Marathi govt jobs   »   Study Materials   »   संयुक्त महाराष्ट्र चळवळ

Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळ : MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

संयुक्त महाराष्ट्र चळवळ 

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताचे वेगवेगळे प्रांत तयार केले होते. परंतु ती भाषावार प्रांत रचना (एक सारखी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रांत) नव्हती. इ. स. 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते.

सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन (Samyukta Maharashtra Movement) किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि 1 मे 19 60 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. यासाठी 105 आंदोलकांनी हौतात्म्य स्वीकारले. आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 व इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्वाचा आहे. आज आपण या लेखात Samyukta Maharashtra Movement बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : विहंगावलोकन

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : विहंगावलोकन
श्रेणी अभ्या साहित्य
उपयोगिता MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा इतिहास
लेखाचे नाव संयुक्त महाराष्ट्र चळवळ
लेखातील मुख्य घटक

संयुक्त महाराष्ट्र चळवळ विषयी सविस्तर माहिती

Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळ

Samyukta Maharashtra Movement: इ. स. बाराव्या शतकात मराठी भाषिक लोकांच्यात राजकीय व सांस्कृतिक अस्मितेची जाणीव वाढीस लागली पण राजकीय दृष्टया मराठी भाषिक लोक विखुरलेले राहिले. इंग्रजांच्या काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागलेले होते. प. महाराष्ट्राचा भाग मुंबई राज्यात मोडत होता. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तर मराठवाडयाचे पाच जिल्हे हैदराबाद संस्थानात होते. विदर्भाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते. या सर्व भागांना एकत्र आणून त्यांचे भाषेच्या आधारे एक राज्य बनविण्यात यावे अशी मागणी त्या काळात होत होता. त्यामुळे कालांतराने Samyukta Maharashtra Movement वाढू लागली. मराठी भाषिकांचा एक प्रांत निर्माण व्हावा ही मागणी जोर धरू लागली.

Historical Background of Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चवळळीचा इतिहास

Historical Background of Samyukta Maharashtra Movement:  भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु भारतीय संविधानात भाषिक प्रदेश राज्यांची स्थापना करण्यासंबंधी नियमावली अंतर्भूत केली नव्हती. तथापि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 1921 च्या अहमदाबाद येथील अधिवेशनात भाषिक राज्य होणे आवश्यक आहे, असा ठराव संमत झाला होता. तरीसुद्धा तत्कालीन नेहरू सरकारने भाषावार प्रांताबाबत नकारात्मक भूमिका स्वीकारली. सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ‘JVP’ समिती नेमली.

JVP समितीचे सदस्य

  • जवाहरलाल नेहरू
  • वल्ल्भभाई पटेल
  • पट्टाभि सीतारामय्या

या समितीने भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न अग्रक्रमाने हाती घेतला जाऊ नये, अशी शिफारस केली.

Central Government Major Problem of Linguistic regionalization | भाषावार प्रांतरचना करण्यासाठी केंद्र सरकारच्या अडचणी

Central Government Major Problem of Linguistic regionalization: भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीत केंद्र सरकार व पं. नेहरू यांच्या मते चार महत्त्वाच्या अडचणी होत्या त्या पुढीलप्रमाणे

  • भाषावार प्रांतरचनेचा निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये कारण शेकडो वर्षे एकसाथ राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीत एकदम मोठा बदल घडवून आणणे इष्ट नसते.
  • प्रत्येक भाषिक गटात अल्पसंख्याक भाषिक घटक आहेत. त्यांचा या मागण्यांना विरोध आहे. त्यांच्या आक्षेपांचा योग्य असा विचार झाला पाहिजे.
  • देशापुढे विकासाचे व ऐक्याचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना भाषावार प्रांतरचनेसारखा लोकांचे विभाजन करणारा विषय अग्रक्रमाने रेटू नये. त्यामुळे हिंसक चळवळी व प्रतिचळवळी निर्माण होतील.
  • भारतातील सांस्कृतिक विविधता हे देशाच्या राष्ट्रीयत्वाचे वैभव आहे. हैदराबादसारखे चार भाषा बोलणारे, सामायिक भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारे राज्य आपण कायम टिकविले पाहिजे.

Samyukta Maharashtra Movement: Akola Agreement | संयुक्त महाराष्ट्र चवळळीमधील अकोला करार

Samyukta Maharashtra Movement: Akola Agreement: महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन दिनांक 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य प्रश्न मध्यप्रांताचा भाग असलेल्या विदर्भाचा होता. संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याबरोबर ‘अकोला करार’ केला. या करारात तीन मुद्दे महत्त्वाचे होते.

