Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतीय अर्थसंकल्प

भारतीय अर्थसंकल्प : MPSC 2024 अभ्यास साहित्य

भारतीय अर्थसंकल्प

भारतीय अर्थसंकल्प : भारतीय अर्थव्यवस्था हा आगामी काळातील MPSC 2024 भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण MPSC 2024 परीक्षेसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी भारतीय अर्थसंकल्प व त्यावरील प्रश्न – उत्तरे या टॉपिक वर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय अर्थसंकल्प: विहंगावलोकन

खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.

भारतीय अर्थसंकल्प : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय भारतीय अर्थव्यवस्था
टॉपिकचे नाव भारतीय अर्थसंकल्प
लेखातील प्रमुख मुद्दे
  • भारतीय अर्थसंकल्पा विषयी सविस्तर माहिती
  • अर्थसंकल्पावरील प्रश्न – उत्तरे

अर्थसंकल्पाचा इतिहास

  • बजेट हा शब्द ब्रिटनमध्ये सर्वप्रथम 1733 मध्ये वापरला गेला. 
  • ‘बजेट’ या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द ‘बुगेट’ पासून झाली आहे. याचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. 
  • भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी मांडला.
  • 1947- 1948 चा अर्थसंकल्प स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी मांडला. 
  • 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प  मांडला.
  • मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी 10  वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.
  • पी. चिदम्बरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडून मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे.

अर्थसंकल्प म्हणजे काय ?

वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती तसेच मागील वर्षांच्या परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प होय.

अर्थसंकल्पाचे प्रकार (Types  Budget)

1. समतोल अर्थसंकल्प (Balanced Budget)-  जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.

2. शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget)- जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकीचा अर्थसंकल्प म्हणतात.

3. तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget)- जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.

अर्थसंकल्पांचे स्वरूप (structure of Budget)

1.  पारंपारिक अर्थसंकल्प (Traditional Budget)-  यात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर किंवा कोणत्या गोष्टींंवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.

2. निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget)- निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग हा अमेरिकेमध्ये झाला.या अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output) अर्थसंकल्प निर्मिती करणे हा आहे.

3. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प (Outcome Budget) –  हे विविध विभाग आणि मंत्रालयाचे मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय खर्चाच्या प्रगतीचे पत्रक असते. यामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या विकासोन्मुख फलनिष्पत्तीचे मापन केले जाते. विभागांना किती निधी आवंटित केला गेला होता, तो योग्य कार्याकरिता खर्च करण्यात आला किंवा नाही याचाही समावेश असतो.

4. शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget)- या मध्ये दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्चाचा अंदाज मांडला जातो.  पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. भारतात महाराष्ट्र राज्याने 1 एप्रिल 1986 रोजी शून्याधारित अर्थसंकल्प सादर केला. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर हे होते. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये  2001 साली शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला.

5. लिंगाधारित अर्थसंकल्प (Gender Based Budget) – 2005 मध्ये, भारताने केंद्रीय अर्थसंकल्पासह लिंगाधारित अर्थसंकल्प जारी करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राने 2013 पासून लिंगाधारित अर्थसंकल्प स्वीकारले आहे. लिंगाधारित अर्थसंकल्प हा एक प्रकल्प आहे जो सार्वजनिक निधीचे वाटप आणि मार्गण करण्यासाठी लिंगानुसार भिंग लागू करतो.हा स्वतंत्र अर्थसंकल्प नसून मुळ अर्थसंकल्पातच मांडला जातो.

अर्थसंकल्पाविषयी इतर महत्वाची माहिती –

  • अर्थसंकल्प हे राज्यघटनेतील कलम 110 अन्वये धन  विधेयक आहे. 
  • भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द वापरण्यात आलेला आहे.
  • भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार केंद्र सरकारचा, तर कलम 202 नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. 
  • हा अर्थसंकल्प 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षासाठी असतो.
  • भारताचा अर्थसंकल्प हा वित्त मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या Department of Economic Affairs मार्फत तयार केला जातो. 
  • अर्थसंकल्पात सरकारी जमाखर्चाचे तीन वर्षांचे आकडे दिलेले असतात –  
  1. गेल्या वित्तीय वर्षांचे प्रत्यक्ष आकडे (Actuals)
  2. चालू वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates) व संशोधित अंदाज (Revised Estimates)
  3. पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates)
  • भारताचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जातो.
  • अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी चालू वर्षाची भारताची आर्थिक पाहणी (Economic survey) अहवाल संसदेत मांडला जातो.
  • भारताचे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्प मांडतात व राज्यात अर्थसंकल्प मांडण्याचे काम राज्याच्या राज्यपालांचे आहे.
  • अर्थसंकल्पावर चर्चा आणि मतदान करण्याचा अधिकार केवळ लोकसभेलाच आहे. राज्यसभा केवळ त्यातील तरतुदींवर चर्चा करू शकते.
  • 1999 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. तसेच 1999 पासून सकाळी 11 वाजता सादर केला जाऊ लागला. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणारे यशवंत सिन्हा हे पहिले अर्थमंत्री ठरले.
  • 1921 च्या ऑकवर्थ समिती शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जात असे. 2017  साली सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. 

