Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 13 ऑगस्ट 2021
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 13 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.
अर्थव्यवस्था बातम्या (Daily Current Affairs in Marathi)
1. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे बाजारमूल्य 3 लाख करोड झाले

- एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मार्केट कॅपिटलायझेशन (बाजार मुल्य) पहिल्यांदा 3 लाख करोड रुपयांवर पोहोचले.
- एचसीएल कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो नंतर हा टप्पा गाठणारी चौथी भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी ठरली आहे.
- टीसीएस आणि इन्फोसिस नंतर एचसीएल टेक ही महसूलानुसार तिसरी सर्वात मोठी भारतीय आयटी सेवा कंपनी आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ: सी विजयकुमार.
- एचसीएल टेक्नॉलॉजीजची स्थापना: 11 ऑगस्ट 1976.
- एचसीएल टेक्नॉलॉजीज मुख्यालय: नोएडा
करार बातम्या (Current Affairs for mpsc)
2. भारतीय नौदल, आयडीएफसी फर्स्ट बँक यांचे ‘ऑनर फर्स्ट’ बँकिंग सोल्यूशन्स

- भारतीय नौदलाने ‘ऑनर फर्स्ट’ बँकिंग सोल्यूशन्स सुरू करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (आयडीएफसी) फर्स्ट बँकेशी सामंजस्य करार केला आहे. ‘ऑनर फर्स्ट’ हे भारतीय नौदलातील कर्मचारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी प्रीमियम बँकिंग सोल्यूशन आहे.
- ऑनर फर्स्ट डिफेन्स खाते 46 लाख रु. चे मोफत वर्धित वैयक्तिक अपघात विमा कव्हरसह ऑन-ड्यूटी आणि ऑफ-ड्यूटी दोन्ही घटनांसाठी देते. याशिवाय इतर अनेक फायदे नौदलाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- आयडीएफसी फर्स्ट बँक स्थापना: 2018
- आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ: व्ही. वैद्यनाथन
- आयडीएफसी फर्स्ट बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 13 August 2021
3. इंडियन बँकेने पॅरालिम्पिक समितीसोबत सामंजस्य करार केला

- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने टोकियो, जपानमध्ये 24 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक गेम्सच्या बँकिंग भागीदार होण्यासाठी भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) सह एक सामंजस्य करार केला आहे.
- या करारानुसार बँक पॅरालिम्पिक मध्ये भाग खेळाडूंना तयारी करण्यासाठी वर्षभर आर्थिक सहाय्य प्रदान करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- इंडियन बँकेचे मुख्यालय: चेन्नई
- इंडियन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पद्मजा चुंदुरू
- इंडियन बँक स्थापना: 1907
- भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा: दीपा मलिक
क्रीडा बातम्या(daily Current Affairs for mpsc)
4. उन्मुक्त चंद याची निवृत्तीची घोषणा

- 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- 2012 च्या अंडर -19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद 111 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
- उन्मुक्त चंदने घरगुती क्रिकेटमध्ये इंडिया ए तसेच दिल्ली आणि उत्तराखंडचे नेतृत्व केले आहे आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
5. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारत

- आगामी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारत आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवणार आहे, ज्यात 9 क्रीडा शाखांमध्ये 54 दिव्यांग-खेळाडू सहभागी होतील.
- 54 सदस्यीय भारतीय चमूला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी औपचारिक आणि आभासी पद्धतीने शुभेच्छा आणि निरोप दिला.
- 2020 उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धा टोकियो, जपानमध्ये 24 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहेत.
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021
बैठक आणि परिषद बातम्या(Current Affairs for mpsc)
6. भारताने आयबीएसए पर्यटन मंत्र्यांची आभासी बैठक आयोजित केली

- भारताने आभासी व्यासपीठाद्वारे आयबीएसए (भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका) पर्यटन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
- ब्राझील फेडरेटिव्ह रिपब्लिकचे पर्यटन मंत्री, गिल्सन मचाडो नेटो आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकचे पर्यटन उपमंत्री, फिश आमोस महल्लाले, यांनी भारताच्या आयबीएसए अध्यक्षतेखालील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भाग घेतला.
- या बैठकीत सदस्य देशांमधील पर्यटन सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यात आले आणि पर्यटन क्षेत्रावरील कोव्हीड -19 साथीच्या प्रभावावर मात करण्यासाठी पर्यटनामध्ये सहकार्य बळकट करण्याचे ठरविण्यात आले.
- प्रवास आणि पर्यटनाच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी सहकार्य आणि उन्नतीसाठी दस्तऐवज या संयुक्त वक्तव्याचा स्वीकार करून बैठकीची सांगता झाली.
7. एससीओ सदस्यांच्या कृषी मंत्र्यांची सहावी परिषद

- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांच्या 6 व्या बैठकीला संबोधित केले आहे. दुशान्बे येथे ताजिकिस्तानच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
- बैठकीदरम्यान नरेंद्र सिंह तोमर यांनी भारत सरकारकडून ग्रामीण युवक, शेतकरी आणि शेत महिलांना सशक्त करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार करण्यासाठी भारतातर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
- तोमर यांच्याबरोबर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शविली.
संरक्षण बातम्या(MPSC daily current affairs)
8. भारतीय नौदलाने सीकॅट युद्धसरावात भाग घेतला

- भारतीय नौदलाने आपल्या समुद्री कौशल्य दाखविण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या नौदलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण-पूर्व आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (सीकॅट) सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भाग घेतला.
- 2002 मध्ये सुरु झालेल्या या सरावाची ही 20 वी आवृत्ती असून यात भारत आणि अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ब्रुनेई, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, मालदीव, न्यूझीलंड, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तिमोर-लेस्ते, युनायटेड किंगडम आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
9. पाकिस्तानने गझनावी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

- पाकिस्तानी लष्कराने अण्वस्त्र सक्षम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनावीची यशस्वी चाचणी केली.
- गझनवी क्षेपणास्त्र 290 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते आणि अण्वस्त्र तसेच पारंपारिक युद्धसामुग्री दोन्ही वाहून नेण्यास सक्षम आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- पाकिस्तानचे अध्यक्ष: आरिफ अल्वी
- पाकिस्तानचे पंतप्रधान: इम्रान खान
विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या(Current Affairs for MPSC)
10. चंद्रयान -2 यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले

- भारताचे चांद्रयान -2 मोहिमेने 2019 मध्ये कदाचित चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यास असमर्थ ठरले असेल, परंतु त्याच्यासोबत असलेले ऑर्बिटर पृथ्वीवरील वैज्ञानिकांना उपयुक्त माहिती देत आहे.
- चांद्रयान -2 ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणू (H2O) आणि हायड्रॉक्सिल (OH) च्या अस्तित्वाची पुष्टी केल्याचे एका शोधनिबंधातून समोर आले आहे.
- करंट सायन्स जर्नलमध्ये हे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.हा शोध ऑर्बिटरच्या इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (आयआयआरएस) ने केला आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- इस्रो अध्यक्ष: के सिवन.
- इस्रो मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक.
- इस्रोची स्थापना: 15 ऑगस्ट 1969
Current Affairs Daily Quiz In Marathi | 14 August 2021
पुस्तके आणि लेखक बातम्या(Current Affairs for mpsc in Marathi)
11. ‘गतिशील भारत: मोदी सरकारची 7 वर्षे’

- उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आपल्या निवासस्थानी “अॅसेलरेटिंग इंडिया:7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट” (‘गतिशील भारत: मोदी सरकारची 7 वर्षे’) या पुस्तकाचे अनावरण केले.
- पंतप्रधान मोदी यांच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
