Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Current Affairs in Marathi | 13...

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 13 August 2021

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 13 ऑगस्ट 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 13 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

राज्य बातम्या(Daily Current Affairs in Marathi)

 1. जम्मू -काश्मीरमध्ये “बंगस आवाम मेळा”

“Bungus Awaam Mela” in J&K | जम्मू -काश्मीरमध्ये “बंगस आवाम मेळा”
जम्मू -काश्मीरमध्ये “बंगस आवाम मेळा”
  • जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कुपवाडा जिल्ह्यातील बंगस व्हॅली येथे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी खेड्यातील खेळ, स्थानिक स्पर्धा आणि इतर उपक्रम असलेल्या बंगस आवाम मेळाव्याचे उद्घाटन केले.
  • या वेळी मनोज सिन्हा यांनी वन आणि पर्यटन विभागाला या व्हॅलीमध्ये “इको-टूरिझम” ला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले.

 2. इंदूर: भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर

Indore: India’s first ‘Water Plus' certified city | इंदूर: भारतातील पहिले 'वॉटर प्लस' प्रमाणित शहर
इंदूर: भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर
  • स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर होण्याचा मान मध्य प्रदेश राज्यातील इंदूर ला मिळालेला आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूर च्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे.
  • आपल्या प्रशासनाद्वारे नद्या आणि नाल्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या शहराला वॉटर प्लस सिटी प्रमाणपत्र दिले जाते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रदान केलेल्या प्रोटोकॉल आणि टूलकिट नुसार, घरांमधून, व्यावसायिक आस्थापनांमधून सोडलेले सर्व सांडपाणी समाधानकारक पातळीवर प्रक्रिया करूनच पर्यावरणात सोडले असेल तर शहराला वॉटर प्लस म्हणून घोषित केले जाऊ शकते.
  • इंदूर शहरातील 30 टक्के सांडपाणी योग्य प्रक्रिया करून बगीचे, बांधकाम इत्यादी ठिकाणी वापरले जाते.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 12 August 2021

अर्थव्यवस्था बातम्या(Current Affairs for mpsc)

 3. भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत घसरण

Number Of Billionaires In India Dropped | भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत घसरण
भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत घसरण
  • राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राज्य सभेत दिलेल्या निवेदनानुसार 2020-21 च्या महामारीग्रस्त आर्थिक वर्षात भारतातील अब्जाधीशांची संख्या 141 वरून घसरून 136 वर आली आहे. ही गणना आयकर परताव्यामध्ये घोषित केलेल्या एकूण उत्पन्नावर आधारित आहे.
  • आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये, एकूण वार्षिक उत्पन्न 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींची संख्या 77 होती.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) उपलब्ध माहितीनुसार, प्रत्यक्ष करांतर्गत अब्जाधीश या शब्दाची कायदेशीर किंवा प्रशासकीय व्याख्या नाही तसेच 01 एप्रिल 2016 पासून संपत्ती कर रद्द करण्यात आला आहे त्यामुळे सीबीडीटी वैयक्तिक करदात्याच्या संपूर्ण संपत्तीबद्दल अधिक माहिती घेऊ शकत नाही.

 4. जुलैमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन 5.59% झाली

Retail inflation eases to 5.59% in July | जुलैमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन 5.59% झाली
जुलैमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन 5.59% झाली
  • मुख्यतः अन्नधान्याच्या किंमती मंदावल्यामुळे किरकोळ महागाई जुलैमध्ये 5.59% पर्यंत कमी झाली आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित चलनवाढ जूनमध्ये 6.26% आणि जुलै 2020 मध्ये 6.73% होती. अन्नपदार्थांची महागाई मागील महिन्यात 5.15% वरून जुलैमध्ये 3.96% पर्यंत कमी झाली.
  • या महिन्याच्या सुरुवातीला, आरबीआयने 2021-22 दरम्यान सीपीआय चलनवाढ 5.7%-दुसऱ्या तिमाहीत 5.9%, तिसऱ्या मध्ये 5.3% आणि आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 5.8% असा अंदाज व्यक्त केला.

पुरस्कार बातम्या(daily Current Affairs for mpsc)

 5. भारतीय संघाने यूएस इनोव्हेशन पुरस्कार जिंकला

Indian Team Wins US Innovation Award | भारतीय संघाला यूएस इनोव्हेशन पुरस्कार
भारतीय संघाला यूएस इनोव्हेशन पुरस्कार
  • भारतीय कंपनी सॉफ्टवर्दीला अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल सायन्स फाउंडेशन इनोव्हेशन-कॉर्प्स (एनएसएफ आय-कॉर्प्स) संघ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • सॉफ्टवर्दीचा पुरस्कारप्राप्त प्रकल्प ‘स्टोकॅस्टिक मॉडेलिंग, डिझाइन सिम्युलेशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे संवेदनशीलता विश्लेषण जसे मुद्रित-सर्किट-बोर्ड (पीसीबी) साठी अत्याधुनिक संगणकीय पद्धती विकसित करण्यावर केंद्रित आहे, जो चालकविरहित वाहने आणि ऊर्जा-कार्यक्षम स्मार्ट इमारती सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

अहवाल आणि निर्देशांक बातम्या (Current Affairs for mpsc)

