Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Group B 2020-21 New Exam...

MPSC Group B 2020-21 New Exam Dates Out | महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर

MPSC Group B 2020-21 New Exam Dates Out

MPSC Group B 2020-21 New Exam Dates Out | महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर: महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 11 एप्रिल, 2021 रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 एप्रिल, 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 3 ऑगस्ट, 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

MPSC Group B 2020-21 New Exam Dates प्रसिध्दीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोव्हिड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे किंवा Adda247- मराठी website नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

adda247 MPSC Trishul Batch
adda247 MPSC Trishul Batch

Sharing is caring!