Table of Contents
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 26 ऑगस्ट 2021
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 26 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.
राष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)
1. सम्रिध्द कार्यक्रम
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “स्टार्टअप एस्सेलरेटर्स ऑफ मैटी फॉर प्रोडक्ट इनोव्हेशन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ (एसएएमआरआयडीएच)” कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले.
- सम्रिध्द कार्यक्रमाचे उद्दीष्ट भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन स्टार्ट-अप्सना त्यांची उत्पादने वाढवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायासाठी गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी अनुकूल व्यासपीठ तयार करणे आहे.
- पुढील तीन वर्षात ग्राहक जोडणी, गुंतवणूकदार जोडणी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदान करून 300 स्टार्ट-अप्सला व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.स्टार्ट-अपला 40 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक सहाय्य दिले जाईल.
2. सुजलाम मोहीम
- जलशक्ती मंत्रालयाने गावपातळीवर सांडपाणी व्यवस्थापन हाती घेऊन अधिकाधिक उघड्यावरील शौचमुक्त (ओडीएफ) प्लस गावे तयार करण्यासाठी सुजलाम नावाची 100 दिवसांची मोहीम सुरू केली आहे.
- या मोहिमेमुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनास मदत होईल आणि त्या बदल्यात, 1 दशलक्ष सोक-पिट्स आणि इतर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांद्वारे जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत होईल.
- 25 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेली मोहीम ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवांचा भाग आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री: गजेंद्रसिंह शेखावत
(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 25 August 2021
3. भारतातील पहिली हरित हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर गिगाफॅक्टरी
- अमेरिकास्थित ओहमियम इंटरनॅशनलने कर्नाटकातील बेंगळुरू येथे भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर उत्पादन युनिट सुरू केले आहे.
- याठिकाणी भारतीय-बनावटीचे प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन (पीईएम) हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार केले जातील.
- हरित हायड्रोजन हा नील हायड्रोजनच्या प्रमाणे जीवाश्म स्त्रोतांपासून न बनविता अजैविक/जीवाश्म नसलेल्या स्त्रोतांपासून बनवले जातो.
- या युनिटची उत्पादन क्षमता प्रति वर्ष सुमारे 500 मेगावॅट आहे आणि ती दरवर्षी 2 गिगावॅट पर्यंत वाढवता येईल.
- पीईएम हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर हे हरित हायड्रोजनच्या उत्पादनासाठी मुख्य उपकरणे आहे ज्यात नूतनीकरणक्षम स्त्रोतांपासून निर्माण होणारी वीज वापरून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विद्युत अपघटन केले जाते.
आंतरराष्ट्रीय बातम्या (Current Affairs for mpsc daily)
4. ऐन दुबई: जगातील सर्वात उंच निरीक्षण चक्र
- जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात उंच निरीक्षण चक्राचे 21 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई, यूएई येथे अनावरण होणार आहे.
- ‘ऐन दुबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरीक्षण चक्राची उंची 250 मीटर (820 फूट) असून ते ब्लूवाटर्स बेटावर उभारण्यात आले आहे.
- हे चक्र,167.6 मीटर (550 फूट) उंचीच्या लास वेगासमधील हाय रोलरपेक्षा 42.5 मीटर (139 फूट) अधिक उंच आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- युएई राजधानी: अबू धाबी
- युएई चलन: संयुक्त अरब अमिराती दिरहम
- युएई अध्यक्ष: खलिफा बिन जायद अल नाहयान
5. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी दुबईने विशेष न्यायालय स्थापन केले
- दुबई कोर्टाने मनी लॉन्ड्रिंगचा मुकाबला करण्यासाठी प्रथम न्यायालय आणि अपील न्यायालयात एक विशेष न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली.
- हे न्यायालय आर्थिक गुन्हे कमी करण्याच्या उद्देशाने काम करेल आणि अलीकडील मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याच्या विरोधातील कार्यकारी कार्यालयाच्या स्थापनेचे अनुसरण करेल.
साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs) | 15 Aug – 21 Aug | Pdf Download
अर्थव्यवस्था बातम्या (Current Affairs in Marathi for MPSC)
6. भारतपे ने P2P कर्ज देणारे अॅप ‘12% क्लब’ सुरु केले
- भारतपे ने एक “12% क्लब” अॅप सुरु केले आहे जे ग्राहकांना गुंतवणूक आणि 12 टक्के वार्षिक व्याज किंवा समान दराने कर्ज घेण्याची परवानगी देते.
- भारतपे ने या अॅप आणि कर्ज व्यवस्थेसाठी लेनदेनक्लब (RBI- मान्यताप्राप्त एनबीएफसी) सोबत भागीदारी केली आहे.
