Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   (Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 25 ऑगस्ट 2021

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 25 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात. 

राष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 1. वाहतूक कार्बन-मुक्त करण्यासाठी मंच

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_40.1
वाहतूक कार्बन-मुक्त करण्यासाठी मंच
  • नीति आयोग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), भारत यांनी संयुक्तपणे ‘फोरम फॉर डीकार्बोनाइजिंग ट्रान्सपोर्ट (वाहतूक कार्बन-मुक्त करण्यासाठी मंच)’ भारतात सुरू केला आहे. नीति आयोग भारतासाठी अंमलबजावणी भागीदार आहे.
  • आशियातील हरितगृह वायू उत्सर्जन (वाहतूक क्षेत्र) ची शिखर पातळी खाली आणणे (2 अंश मर्यादेच्या अनुषंगाने) हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • एनडीसी-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (एनडीसी-टीआयए) प्रकल्पाअंतर्गत हा मंच सुरू करण्यात आला आहे.
  • एनडीसी ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर आशिया (टीआयए 2020-2023) हा सात संघटनांचा संयुक्त कार्यक्रम आहे जो चीन, भारत आणि व्हिएतनामला आपापल्या देशात वाहतूक कार्बन-मुक्त  व्यापक करण्यासाठी सहकार्य करेल.

 2. ऑपरेशन देवी शक्ती

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_50.1
ऑपरेशन देवी शक्ती
  • परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या भारताच्या अभियानाला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव दिले आहे.
  • परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 24 ऑगस्ट रोजी दिल्लीत 78 निर्वासितांच्या ताज्या तुकडीच्या आगमनाचा उल्लेख करताना  ट्विटमध्ये या ऑपरेशनचे नाव दिले.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 24 August 2021

राज्य बातम्या (Current Affairs for mpsc daily)

 3. वंचुवा महोत्सव 2021 – आसाम

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_60.1
वंचुवा महोत्सव 2021 – आसाम
  • आसाम मधील तीवा आदिवासी जमातीने चांगल्या सुगीचा हंगाम साजरा करण्यासाठी पारंपारिक वंचुवा महोत्सव साजरा केला.
  • गाणी, नृत्य, धार्मिक विधींचा एक समूह पारंपारिक पोशाख परिधान करून हा उत्सव साजरा केला जातो.
  • तीवा या जमातीला आसाम आणि मेघालय मध्ये लालुंग म्हणून देखील ओळखले जाते. ही जमात अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या काही भागात देखील आढळते.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती: 

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंत बिस्वा सरमा

अर्थव्यवस्था बातम्या (Current Affairs in Marathi for MPSC)

 4. आरबीआय ने नियुक्त केलेल्या पॅनलने शहरी सहकारी बँकांसाठी चतुस्त्ररीय रचना सुचविली

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_70.1
शहरी सहकारी बँकांसाठी चतुस्त्ररीय रचना
  • एन.एस. विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआय ने नियुक्त केलेल्या पॅनलने शहरी सहकारी बँकांसाठी 4-स्तरीय रचना सुचविली.
  • शहरी सहकारी बँकांसाठी किमान सीआरएआर (भांडवल ते जोखीम-भारित मालमत्ता गुणोत्तर) 9 टक्के पासून 15 टक्के पर्यंत वाढवण्याचे सांगितले आहे.
  • रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या समितीने शहरी सहकारी बँकांसाठी (यूसीबी) ठेवींवर अवलंबून चार-स्तरीय रचना सुचवली आहे आणि त्यांच्या आकारानुसार त्यांच्यासाठी भिन्न भांडवली पर्याप्तता आणि नियामक निकष निर्धारित केले आहेत. ती रचना खालीलप्रमाणे;
  1. टियर -1 – 100 कोटी रुपयांच्या ठेवी
  2. टियर -2 – 100 ते 1,000 कोटी रुपयांच्या ठेवी
  3. टियर -3 – 1,000 कोटी ते 10,000 रुपयांच्या ठेवी
  4. टियर -4 – 10,000 कोटी रुपयांच्या वरील ठेवी