  • मध्यप्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही.
  • संयुक्त महाराष्ट्राची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली, तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाठिंबा दयावा.
  • विदर्भाने मध्यप्रांताचा वा संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून राहावे असा पर्याय जर दिला असेल, तर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय निवडावा.

Samyukta Maharashtra Movement: Fazal Ali Commission | संयुक्त महाराष्ट्र चळवळ: फजल अली आयोग

राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. पं. हृदयनाथ कुंझरू व सरदार पणिक्कर हे या आयोगाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतरांनी आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याची मागणी केली. या आयोगाने आपला अहवाल 10 ऑक्टोबर 1955 रोजी प्रसिद्ध केला. आयोगाने पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या निर्मितींची शिफारस केली. हैदराबाद राज्य कायम ठेवावे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, अशाही आयोगाच्या शिफारशी होत्या पण हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा धरून, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातेत समावेश करावा व मुंबईस राजधानी करून गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे, असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला.

Samyukta Maharashtra Movement
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुंबई

The beginning of Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुरवात

The beginning of Samyukta Maharashtra Movement: केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरू झाले. 21 नोव्हेंबर 1955 रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 15 माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची 6 फेबुवारी 1956 रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (1952-56) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण 31,०92 इसमांना अटक करण्यात आली, 19,445 लोकांवर खटले गुदरले व त्यांतील 18,419 लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात 537 वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे 500 दुकाने लुटली 80 ट्रामगाडयांची आणि 200 बसगाडयांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये 105 माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.

Samyukta Maharashtra Movement
हुतात्मा स्मारक

Formation of Two States after Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर दोन नवीन राज्यांची निर्मिती

Formation of Two States after Samyukta Maharashtra Movement: महाद्वैभाषिक स्थापन झाल्यानंतर गुजरातेत महागुजरातसाठी महागुजरात परिषदेची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीला गुजरातच्या शहरी भागात पाठिंबा मिळू लागला. दोन्ही राज्यांत लोकमत विरोधात जात आहे, हे पाहून गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये वेगळी केली पाहिजेत, अशी भावना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निर्माण होऊ लागली. द्वैभाषिक चालवताना आर्थिक साधनांच्या वाटपाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री गोविंद वल्ल्भ पंत आणि इतरांनी शेवटी याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य लोकसंख्या असणारा जिल्हा, खानदेश आणि उंबरगाव नजिकची अनेक गावे गुजरातला देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला 50 कोटी रूपये देण्याचे मान्य करण्यात आले.

01 मे 1960  रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. गुजरात राज्याचे उद्धाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्धाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातेत प्रथमच सामील होत होते. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनत होता. नंतरच्या काळात विकासाच्या प्रश्नाबाबत विविध उपभागांत संघर्ष होऊ नये म्हणून या राज्यांच्या स्थापनेच्या वेळी घटनादुरूस्ती करून घटनेच्या 371 कलमामध्ये विदर्भ, सौराष्ट्र व इतर भागांसाठी विकास परिषदांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. या दोन्ही राज्यांची वाटचाल 1960 नंतर सुरू असून सध्या ती भारतातील सर्वांत विकसित अशी राज्ये आहेत.

Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळ : MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य_5.1

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) 
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
31 डिसेंबर  2023 जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड
1 जानेवारी  2024 गांधी युग गांधी युग
3 जानेवारी 2024 रक्ताभिसरण संस्था रक्ताभिसरण संस्था
5 जानेवारी 2024

 

प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी   प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी
  7 जानेवारी  2024 1857 चा उठाव 1857 चा उठाव
9 जानेवारी  2024  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी  प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी
11 जानेवारी 2024 राज्यघटना निर्मिती राज्यघटना निर्मिती
13 जानेवारी 2024 अर्थसंकल्प अर्थसंकल्प
15 जानेवारी 2024 महाराष्ट्र – स्थान व विस्तार महाराष्ट्र – स्थान व विस्तार
17 जानेवारी 2024 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल
19 जानेवारी 2024 मूलभूत हक्क मूलभूत हक्क
21 जानेवारी 2024 वैदिक काळ वैदिक काळ
23 जानेवारी 2024 सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
25 जानेवारी 2024 शाश्वत विकास शाश्वत विकास
27 जानेवारी 2024 महर्षी कर्वे व त्यांचे कार्य महर्षी कर्वे व त्यांचे कार्य
29 जानेवारी 2024 1942 छोडो भारत चळवळ 1942 छोडो भारत चळवळ
31 जानेवारी 2024 भारतीय रिझर्व्ह बँक  भारतीय रिझर्व्ह बँक 

