Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   (Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 02 सप्टेंबर 2021

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021 पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 1. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘वाय-ब्रेक’ अ‍ॅपचे लोकार्पण केले

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_3.1
वाय-ब्रेक
  • केंद्रीय आयुष मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी नवी दिल्ली येथे ‘वाई ब्रेक’ योग प्रोटोकॉल मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे.
  • मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (एमडीएनआयवाय) ने हे अ‍ॅप विकसित केले आहे.
  • आयुष मंत्रालयाने 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या उपक्रमांचा आणि मोहिमेचा एक भाग म्हणून हे अ‍ॅप सुरु करण्यात आले.
  • वाय-ब्रेक (योग ब्रेक) मोबाईल अ‍ॅप्लिकेशन हे एक अद्वितीय पाच मिनिटांचे योग प्रोटोकॉल अ‍ॅप आहे, जे विशेषतः काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी, ताजेतवाने करण्यासाठी आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

राज्य बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 2. आसामने राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_4.1
ओरंग राष्ट्रीय उद्याना
  • आसाम मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ओरंग हे नाव आदिवासी आणि चहा-उत्पादक समुदायाच्या भावनांशी संबंधित असल्याने मंत्रिमंडळाने राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ओरंग राष्ट्रीय उद्यान करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित, 78.80 चौरस किमी मध्ये पसरलेले ओरंग राष्ट्रीय उद्यान ही राज्यातील सर्वात जुने वनसंपत्ती आहे. 1985 मध्ये याला वन्यजीव अभयारण्य चा आणि 1999 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंत बिस्वा सरमा.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 01-September-2021

आंतरराष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 3. श्रीलंकेने विदेशी मुद्रा संकट आल्याने अन्न आणीबाणी घोषित केली

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_5.1
श्रीलंकेत अन्न आणीबाणी
  • खाजगी बँकांकडून परकीय चलन संपुष्टात आल्यानंतर अन्नधान्याचे संकट वाढल्याने श्रीलंकेने अन्न आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे.
  • देश गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत असताना, राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी साखर, तांदूळ आणि इतर आवश्यक पदार्थांच्या साठवणुकीला आळा घालण्यासाठी आपत्कालीन नियमांचे आदेश दिले. या वर्षी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपया 7.5% ने घसरला आहे.
  • राजपक्षे यांनी एका उच्च सैन्य अधिकाऱ्याला “भात, तांदूळ, साखर आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी समन्वय आयुक्त” म्हणून नियुक्त केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • श्रीलंका राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे
  • चलन: श्रीलंका रुपया
  • श्रीलंकेचे पंतप्रधान: महिंदा राजपक्षे
  • श्रीलंकेचे अध्यक्ष: गोताबाया राजपक्षे

अर्थव्यवस्था बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 4. मॉर्गन स्टॅन्लीने वित्तीय वर्ष 2022 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 10.5% इतका कायम ठेवला 

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_6.1
मॉर्गन स्टॅन्लीने

अमेरिका आधारित इन्व्हेस्टमेंट बँक, मॉर्गन स्टॅन्लीने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 10.5 टक्के इतका कायम राखला आहे.

 5. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन 1.12 लाख कोटी रुपयांहून अधिक

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_7.1
ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन 1.12 लाख कोटी
  • ऑगस्टमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींहून अधिक 1.12 लाख कोटी रुपये झाले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे (ऑगस्ट 2020 मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 86,449 कोटी रुपये होते).
  • ऑगस्टमध्ये जमा होणारी रक्कम मात्र जुलै 2021 मध्ये जमा झालेल्या 1.16 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
  • मागील काही महिन्यांपैकी एप्रिल 2021 मध्ये जीएसटी संकलन सर्वाधिक ₹ 1.41 लाख कोटी इतके झाले होते.

Monthly Current Affairs PDF in Marathi | August 2021 | Download PDF

 6. पहिल्या तिमाहीत भारताची आर्थिक वाढ 20.1%

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_8.1
पहिल्या तिमाहीत भारताची आर्थिक वाढ 20.1%
  • या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 20.1% ने वाढली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 24.4% संकुचित होती.
  • पहिल्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे.
  • मागील तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 1.6% ने वाढली होती. संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारताचा जीडीपी 7.3% ने घटला होता.