 6. स्कायट्रॅक्सच्या पहिल्या 100 यादीत 4 भारतीय विमानतळ

4 Indian airports in Skytrax’s top 100 list | स्कायट्रॅक्सच्या पहिल्या 100 यादीत 4 भारतीय विमानतळ
स्कायट्रॅक्सच्या पहिल्या 100 यादीत 4 भारतीय विमानतळ
  • नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाला 2021 च्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये जगातील पहिल्या 50 सर्वोत्तम विमानतळांमध्ये स्थान मिळाले असून ते 45 व्या स्थानावर आहे. 2020 च्या यादीत ते 50 व्या स्थानावर होते.
  • स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सची यादी यूकेस्थित स्कायट्रॅक्स या सल्लागार कंपनी तयार करते.
  • या यादीनुसार कतारमधील दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ “जगातील सर्वोत्तम विमानतळ” ठरले आहे. तर हानेदा विमानतळ(टोकियो); चांगी विमानतळ (सिंगापूर); इंचियोन आंतरराष्ट्रीय विमानतळ (दक्षिण कोरिया) आणि  नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोकियो) ही विमानतळे अनुक्रमे 2 ऱ्या, 3 ऱ्या आणि 4 थ्या क्रमांकावर आहेत.
  • हैदराबाद: 64 (2020 मध्ये 71 व्या स्थानावर); मुंबई: 65 (2020 मध्ये 52 व्या स्थानावर); बेंगळुरू: 71 (2020 मध्ये 68 व्या स्थानावर) ही भारतातील इतर 3 विमानतळे पहिल्या शंभरात आहेत.

महत्त्वाचे दिवस(MPSC daily current affairs)

 7. 13 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस

13 August: International Lefthanders Day | 13 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस
13 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस
  • डावखुऱ्या लोकांचे वेगळेपण आणि फरक साजरा करण्यासाठी आणि डावखुरा असण्याचे फायदे आणि तोटे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस आयोजित केला जातो.
  • ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2019 च्या अभ्यासानुसार, डावखुरे लोकांचे संभाषण कौशल्य, उजव्या हाताच्या लोकांपेक्षा चांगले असण्याची शक्यता आहे.
  • लेफ्टहँडर्स इंटरनॅशनलचे संस्थापक डीन आर कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला. पुढे, 1990 मध्ये, लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल क्लबची स्थापना केली गेली आणि 1992 मध्ये, “डावखुरे असण्याचे फायदे आणि तोटे” याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी क्लबने आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे सुरू केला.

 8. 13 ऑगस्ट: जागतिक अवयव दान दिवस

13 August: World Organ Donation Day | 13 ऑगस्ट: जागतिक अवयव दान दिवस
13 ऑगस्ट: जागतिक अवयव दान दिवस
  • दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दान दिन पाळला जातो. अवयव दानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
  • अवयव दान म्हणजे दात्याचे अवयव जसे की हृदय, यकृत, मूत्रपिंड, आतडे, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड व्यक्ती मृत झाल्यावर एखाद्या अवयवाची गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करणे.एक अवयव दाता साधारणपणे आठ लोकांचे प्राण वाचवू शकतो.

Current Affairs Daily Quiz In Marathi | 13 August 2021

क्रीडा बातम्या (Current Affairs for MPSC)

 9. 130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार

130th Durand Cup to be held at Kolkata | 130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार
130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार
  • आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा,ड्युरँड चषक एका वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा भरविण्यात येणार आहे. ड्युरँड चषकाची 130वी आवृत्ती कोलकाता येथे 05 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. कोव्हीड-19 च्या साथीमुळे, गेल्या हंगामात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
  • ही प्रतिष्ठित स्पर्धा प्रथम 1888 मध्ये डागशाई (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली होती आणि तिचे नाव भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरँड यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
  • सुरुवातीला केवळ ब्रिटीश सैनिकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्ती  राखण्याचा उद्देशाने ही स्पर्धा भरविण्यात यायची नंतर मात्र ती नागरिकांसाठी खुली करण्यात आली. सध्या ही जगातील अग्रगण्य क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जाते.
  • मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे ड्युरँड चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी सोळा वेळा स्पर्धा जिंकली आहे.
  • विजेत्या संघाला तीन करंडक म्हणजेच राष्ट्रपती चषक (प्रथम डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सादर केलेले), ड्युरँड चषक (मूळ बक्षीस – एक फिरता चषक) आणि शिमला करंडक (प्रथम 1903 मध्ये शिमलाच्या नागरिकांनी सादर केले आणि 1965 नंतर एक फिरता चषक) प्रदान केले जाते.

 10. शाकिब अल हसन, स्टॅफनी टेलर- जुलै महिन्यातील सर्वोत्तम आयसीसी खेळाडू

शाकिब अल हसन, स्टॅफनी टेलर- जुलै महिन्यातील सर्वोत्तम आयसीसी खेळाडू
शाकिब अल हसन, स्टॅफनी टेलर- जुलै महिन्यातील सर्वोत्तम आयसीसी खेळाडू

बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि वेस्टइंडिजची कर्णधार स्टॅफनी टेलर यांना जुलैसाठी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात आयसीसीद्वारे सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

Current Affairs in Marathi | 13 August 2021_13.1