अर्थसंकल्पावरील प्रश्न – उत्तरे

Q1. केंद्रीय अर्थसंकल्प काय म्हणून ओळखला जातो?

(a)    आर्थिक अहवाल

(b)    आर्थिक सर्वेक्षण

(c)     वार्षिक आर्थिक विवरण (AFS)

(d)    आर्थिक विहंगावलोकन

S1. Ans. (c)

Sol.केंद्रीय अर्थसंकल्प हा भारत सरकारचा वार्षिक आर्थिक कार्यक्रम आहे. तो प्रत्येक वर्षी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जातो. हा एक संपूर्ण दस्तऐवज आहे, जो भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंचे विश्लेषण करतो, ज्यात महसूल, खर्च, कर, गुंतवणूक आणि आर्थिक धोरण यांचा समावेश आहे. AFS हा अर्थसंकल्पाचा एक भाग आहे आणि तो भारताच्या आर्थिक परिस्थितीचे एक व्यापक दृश्य देते.

Q2. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सादर केलेले आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करते?

(a)    पंतप्रधान

(b)    मुख्य आर्थिक सल्लागार आणि टीम 

(c)     अर्थमंत्री

(d)    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

S2. Ans. (b)

Sol.आर्थिक सर्वेक्षण हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चालू स्थितीवर एक व्यापक अहवाल आहे. ते प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पापूर्वी सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण तयार करण्याची जबाबदारी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांची टीमकडे असते.

Q3. महागाई कशी मोजली जाते?

(a)    किलोग्रॅममध्ये

(b)    टक्केवारीत

(c)     लिटरमध्ये

(d)    चलनी नोटांमध्ये

S3 . Ans. (b)

Sol.महागाई ही वस्तू आणि सेवांमधील किमतीतील बदलाचे मापन आहे. महागाई मोजण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वापरणे. CPI हे एका विशिष्ट कालावधीत वस्तू आणि सेवांसाठी देय केलेल्या किमतींचे मोजमाप आहे. CPI मधील वाढ म्हणजे महागाई.

महागाई टक्केवारीत मोजली जाते. उदाहरणार्थ, जर CPI 100 वरून 105 वर गेला, तर महागाई 5% आहे.

Q4. वित्तीय धोरणाची रूपरेषा काय आहे?

(a)    पर्यावरणीय नियम

(b)    कर आकारणी आणि सरकारी खर्च

(c)     समाज कल्याण कार्यक्रम

(d)    परराष्ट्र संबंध

S4. Ans. (b)

Sol.वित्तीय धोरण हे सरकारच्या महसूल आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्याचे साधन आहे. त्याचा उद्देश आर्थिक स्थिरता आणि वाढीचे लक्ष्य साध्य करणे आहे. वित्तीय धोरणाची दोन मुख्य साधने आहेत:

  • कर आकारणी: सरकार कर आकारणीद्वारे महसूल गोळा करते. कर आकारणीचा वापर आर्थिक प्रेरणा देण्यासाठी आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
  • सरकारी खर्च: सरकार विविध उद्दिष्टांसाठी खर्च करते, जसे की सार्वजनिक सेवा प्रदान करणे, भांडवल गुंतवणूक करणे आणि सामाजिक कल्याण कार्यक्रम चालवणे. सरकारी खर्चाचा वापर आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Q5.वित्तीय तूट म्हणजे काय?

(a)    सरकारी बचत

(b)    अधिकचा सरकारी महसूल

(c)     एकूण खर्च महसुलापेक्षा जास्त

(d)    बाह्य कर्ज

S5. Ans. (c)

Sol.वित्तीय तूट ही सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण महसूल यांच्यातील फरक आहे. जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या महसूलापेक्षा जास्त असतो, तेव्हा त्याला वित्तीय तूट येते. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. 

Q6. विनिवेशाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे?

(a)    गुंतवणूक

(b)    लाभांश

(c)     संपादन

(d)    मालमत्ता वाढ

S6. Ans. (a)

Sol.विनिवेश म्हणजे एखाद्या मालमत्तेतून पैसे काढणे. विनिवेशाचा उद्देश नफा काढणे किंवा तोटा कमी करणे हा असू शकतो.