करार बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 7. पीओएस व्यवहारांसाठी अ‍ॅक्सिस बँकेने भारतपे सोबत करार केला

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_9.1
अ‍ॅक्सिस बँकेने भारतपे सोबत करार
  • भारतस्वाइप नावाच्या भारतपेच्या पॉईंट ऑफ सेल (पीओएस) व्यवसायासाठी अ‍ॅक्सिस बँकेने भारतपे सोबत भागीदारी केली आहे.
  • भागीदारी अंतर्गत, अ‍ॅक्सिस बँक भारतस्वाइपसाठी अधिग्रहण करणारी बँक असेल आणि भारतपे शी संबंधित व्यापाऱ्यांना क्रेडिट आणि डेबिट कार्डची स्वीकृती प्रदान करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
  • अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्यालय: मुंबई
  • अ‍ॅक्सिस बँके ची स्थापना: 3 डिसेंबर 1993, अहमदाबाद

महत्त्वाचे दिवस (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 8. 02 सप्टेंबर: जागतिक नारळ दिन

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_10.1
02 सप्टेंबर: जागतिक नारळ दिन
  • जागतिक नारळ दिवस 2009 पासून दरवर्षी 02 सप्टेंबर रोजी पाळला जातो. या उष्णकटिबंधीय फळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या आरोग्य फायद्यांविषयी जागरूकता निर्माण हा दिवस आयोजित केला जातो.
  • जागतिक नारळ दिवस एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (एपीसीसी) च्या स्थापनेची स्मृतीप्रित्यर्थ देखील आयोजित केला जातो.
  • जागतिक नारळ दिन 2021 ची संकल्पना: ‘कोविड -19 महामारी आणि पलीकडे, सुरक्षित सर्वसमावेशक आणि शाश्वत नारळ समुदायाची निर्मिती करणे’ [बिल्डिंग अ सेफ रेझिलीअंट अँड सस्टनेबल कोकोनट कम्युनिटी अमिड कोव्हीड-19 पॅन्डेमिक]

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 9. आयआयटी रोपरने जगातील पहिले ‘प्लांट बेस्ड’ स्मार्ट हवा शुद्धीकरण यंत्र विकसित केले

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_11.1
जगातील पहिले ‘प्लांट बेस्ड’ स्मार्ट हवा शुद्धीकरण यंत्र
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), रोपरकानपूर आणि दिल्ली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट स्टडीज विद्याशाखेने संयुक्तपणे “अनब्रिद लाइफ” नावाचे एक जिवंत वनस्पती आधारित हवा शुद्धीकरण यंत्र निर्माण केले आहे.
  • हे एअर प्युरिफायर हॉस्पिटल, शाळा, कार्यालये आणि घरांसारख्या इनडोअर स्पेसमध्ये हवा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला चालना देईल. हे जगातील पहिले, अत्याधुनिक ‘स्मार्ट बायो-फिल्टर’ आहे जे हवा शुद्ध करू शकते.
  • या उपकरणात हवा शुद्धीकरणासाठी वापरलेल्या विशिष्ट वनस्पतींमध्ये पीस लिली, सर्प वनस्पती, स्पायडर प्लांट इत्यादींचा समावेश आहे.

संरक्षण बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 10. झेडएपीएडी 2021 युद्ध सरावात भारतीय सैन्यदल सहभागी होणार

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_12.1
झेडएपीएडी 2021
  • 3-16 सप्टेंबर दरम्यान रशियातील निझनी येथे आयोजित होणाऱ्या बहुराष्ट्रीय युद्धाभ्यास ZAPAD(झेडएपीएडी) 2021 मध्ये भारतीय लष्कर सहभागी होणार आहे.
  • झेडएपीएडी 2021 हा रशियन सशस्त्र दलांच्या थिएटर स्तरावरील सरावांपैकी एक आहे आणि प्रामुख्याने दहशतवाद्यांविरूद्धच्या ऑपरेशनवर लक्ष केंद्रित करेल.
  • युरेशियन आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील डझनहून अधिक देश या स्वाक्षरी कार्यक्रमात सहभागी होतील.
  • झेडएपीएडी मध्ये मंगोलिया, आर्मेनिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, सर्बिया, रशिया, भारत आणि बेलारूस यासह एकूण 17 देश सहभागी होत आहेत. तर पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, बांगलादेश, म्यानमार, उझबेकिस्तान आणि श्रीलंका हे या सरावात निरीक्षक देश आहेत.

भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

बैठक व परिषद बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 11. भारताने बिम्सटेक देशांच्या कृषी तज्ञांच्या 8 व्या बैठकीचे आयोजन केले 

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_13.1
बिम्सटेक देशांच्या कृषी तज्ञांच्या 8 व्या बैठकीचे आयोजन
  • भारताने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगाल उपसागरातील बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी (बिमस्टेक) देशांच्या कृषी तज्ञांच्या 8 व्या बैठकीचे आयोजन केले.
  • बैठकीचे अध्यक्ष  कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि आयसीएआर चे महासंचालक डॉ.त्रिलोचन महापात्रा होते.
  • बिम्सटेकमध्ये दक्षिण आशियातील पाच (बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका) आणि आग्नेय आशियातील म्यानमार व थायलंडसह सात सदस्य देशांचा समावेश आहे.
  • बिम्सटेक सदस्य देशांनी कृषी क्षेत्रातील मास्टर आणि पीएचडी कार्यक्रमांसाठी सहा स्लॉट शिष्यवृत्ती आणि क्षमता विकास तसेच प्रशिक्षणासाठी असलेल्या उपक्रमांसाठी भारताच्या सहभागाचे कौतुक केले.
  • बिम्सटेकची स्थापना 1997 मध्ये परस्पर व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि या क्षेत्राचा सांस्कृतिक, तांत्रिक आणि आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

पुरस्कार बातम्या (MPSC daily current affairs)

 12. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 ची यादी जाहीर

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_14.1
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे, विजेत्यांना मनिला येथील रॅमन मॅगसेसे केंद्रात 28 नोव्हेंबरच्या कार्यक्रमादरम्यान औपचारिकपणे मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे आणि आशियायी नोबेल मानला जातो. फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
  • दरवर्षी आशियातील व्यक्ती किंवा संस्थांना निस्वार्थी भावनेने लोकांची सेवा केल्याबद्दल दिला जातो.
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 च्या पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे;
  • मुहम्मद अमजद साकीब: पाकिस्तानातील सर्वात मोठ्या सूक्ष्म वित्त संस्थांची स्थापना केली, लाखो कुटुंबांची सेवा केली.
  • फिरदौसी कादरी: बांगलादेशी शास्त्रज्ञ ज्यांनी लक्षावधी लोकांचे प्राण वाचवलेल्या लसींचा शोध लावण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
  • स्टीव्हन मन्ची: एक मानवतावादी जे आग्नेय आशियातील विस्थापित निर्वासितांना त्यांचे जीवन पुन्हा सुरु करण्यास मदत करत आहे.
  • वॉचडॉक: इंडोनेशियातील समस्या अधोरेखित करण्यासाठी कल्पकतेने डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग आणि पर्यायी व्यासपीठ एकत्र करणारे एक प्रकाशन गृह.
  • रॉबर्टो बालोन: दक्षिण फिलिपिन्समधील एक मच्छीमार ज्यांनी समुदायाला त्यांच्या समृद्ध समुद्रीय संसाधने आणि त्यांच्या उपजीविकेचे प्राथमिक स्त्रोत पुनर्संचयित करण्यासाठी नेतृत्व केले आहे.

नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)

 13. आयआरएस अधिकारी जे बी महापात्रा यांची सीबीडीटी चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_15.1
जे बी महापात्रा
  • आयआरएस अधिकारी जे बी महापात्रा यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) मंजुरी दिली.
  • त्यांनी यापूर्वीच सीबीडीटीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते पीसी मोदी यांची जागा घेतील.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ स्थापन: 1924
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ मुख्यालय: नवी दिल्ली

निधन बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

 14. बिग बॉस 13 चे विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_16.1
सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन
  • बिग बॉस 13 विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले आहे. तो हम्प्टी शर्मा की दुल्हनिया  सारख्या चित्रपटांचा भाग राहिला आहे.
  • त्याची भूमिका असलेली शेवटची धारावाहिक ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ होती ज्यात त्याने अगस्त्याची भूमिका साकारली होती.
  • त्याने “बालिका वधू” आणि “दिल से दिल तक” सारख्या डेली सोप मध्ये काम केले होते.
  • “झलक दिखला जा 6”, “फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी” आणि “बिग बॉस 13” सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याने भाग घेतला होता.

 15. हुर्रियतचे नेते सय्यद अली गिलानी यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 02-September-2021_17.1
सय्यद अली गिलानी यांचे निधन
  • काश्मिरी फुटीरतावादी नेते आणि ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स (एपीएचसी) चे माजी अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
  • सय्यद अली गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 रोजी तहसील बांदीपोरा येथील झूरी मुंज गावातील सय्यद पीर शाह गिलानी यांच्या घरी झाला.
  • गिलानी यांनी आपले प्राथमिक शिक्षण सोपोर येथे प्राप्त केले आणि लाहोर, पाकिस्तानच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!