Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   MIDC exam analysis Day 1 and...

MIDC 2021 Exam Analysis Day 1 and Day 2 | एमआयडीसी परीक्षा विश्लेषण दिवस 1 आणि दिवस 2

Maharashtra Industrial Development Corporation Exam Analysis: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil], कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM], लघुलेखक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade], वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant), सहाय्यक(Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), भूमापक (Surveyor), तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) [Technical Assistant grade-2], जोडारी (श्रेणी-2) , पंपचालक (श्रेणी 2) [Pump operator grade 2] , विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2], वाहनचालक (श्रेणी-2) [Motor driver grade 2] शिपाई (Peon) व मदतनीस (Helper) इत्यादी 865  रिक्त पदे भरण्यासाठी 2019 साली पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने रिक्त पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा 20 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सदर बाबतच्या सूचना उमेदवारानां ईमेल व एसएमएस द्वारे देण्यात येतील. अर्जदारांना त्यांचे प्रवेश पत्र महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र वेळेवर डाऊनलोड करून त्याची प्रत काढून घ्यावी.

 MIDC Exam details पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC परीक्षेचे प्रवेश्पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC Recruitment 2021: Day 1 and 2 Exam Analysis

वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विविध जागांसाठी परीक्षा दिलेल्या कालावधीत घेण्यात येत आहेत. या परीक्षेचा अभ्यासक्रम हा दोन भागात विभागण्यात आला आहे. एक सर्व पदांसाठी सामाईक आणि दोन पदाच्या आवश्यकतेनुसार तांत्रिक अभ्यासक्रम. प्रत्येक पदाकरिता असलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

प्रत्येक पदाकरिता असलेला सविस्तर अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MIDC Recruitment 2021: Day 1 and 2 Difficulty Level

या लेखात आपण MIDC कडून घेण्यात आलेल्या दिनांक 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट या दोन दिवसांच्या पेपर्स चे विश्लेषण पाहणार आहोत. Adda 247 च्या टीम ने मुलांशी साधलेल्या संवादावर हे विश्लेषण आधारित आहे.

Sections/विभाग Total Questions/एकूण प्रश्न
 
Total Marks/

एकूण गुण

 

Difficulty level/काठीण्यपातळी
English language 20 40 सोपे
मराठी भाषा
20 40 सोपे
General Awareness/

सामान्य जागरूकता
20 40
सोपे-मध्यम
Reasoning ability 20 40 सोपे
MIDC act 1961 20 40 मध्यम-कठीण

Total/एकूण

100 200 सोपे-मध्यम

MIDC Exam 2021 Analysis Day 1 & Day 2: Section-Wise

विचारलेल्या प्रश्नांचे विभागनिहाय विश्लेषण

English Language:

या सेक्शन मधील प्रश्नांची काठीण्यपातळी साधारण सोपी होती. एकूण 20 प्रश्न होते त्यातील साधारण 8 ते 10 प्रश्न शब्दसंपदा (vocabulary) वर आधारित होते. तर व्याकरणावर एकूण 8 ते 9 प्रश्न होते आणि उताऱ्यावर आधारित 2 ते 3 प्रश्न होते. व्याकरणातील प्रश्न find the error, preposition, conjunction इत्यादी वर होते. तर vocabulary वर synonym, antonym, idioms, phrases आणि one word substitution इत्यादी वर होते.

मराठी भाषा:

या सेक्शन मधील प्रश्नांची काठीण्यपातळी साधारण सोपी होती. एकूण 20 प्रश्न होते त्यातील साधारण 10 ते 12 प्रश्न शब्दसंपदा वर आधारित होते. तर व्याकरणावर एकूण 3 ते 4 प्रश्न होते आणि उताऱ्यावर आधारित 3 ते 4 प्रश्न होते. व्याकरणातील प्रश्न अलंकार, वाक्य प्रकार, विभक्ती इत्यादी वर होते. तर शब्दसंपदेवरील प्रश्न समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्-प्रचार, म्हणी आणि शब्दांचे अर्थ यावर होते.

General Awareness/सामान्य जागरूकता:

या सेक्शन मधील प्रश्नांची काठीण्यपातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. चालू घडामोडी वर 50% हून अधिक प्रश्न विचारले होते. काही शिफ्ट ला इतिहासावर भर होता तर काही शिफ्ट मध्ये भूगोल आणि राज्य व्यवस्था यांवर आधारित प्रश्न होते. चालू घडामोडी मध्ये पुरस्कार, राज्याचे उपक्रम, नियुक्त्या, महत्त्वाचे दिवस या वर भर होता. आम्हाला प्राप्त झालेली काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत;

Questions Asked in the Exam

1. देखो अपना देश हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरु केला?

2. नरेला क्वारंटाईन केंद्र कोणत्या राज्यात आहे?

3. PUC चे पूर्ण रूप काय?

4. पानिपत ची दुसरी लढाई कोणी जिंकली?

5. OBICUS कोणी सुरु केले?

6. घरपोच भाजी देणारी Cghaat योजना कोणत्या राज्याने सुरु केली?

7. ‘exit from the lockdown’ हा अहवाल कोणी आणला?

8. लाल बाल पाल मध्ये बाल यांचे पूर्ण नाव काय?