म्हणूनच, विनिवेशाचा विरुद्धार्थी शब्द गुंतवणूक आहे.

Q7. भांडवली खर्चाचा संदर्भ काय आहे?

(a)    दैनंदिन खर्च

(b)    अल्पकालीन गुंतवणूक

(c)     दीर्घकालीन मालमत्ता

(d)    आयात कर

S7. Ans. (c)

Sol.भांडवली खर्च म्हणजे दीर्घकालीन मालमत्ता मिळवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी केलेला खर्च. 

Q8. अर्थसंकल्पादरम्यान कोणते क्षेत्र सीमा शुल्काबाबतच्या घोषणांची आतुरतेने वाट पाहत असते ?

(a)    शिक्षण

(b)    आरोग्यसेवा

(c)     उत्पादन

(d)    शेती

S8. Ans. (c)

Sol.उत्पादन क्षेत्र सीमा शुल्काबाबतच्या घोषणांची आतुरतेने वाट पाहत असते कारण सीमा शुल्क हे उत्पादन खर्चावर परिणाम करणारी एक महत्त्वाची घटक आहे. सीमा शुल्क कमी झाल्यास, आयातित माल स्वस्त होतो आणि उत्पादन खर्च कमी होतो. यामुळे उत्पादन कंपन्यांना अधिक स्पर्धात्मक होण्यास आणि अधिक नफा कमावण्यास मदत होते.

Q9. वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये बदल कोठे जाहीर केले जातात?

(a)    केंद्रीय अर्थसंकल्प

(b)    राज्याचा अर्थसंकल्प

(c)     जीएसटी परिषद

(d)    आर्थिक सर्वेक्षण

S9. Ans. (c)

Sol.वस्तू आणि सेवा कर (GST) हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे. जीएसटीमध्ये बदल करण्याचा अधिकार जीएसटी परिषदेला आहे. जीएसटी परिषद ही एक संवैधानिक संस्था आहे ज्यामध्ये केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांचे प्रतिनिधित्व आहे.

Q10. प्रत्यक्ष करांमध्ये काय समाविष्ट आहे?

(a)    विक्री कर

(b)    मालमत्ता कर

(c)     आयकर आणि महामंडळ कर

(d)    उत्पादन शुल्क

S10. Ans. (c)

Sol.प्रत्यक्ष कर हे कर आहेत, जे व्यक्तींच्या उत्पन्नावर किंवा मालमत्तेच्या मूल्यावर लावले जातात. प्रत्यक्ष करांमध्ये आयकर, महामंडळ कर, मालमत्ता कर, वारसाहक्क कर आणि इतर काही प्रकारचे कर समाविष्ट असतात.

विक्री कर, उत्पादन शुल्क आणि इतर अप्रत्यक्ष कर हे वस्तूंच्या किमतीवर लावले जातात आणि प्रत्यक्ष करांमध्ये समाविष्ट होत नाहीत.

म्हणूनच, उत्तर (c) आयकर आणि महामंडळ कर आहे.

Q11. चालू खात्यातील तूट (CAD) काय मोजते?

(a)    बजेट अधिशेष

(b)    व्यापार असमतोल

(c)     राष्ट्रीय बचत

(d)    सरकारी कर्ज

S11. Ans. (b)

Sol.चालू खात्यातील तूट (CAD) ही व्यापार असमतोल मोजते.

Q12. महसुली तूट कधी निर्माण होते?

(a)    जेव्हा खर्च महसुलाइतका असतो  

(b)    जेव्हा खर्च महसुलापेक्षा जास्त असतो

(c)     जेव्हा महसूल खर्चापेक्षा जास्त असतो

(d)  वरीलपैकी नाही 

S12. Ans. (b)

Sol.महसूली तूट ही सरकारच्या एकूण खर्चाच्या तुलनेत एकूण महसूलाच्या कमी असण्याची स्थिती आहे. जेव्हा सरकारचे खर्च महसुलापेक्षा जास्त असतो, तेव्हा सरकारला कर्ज काढून किंवा इतर वित्तीय साधनांचा वापर करून ते खर्च पूर्ण करावे लागतात.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

अर्थसंकल्प म्हणजे काय ?

वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती तसेच मागील वर्षांच्या परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प होय.

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अर्थसंकल्प मांडला जातो ?

भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार केंद्र सरकारचा, तर कलम 202 नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.

भारताचा अर्थसंकल्प कधी संसदेत मांडला जातो?

भारताचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जातो.