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे
2 फेब्रुवारी 2024 स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था
3 फेब्रुवारी 2024 रौलेट कायदा 1919 रौलेट कायदा 1919
4 फेब्रुवारी 2024 गारो जमाती गारो जमाती
5 फेब्रुवारी 2024 लाला लजपत राय लाला लजपत राय
6 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 15 भारतीय राज्यघटनेचे कलम 15
7 फेब्रुवारी 2024 भारतातील हरित क्रांती भारतातील हरित क्रांती
8 फेब्रुवारी 2024 मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे
9 फेब्रुवारी 2024 गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण
10 फेब्रुवारी 2024 भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग
11 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत
12 फेब्रुवारी 2024 महागाईचे प्रकार आणि कारणे महागाईचे प्रकार आणि कारणे
13 फेब्रुवारी 2024 श्वसन संस्था श्वसन संस्था
14 फेब्रुवारी 2024 अलैंगिक प्रजनन  अलैंगिक प्रजनन 
15 फेब्रुवारी 2024 सातवाहन कालखंड सातवाहन कालखंड
16 फेब्रुवारी 2024 बिरसा मुंडा बिरसा मुंडा
17 फेब्रुवारी 2024 पंचायतराज समित्या पंचायतराज समित्या
18 फेब्रुवारी 2024 कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड
19 फेब्रुवारी 2024 1991 च्या आर्थिक सुधारणा 1991 च्या आर्थिक सुधारणा
20 फेब्रुवारी 2024 जगन्नाथ शंकरशेठ जगन्नाथ शंकरशेठ
21 फेब्रुवारी 2024 पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई
22 फेब्रुवारी 2024 भारतीय राज्यघटनेचे कलम 370 भारतीय राज्यघटनेचे कलम 370
23 फेब्रुवारी 2024 शिक्षणविषयक आयोग व समित्या शिक्षणविषयक आयोग व समित्या
24 फेब्रुवारी 2024 आम्ल पर्जन्य आम्ल पर्जन्य
25 फेब्रुवारी 2024 73 वी घटना दुरुस्ती कायदा 73 वी घटना दुरुस्ती कायदा
26 फेब्रुवारी 2024 संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
27 फेब्रुवारी 2024 गोदावरी नदी खोरे गोदावरी नदी खोरे
28 फेब्रुवारी 2024 सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त
29 फेब्रुवारी 2024 राज्य लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 मार्च 2024 केंद्र – राज्य संबंध केंद्र – राज्य संबंध
2 मार्च 2024 दिल्ली सल्तनत दिल्ली सल्तनत
3 मार्च 2024 राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न
4 मार्च 2024
भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर भाऊ दाजी लाड व बाळशास्त्री जांभेकर
5 मार्च 2024
भारतातील सहकारी संस्था भारतातील सहकारी संस्था
6 मार्च 2024 बंगालची फाळणी बंगालची फाळणी
7 मार्च 2024 डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8 मार्च 2024 मोपला बंड मोपला बंड
9 मार्च 2024 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976
10 मार्च 2024
भारतातील खनिज संसाधने भारतातील खनिज संसाधने
11 मार्च 2024
गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख व महादेव गोविंद रानडे
12 मार्च 2024
मानवी शरीर : अस्थिसंस्था मानवी शरीर : अस्थिसंस्था
13 मार्च 2024 मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा 1919 मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा 1919
14 मार्च 2024 वित्त आयोग वित्त आयोग
15 मार्च 2024
भारतातील राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 1977 भारतातील राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 1977
16 मार्च 2024 भारतातील प्रमुख उद्योग भारतातील प्रमुख उद्योग
17 मार्च 2024 मुस्लिम लीग (1906) मुस्लिम लीग (1906)
18 मार्च 2024 मानवी मेंदू : रचना व कार्य मानवी मेंदू : रचना व कार्य
19 मार्च 2024 चौरीचौरा घटना 1922 चौरीचौरा घटना 1922
20 मार्च 2024 महाराष्ट्रातील धरणे महाराष्ट्रातील धरणे
21 मार्च 2024 महर्षी वि.रा.शिंदे महर्षी वि.रा.शिंदे
22 मार्च 2024 मानवी दातांचे प्रकार आणि त्यांची कार्ये मानवी दातांचे प्रकार आणि त्यांची कार्ये
23 मार्च 2024 भारत सरकार कायदा 1935 भारत सरकार कायदा 1935
24 मार्च 2024 पेशी : रचना व कार्य पेशी : रचना व कार्य
25 मार्च 2024 विशेष तरतूद कायदा 1991, कलम 371 (A ते J) विशेष तरतूद कायदा 1991, कलम 371 (A ते J)
26 मार्च 2024 पर्यावरणीय पिरॅमिड पर्यावरणीय पिरॅमिड
27 मार्च 2024 वातावरणाचे स्तर आणि त्याची रचना वातावरणाचे स्तर आणि त्याची रचना
28 मार्च 2024 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
29 मार्च 2024 राज्य मानवी हक्क आयोग राज्य मानवी हक्क आयोग
30 मार्च 2024
सनदी कायदे – 1793,1813 आणि 1833 सनदी कायदे – 1793,1813 आणि 1833
31 मार्च 2024 राजा हर्षवर्धन राजा हर्षवर्धन