 5. इन्फोसिसचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलर्स च्या वर 

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_80.1
इन्फोसिसचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलर्स च्या वर
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख, इन्फोसिसचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान विक्रमी उच्चांकावर पोहोचले, ज्यामुळे कंपनीला बाजार भांडवलामध्ये $ 100 अब्ज पार करण्यात मदत झाली.
  • हा टप्पा गाठणारी इन्फोसिस ही चौथी भारतीय कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (एम-कॅप $ 140 अब्ज), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (एम-कॅप $ 115 अब्ज) आणि एचडीएफसी बँक (एम-कॅप $ 100.1 अब्ज) इन्फोसिसच्या क्लबमधील इतर भारतीय कंपन्या आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती: 

  • इन्फोसिसची स्थापना: 7 जुलै 1981
  • इन्फोसिसचे सीईओ: सलील पारेख
  • इन्फोसिस मुख्यालय: बेंगळुरू

साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs) | 15 Aug – 21 Aug | Pdf Download

अहवाल आणि निर्देशांक बातम्या (Current Affairs in Marathi for MPSC)

 6. ईआययूचा सुरक्षित शहर निर्देशांक 2021

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_90.1
ईआययूचा सुरक्षित शहर निर्देशांक 2021
  • इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययु) ने जारी केलेल्या सुरक्षित शहर निर्देशांक 2021 मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनला जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषीत करण्यात आले. यांगून हे सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे.
  • भारतातील नवी दिल्ली (48) आणि मुंबई (50) या दोन शहरांना पहिल्या 60 शहरांमध्ये स्थान मिळाले आहे.
  • ईआययु चा हा निर्देशांक हे जागतिक, शहरी सुरक्षा मोजण्यासाठी विकसित केलेले एक वैश्विक, धोरणात्मक परिमाण आहे.
  • हा निर्देशांक प्रथम 2015 मध्ये प्रसिद्ध झाला. 2021 मध्ये, डिजिटल, आरोग्य, पायाभूत सुविधा, वैयक्तिक आणि पर्यावरणीय सुरक्षा अशा पाच विस्तृत स्तंभांमध्ये सुरक्षेच्या 76 निर्देशकांच्या आधारे शहरांची क्रमवारी लावण्यात आली आहे.

गुणांनुसार शहरातील सुरक्षितता: 

  • 0-25-कमी सुरक्षा
  • 25.1-50-मध्यम सुरक्षा
  • 50.1-75-उच्च सुरक्षा
  • 75.1-100-अति उच्च सुरक्षा

जगातील पहिली 5 शहरे: 

  • कोपनहेगन
  • टोरंटो
  • सिंगापूर
  • सिडनी
  • टोकियो

 7. ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_100.1
ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर
  • कुशमन अँड वेकफिल्डच्या 2021 ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आला आहे.हे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारत उदयास येत आहे याचे द्योतक आहे.
  • भारत आता युनायटेड स्टेट्स आणि चीनसह इतर देशांच्या तुलनेत उत्पादकांमध्ये वाढते स्वारस्य असलेला देश बनला आहे. युरोप, अमेरिका आणि आशिया पॅसिफिकमधील निर्देशांकामध्ये 47 देश आहेत.

महत्त्वाचे दिवस (Daily Current Affairs for MPSC)

 8. अभूतपूर्व आठवडी उत्सव

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_110.1
अभूतपूर्व आठवडी उत्सव
  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 23 ऑगस्टपासून सुरू होणारा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी अनेक उपक्रमांची सुरुवात केली आहे. कार्यक्रमांची मालिका 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
  • ठाकूर यांनी ‘जन भागिदारी आणि जनआंदोलन’ च्या संपूर्ण भावनेतून देशभरातून सहभाग घेणाऱ्या ‘आयकॉनिक वीक’ची सुरुवात केली.

नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)

 9. अभय कुमार सिंह: सहकार मंत्रालयाचे नवे सहसचिव

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_120.1
अभय कुमार सिंह: सहकार मंत्रालयाचे नवे सहसचिव
  • अभय कुमार सिंह यांची सहकार मंत्रालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने हे मंत्रालय अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली नुकतेच स्थापन करण्यात आले आहे.
  • अभय कुमार सिंह, बिहार केडरचे 2004-बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत.