9. 1857 च्या उठावाच्या वेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

10. 2021 चे पद्मभूषण पुरस्कार

11. अर्जेन्टिना ची राजधानी

12. “plasma bot” कोणी आणले?

13. गाड्यांचे कलर कोड

14. LIC ची स्थापना

15. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणते राज्य आहे?

16. RBI चे गव्हर्नर कोण आहेत?

17. “पान संक्रांत” कोठे साजरी केली जाते?

18. “कोळी नृत्य” कोणत्या राज्यात होते?

19. जागतिक चागस रोग दिवस कधी पाळला जातो?

20. सुधागड कोणत्या जिल्ह्यात आहे?

आपण जर प्रश्नांचे स्वरूप नीट अभ्यासले तर असेल लक्षात येईल 2020 आणि 2021 च्या चालू घडामोडी (पुरस्कार, नियुक्त्या, उपक्रम इत्यादी) फार महत्त्वाचे आहे. आणि इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था इत्यादींवरील प्रश्न अगदीच बेसिक आहेत.

Reasoning Ability:

या सेक्शन ची काठीण्य पातळी साधारण सोपी होती. 20 प्रश्नांमध्ये Alphabetical Series, Alpha-Numeric Series, Venn Diagram, Blood Relation, Direction, Analogy, Seating Arrangement, Mathematical Operations and Series Completion, Coding-Decoding इत्यादी बाबींवर आधारित प्रश्न विचारले होते.

Topics  No. of questions 
Alphabetical Series 3
Alpha-Numeric Series 2
Venn Diagram 2
Blood Relation 2
Analogy 2
Seating Arrangement 2
Mathematical Operations 2
Coding-Decoding 2
Series Completion 1
Direction 1
Problem of Ages 1
Total/एकूण 20

MIDC Act 1961:

या परीक्षेतील सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961. एकूण 20 प्रश्नांपैकी सोपे ते मध्यम स्वरूपाचे 12 ते 14 प्रश्न आणि थोडे कठीण असे 6 ते 8 प्रश्न विचारले होते. कठीण अशाकरिता की काही प्रश्नांमध्ये उपकलम/पोटकलम विचारले होते त्यामुळे काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न कठीण वाटले. आम्हाला प्राप्त झालेल्या प्रश्नांचा साधारण तपशील खालीलप्रमाणे;

Questions Asked in the Exam

1. सेक्शन 59 कशाशी संबंधित आहे?

2. सेक्शन 52 कशाशी संबंधित आहे?

3. सेक्शन 38 मध्ये किती टक्के व्याज राज्य सरकार देऊ शकते?

4. औद्योगिक वसाहत (industrial estate) ची व्याख्या

5. सदस्यांचा साधारण कालावधी

6. प्रकरण 6A कशाशी निगडीत आहे?

7. सद्भावना पूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण कोणत्या कलमात आहे?

8. सेक्शन 50 A नुसार जमीन उपयोग बदलण्याचा हक्क कोणाला आहे?

9. लघु उद्योगांची व्याख्या

10. सेक्शन 69 मध्ये कोण अपवाद आहे

11. कलम 41 कोणत्या वर्षी रद्द केले.

12. सेक्शन 63 (2) कोणत्या प्रकरणात आहे?

13. सेक्शन 15 चे पोटकलम

14. सेक्शन 33 (8) तज्ज्ञ साक्षीदार

15. सेक्शन 44 नुसार अपील कोणाकडे

16. सेक्शन 32(2) भूमी संपादनाच्या वेळेस ग्राम सभेचे अधिकार

17. प्रकरण 4, 5 व 7 यांची नावे

18. नुकसान भरपाई कोण देते?

19. अतिरिक्त निधी चे कलम कोणते ?

20. कलम 7 कशाशी सबंधित आहे?

जर वरील प्रश्नांचा आपण नीट आढावा घेतला तर असे लक्षात येईल की 20 पैकी कमीत कमी 10 ते 12 प्रश्न हे खूप वरवरचे आणि थेट विचारले आहेत, तर उर्वरित प्रश्नांना अधिनियामाचे सखोल वाचन आवश्यक आहे. आम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये आपल्यासाठी जो कायदा upload केला होता त्याची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला सर्व प्रश्न नीट सोडविण्यासाठी मदत करेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 डाऊनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा. या PDF मध्ये महत्वाचे मुद्धे Highlight सुद्धा केले आहेत, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961

वरील माहिती विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. पुढच्या तारखांना होणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि परीक्षेबाबत इतर Updates तुम्हाला Adda 247 मराठी च्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होतील.

Best of Luck for Your Exam…

FAQs: MIDC Exam Analysis 2021

Q.1 MIDC 2021 Exam Day 1 and Day 2 ची एकूण पातळी काय होती?

उत्तर: MIDC 2021 exam Day and Day 2 ची एकूण पातळी सोपे-मध्यम होती

Q.2 MIDC 2021 Exam मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?

उत्तर: MIDC 2021 Exam मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100आहे.

Q.2 MIDC 2021 परीक्षा तारखा काय आहेत?

उत्तर: MIDC 2021 Exam 20 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 या दरम्यान होणार आहे

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!