 

MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS)
तारीख वेब लिंक  अँप लिंक 
1 एप्रिल 2024 इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला
2 एप्रिल 2024   विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ)
3 एप्रिल 2024 जेट स्ट्रीम्स जेट स्ट्रीम्स
4 एप्रिल 2024 क्रयशक्ती समानता सिद्धांत क्रयशक्ती समानता सिद्धांत
5 एप्रिल 2024 पंचसृष्टि वर्गीकरण पंचसृष्टि वर्गीकरण
6 एप्रिल 2024 पश्चिम घाट पश्चिम घाट
7 एप्रिल 2024 राज्य पुनर्रचना – कायदा व आयोग राज्य पुनर्रचना – कायदा व आयोग
8 एप्रिल 2024 धन विधेयक धन विधेयक
9 एप्रिल 2024 सिंग सभा आंदोलन व अकाली चळवळ सिंग सभा आंदोलन व अकाली चळवळ
10 एप्रिल 2024 सरकारिया आयोग सरकारिया आयोग
11 एप्रिल 2024 भारतातील महत्त्वाचे पर्वतीय मार्ग भारतातील महत्त्वाचे पर्वतीय मार्ग
12 एप्रिल 2024 द्विराष्ट्र सिद्धांत द्विराष्ट्र सिद्धांत
13 एप्रिल 2024 किण्वन प्रक्रिया किण्वन प्रक्रिया
14 एप्रिल 2024 पल्लव राजवंश पल्लव राजवंश
15 एप्रिल 2024 वन संवर्धन कायदा 1980 वन संवर्धन कायदा 1980
16 एप्रिल 2024 स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट
17 एप्रिल 2024 लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर
18 एप्रिल 2024 वाळवंटीकरण वाळवंटीकरण
19 एप्रिल 2024 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
20 एप्रिल 2024 भारत सेवक समाज भारत सेवक समाज
22 एप्रिल 2024 वहाबी व अलिगढ चळवळ वहाबी व अलिगढ चळवळ
23 एप्रिल 2024 सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू
24 एप्रिल 2024 संसदेतील शून्य तास संसदेतील शून्य तास
25 एप्रिल 2024 ब्रिटिश भारतातील शिक्षण प्रणाली ब्रिटिश भारतातील शिक्षण प्रणाली
26 एप्रिल 2024 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
27 एप्रिल 2024 वुडचा खलिता वुडचा खलिता
28 एप्रिल 2024 वस्तू आणि सेवा कर (GST) वस्तू आणि सेवा कर (GST)
29 एप्रिल 2024 सातपुडा व्याघ्र प्रकल्प सातपुडा व्याघ्र प्रकल्प
30 एप्रिल 2024 शहरी स्थानिक संस्था प्रशासन तुलनात्मक अभ्यास शहरी स्थानिक संस्था प्रशासन तुलनात्मक अभ्यास

Samyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्र चळवळ : MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य_6.1

MPSC Combine Group B & Group C (Pre + Mains) Exam Foundation 2024 | Marathi | Video Course By Adda247

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप MPSC MahapackMPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

What is the reason for the Samyukta Maharashtra movement?

The Samyukta Maharashtra movement was started for the formation of a linguistic state of Maharashtra.

Who was the first chief minister of Samyukta Maharashtra?

Yashavantrao Chavhan was the first chief minister of Samyukta Maharashtra.

Who did the important work of spreading the Samyukta Maharashtra Movement in the ruler areas?

Newspapers like Prabodhan, Kesari, Sakal, Navakal, Navyug, Prabhat, and many such newspapers labored on the awakening of the people.