करतांना ही तत्वे लागू करणे, हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल.
 • कलम 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
 1. राज्य, त्यास शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
 2. राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करील, आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्याबाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील.(हे मार्गदर्शक तत्व 44 वी घटनादुरुस्ती कायदा, 1978 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 39राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे:  राज्य हे विशेषत: पुढील गोष्टी साध्य करण्याच्या – दिशेने आपले धोरण आखील:
 1. स्त्री व पुरूष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क सारखाच असावा.
 2. समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी.
 3. आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामुहित हितास बाधक होईल अशाप्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकारण होऊ नये.
 4. पुरूष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे.
 5. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरूपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये.
 6. बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. (हे मार्गदर्शक तत्व 42 वी घटनादुरुस्ती कायदा, 1976 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 39Aसमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य: राज्य, हे न्यायीक व्यवस्था चालवितांना समान संधीच्या तत्वावर न्यायास प्रोत्साहन मिळेल याची निश्चिती करील, आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निःसमर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाऊ नये म्हणून मोफत कायदेविषयक सहाय्य (free legal aid) उपलब्ध करून देईल. (हे मार्गदर्शक तत्व 42 वी घटनादुरुस्ती कायदा, 1976 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 40- ग्रामपंचायतींचे संघटनः राज्य ग्राम पंचाय संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करील.
 • कलम 41- कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार: राज्य, हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी तरतूद करील.
 • कलम 42- कामाची न्याय्य व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद: राज्य, हे कामाची न्याय्य व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करील.
 • कलम 43- कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी: राज्य, यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधींचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि, विशेषत: ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
 • कलम 43A- उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग: राज्य, कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम/ आस्थापना/संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मागनि उपाययोजना करील. (हे मार्गदर्शक तत्व 42 वी घटनादुरुस्ती कायदा, 1976 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 43A- सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन: राज्य, सहकारी सोसायट्यांची स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांस प्रोत्साहनासाठी प्रयत्नशील राहील. (हे मार्गदर्शक तत्व 97 वा घटनादुरुस्ती कायदा, 2014 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 44- नागरिकांना एकरूप नागरी संहिता: नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता (Uniform Civil Code) लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
 • कलम 45- सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद: राज्य, हे बालकांचे वय सहा वर्षांचे होईपर्यंत, त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील.(हे मार्गदर्शक तत्व 68 वी घटनादुरुस्ती कायदा, 2002 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कमल 46-नुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन: राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील.
 • कलम 47- पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्यः आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषत: मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
 • कलम 48- कृषि व पशूसंवर्धन यांचे संघटन: कृषि व पशूसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषत: गाई व वासरे आणि इतर दुभती व ओढकामाची जनावरे यांच्या जातींचे जतन व सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यांकरता उपाययोजना करील.
 • कलम 48A-र्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे: राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. (हे मार्गदर्शक तत्व 42 वी घटनादुरुस्ती कायदा, 1976 अन्वये समाविष्ट करण्यात आले.)
 • कलम 49- राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण: संसदीय कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित झालेले कलात्मक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रूपण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट किंवा निर्यात यांपासून संरक्षण करणे, ही राज्याची जबाबदारी असेल.
 • कलम 50- न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे: राज्याच्या लोकसेवांमध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील.
 • कलम 51- आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन:

राज्य हे –

 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी
 2. राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी
 3. संघटित जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने यांप्रती आदरभावना जोपासण्यासाठी,
 4. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील.

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

DPSPs- Classification Of DPSPs | मार्गदर्शक तत्वे – मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण

DPSPs – Classification of DPSPs: सामाजिक-आर्थिक लोकशाहीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे (DPSPs) सर्वसाधारणतः पुढील तीन प्रकारांत वर्गीकृत करता येतील:

 1. समाजवादी स्वरूपाची तत्वे
 2. गांधीवादी स्वरूपाची तत्त्वे
 3. उदारमतवादी स्वरूपाची तत्त्वे
समाजवादी स्वरूपाची तत्वे गांधीवादी स्वरूपाची तत्त्वे उदारमतवादी स्वरूपाची तत्त्वे
कलम 38

कलम 39

कलम 39A

कलम 41

कलम 42

कलम 43

कलम 43A

कलम 47

कलम 40

कलम 43

कलम 43B

कलम 46

कलम 47

कलम 48

कलम 44

कलम 45

कलम 48

कलम 48A

कलम 49

कलम 50

कलम 51

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

DPSPs- Difference between Fundamental rights and DPSPs | मार्गदर्शक तत्वे- मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील फरक 

मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील फरक

DPSPs- Difference between Fundamental rights and DPSPs: मूलभूत हक्क (Fundamental rights) आणि मार्गदर्शक तत्वे (DPSPs) यांच्यातील फरक पुढीलप्रमाणे:

No. मार्गदर्शक तत्वे (DPSPs) मूलभूत हक्क (Fundamental rights) 
1 ते सकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टी मार्गदर्शन करतात. नकारात्मक आहेत. कारण ते राज्यास काही ठराविक गोष्टी करण्यापासून रोखतात.
2 ही न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. ती न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. भारतामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे, हे त्यांचे ध्येय्य आहे.
3 ते देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
4 ते नैतिक आणि राजकीयदृष्ट्या बंधनकारक आहेत. ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहेत.
5 त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागतो. त्यांची अंमल बजावणी आपोआप होत नाही. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणताही कायदा करण्याची आवश्यकता नसते. ते आपोआप अंमलबजावणीत येतात.
6 समूहाच्या कल्याणाला चालना देतात. त्यामुळे, ते समाजाभिमुख आहेत. ते व्यक्तीच्या कल्याणाला चालना देतात. त्यामुळे ते व्यक्तिगत आहेत.
7 कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही. तथापि, मार्गदर्शक तत्त्वांच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याची वैधता ते ग्राह्य धरू शकतात. मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनाविरोधी आणि अवैध घोषित करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे.

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल

वित्तीय आणीबाणी: कलम 360

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | Fundamental Duties: Article 51A

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार 

1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल

भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश 2021

RBI ची पतनियंत्रणाची साधन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

हिमालयातील महत्वाच्या खिंडी

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये- वने व वनांचे प्रकार 

भारतातील सर्वात मोठे राज्य 2021: क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार सर्व राज्यांची यादी

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर

FAQs Directive Principles Of State Policy (DPSPs)

Q.1 ग्रामपंचायतींचे संघटन यासाठी कोणते कलम आहे ? 

Ans. ग्रामपंचायतींचे संघटन यासाठी कलम 40 आहे.

Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत?

Ans: मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून घेतली आहेत.

Q.4  मार्गदर्शक तत्त्वे याची माहिती कुठे मिळेल?

Ans. मार्गदर्शक तत्त्वे याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Directive Principles Of State Policy: DPSPs | राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे_40.1
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Directive Principles Of State Policy: DPSPs | राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Directive Principles Of State Policy: DPSPs | राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.