क्रीडा बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 10. शैली सिंगने डब्ल्यूएयु 20 अजिंक्यस्पर्धेत रौप्य पदक पटकाविले

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_130.1
शैली सिंगने डब्ल्यूएयु 20 अजिंक्यस्पर्धेत रौप्य पदक पटकाविले
  • शैली सिंगने 20 वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यस्पर्धेत महिलांच्या उंच उडीत रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. या स्पर्धेत स्वीडनच्या माजा असकागने सुवर्णपदक जिंकले.
  • 4×400 मीटर रिलेमध्ये मिश्र संघाने कांस्य आणि पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉकमध्ये अमित खत्रीने रौप्य पटकावल्यानंतर जागतिक अ‍ॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये शैली सिंगचे हे भारताचे तिसरे पदक होते. पदक तक्त्यात भारताने 21 वे स्थान मिळवले.

Current Affairs Daily Quiz In Marathi | 25 August 2021

 11. प्रिंसपाल सिंग- एनबीए चॅम्पियनशिप रोस्टरचा भाग होणारा पहिला भारतीय

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_140.1
प्रिंसपाल सिंग- एनबीए चॅम्पियनशिप रोस्टरचा भाग होणारा पहिला भारतीय
  • प्रिन्सपाल सिंग एनबीए जेतेपद मिळवणाऱ्या कोणत्याही संघाचा भाग बनणारा पहिला भारतीय  खेळाडू ठरला आहे. त्याच्या सॅक्रामेंटो किंग्स या संघाने 2021 एनबीए समर लीगचा किताब जिंकला.

 12. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नवीन ध्वजवाहक म्हणून टेकचंद

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_150.1
भारताचा नवीन ध्वजवाहक म्हणून टेकचंद
  • टोकियोला जाणाऱ्या त्याच्या फ्लाइटमध्ये कोविड पॉझिटिव्ह परदेशी प्रवाशाच्या संपर्कात आल्यामुळे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने मरिअप्पन थंगावेलू यांच्याजागी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेता टेकचंद यांना टोकियो पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारताचा नवीन ध्वजवाहक म्हणून नियुक्त केले आहे.

पुरस्कार बातम्या (Current Affairs for mpsc)

 13. भालकी हिरेमठाला श्री बसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_160.1
भालकी हिरेमठाला श्री बसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • कर्नाटक सरकारने प्रतिष्ठित श्री बसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भालकी हिरेमठचे ज्येष्ठ स्वामी श्री बसवलिंग पट्टद्देवरू यांची निवड केली आहे.
  • कन्नड आणि संस्कृती मंत्री व्ही. सुनील कुमार बेंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे पुरस्कार प्रदान करतील.
  • 2003 मध्ये बिदर जिल्ह्यातील उजनी जवळ हा मठ स्थापन करण्यात आला.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती: 

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री: बसवराज एस बोम्मई
  • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गेहलोत
  • कर्नाटक राजधानी: बेंगळुरू

निधन बातम्या (Daily Current Affairs for MPSC)

 14. माजी राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक एस एस हकीम यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_170.1
एस एस हकीम यांचे निधन
  • भारताचे माजी फुटबॉलपटू आणि 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या राष्ट्रीय संघाचे शेवटचे सदस्य सय्यद शाहिद हकीम यांचे निधन झाले. हकीम ‘साब’, म्हणून लोकप्रिय होते, ते 82 वर्षांचे होते.
  • भारतीय फुटबॉलशी त्याच्या पाच-दशकांहून अधिक काळाच्या संबंधात, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त हकीम, 1982 च्या दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान दिवंगत पी के बॅनर्जी यांचे सहाय्यक प्रशिक्षकही होते.
  • हकीम फिफा बॅज होल्डर आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणून काम करत होते आणि त्यांनी आशियाई क्लब कप गेम्समध्ये कामगिरी बजावली आहे आणि त्यांना प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
  • भारतीय हवाई दलाचे माजी स्क्वॉड्रन लीडर, हकीम भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक होते आणि 2017 अंडर -17 फिफा विश्वचषकापूर्वी स्काउटिंगचे प्रभारी प्रकल्प संचालक म्हणून त्यांची शेवटची नेमणूक होती.

 15. ब्रिटिश विनोदी कलाकार सीन लॉक यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_180.1
सीन लॉक यांचे निधन
  • ब्रिटिश कॉमेडियन सीन लॉक यांचे निधन झाले. ते ब्रिटनच्या सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक होते.
  • 2000 मध्ये, सीन लॉकने सर्वोत्कृष्ट लाईव्ह स्टँड-अप कामगिरीसाठी ब्रिटिश कॉमेडी अवॉर्ड्समध्ये गोंग जिंकला होता.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_190.1
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

(Daily Current Affairs) 2021 | 25-August-2021_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.