- ग्राहक “12% क्लब” अॅपवर त्यांची बचत कधीही गुंतवू शकतात. या व्यतिरिक्त, ग्राहक 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 12 टक्के दराने क्लब अॅपवर 10 लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज घेऊ शकतात.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- भारतपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अश्नीर ग्रोव्हर
- भारतपेचे मुख्यालय: नवी दिल्ली
- भारतपेची स्थापना: 2018
7. एनसीडीईएक्स द्वारे गुआरएक्स चे अनावरण
- कृषी वस्तू टोपलीतील भारताचा पहिला क्षेत्रीय निर्देशांक अर्थात GUAREX(गुआरएक्स) नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (एनसीडीईएक्स) द्वारे अनावरण करण्यात आला.
- गुआरएक्स हा किमतीवर आधारित क्षेत्रीय निर्देशांक आहे जो गवार गम रिफाइंड स्प्लिट्स आणि गवारीच्या बियांच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमधील हालचालींचा मागोवा घेतो.
- या निर्देशांकात गवार बिया आणि ग्वार गम रिफाइंड स्प्लिट्सचा अधिभार अनुक्रमे 63 टक्के आणि 37 टक्के असेल.
- भारत हा जगातील सर्वात मोठा गवार उत्पादक आहे जगाच्या 80-85 टक्के उत्पादन भारतात होते, तर राजस्थान 80 टक्के बाजारपेठेसह देशातील अव्वल उत्पादक राज्य आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- एनसीडीईएक्स सीईओ: विजयकुमार वेंकटरामन
- एनसीडीईएक्स ची स्थापना: 15 डिसेंबर 2003
- एनसीडीईएक्स मुख्यालय: मुंबई.
बैठका आणि परिषद बातम्या (Current Affairs in Marathi for MPSC)
8. अजित डोवाल यांनी 11 व्या ब्रिक्स एनएसए च्या आभासी बैठकीचे अध्यक्ष पद भूषवले
- राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या ब्रिक्स उच्च प्रतिनिधींची 11 वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली.
- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 2021 ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
- रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव जनरल पत्रुशेव, चिनच्या पोलिटब्युरोचे सदस्य यांग जेची, दक्षिण आफ्रिकेचे राज्य सुरक्षा मंत्री नेसेडिसो गुडेनॉफ कोडवा आणि जनरल ऑगस्टो हेलनो रिबेरो परेरा, राज्यमंत्री आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींच्या संस्थात्मक सुरक्षा मंत्रिमंडळाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
- ब्रिक्स एनएसएच्या बैठकीत ब्रिक्स शिखर परिषदेने विचार करण्यासाठी ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना स्वीकारली गेली.
महत्त्वाचे दिवस (Daily Current Affairs for MPSC)
9. आंतरराष्ट्रीय श्वान दिन 2021
- कुत्रा दत्तक घेण्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि कुत्र्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण प्रदान करण्याचे महत्त्व जागृत करण्यासाठी दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय श्वान दिन पाळला जातो.
- पाळीव प्राणी आणि कौटुंबिक जीवनशैली तज्ज्ञ, प्राणी बचाव वकील, संवर्धनवादी आणि श्वान प्रशिक्षक कॉलिन पेज यांनी 2004 मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय श्वान दिवस म्हणून या दिवसाची सुरुवात केली.
- 26 ऑगस्ट या दिवशी पेजच्या कुटुंबाने त्यांचा पहिला कुत्रा “शेल्टी” दत्तक घेतला जेव्हा त्या फक्त 10 वर्षांची होत्या.
नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)
10. संदीप बक्षी: आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि सीईओपदी पुनर्नियुक्ती
- भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) संदीप बक्षी यांची आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
- ते 15 ऑक्टोबर 2021 पासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत या पदांवर राहतील.
- बक्षी यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये चंदा कोचर यांच्या जागी एमडी आणि सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
- आयसीआयसीआय बँकेची टॅगलाईन: हम है ना, खयाल आपका
Current Affairs Daily Quiz In Marathi | 26 August 2021
संरक्षण बातम्या (daily Current Affairs for mpsc)
11. 5 वा भारत-कझाकिस्तान संयुक्त युद्धसराव “काझींद -21”
भारत आणि कझाकिस्तान यांच्यादरम्यान 5 वा संयुक्त लष्करी सराव “काझींद -21″ 30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2021 पर्यंत ट्रेनिंग नोड, आयशा बीबी, कझाकिस्तान येथे आयोजित केला जाईल. भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व बिहार रेजिमेंटची बटालियन करणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:
- कझाकिस्तानचे पंतप्रधान: असकर मामीन
- कझाकिस्तानची राजधानी: नूर-सुलतान
- कझाकिस्तानचे चलन: कझाकस्तानी टेंगे
निधन बातम्या (Daily Current Affairs for MPSC)
12. भारताचे माजी फुटबॉलपटू आणि ऑलिम्पिकपटू ओ चंद्रशेखर यांचे निधन
- भारताचे माजी फुटबॉलपटू ओ चंद्रशेखरन यांचे निधन झाले. ते त्यांच्या मूळ राज्य केरळमध्ये ऑलिम्पियन चंद्रशेखरन म्हणून प्रसिद्ध होते.
- बचावपटू म्हणून खेळलेले चंद्रशेखरन यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
Importance of Daily Current Affairs in Marathi
Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो