Marathi govt jobs   »   Job Notification   »   MIDC Recruitment 2019

MIDC Exam Dates Out | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षेच्या तारखा जाहीर

Maharashtra Industrial Development Corporation Exam Dates Out

Maharashtra Industrial Development Corporation Exam Dates Out: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil], कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM], लघुलेखक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade], वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant), सहाय्यक(Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), भूमापक (Surveyor), तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) [Technical Assistant grade-2], जोडारी (श्रेणी-2) , पंपचालक (श्रेणी 2) [Pump operator grade 2] , विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2], वाहनचालक (श्रेणी-2) [Motor driver grade 2] शिपाई (Peon) व मदतनीस (Helper) इत्यादी 865  रिक्त पदे भरण्यासाठी 2019 साली पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने रिक्त पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर बाबतच्या सूचना उमेदवारानां ईमेल व एसएमएस द्वारे देण्यात येतील. अर्जदारांना त्यांचे प्रवेश पत्र महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

MIDC Recruitment: Exam Dates

परीक्षेचा दिनांक: 20/08/2021 ते 10/09/2021 दरम्यान

स्वरूप: ऑनलाईन व ऑफलाईन

अधिकृत संकेतस्थळ: www.midcindia.org

MIDC Recruitment: Post-wise education qualification, pay scale and vacancy details

रिक्त पदांची पदनिहाय शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी आणि रिक्त पदांची संख्या  खालीलप्रमाणे:

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil] (वर्ग क) – वेतन श्रेणी एस 14 (38600-122800)

अर्हता: मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जसे की, पार्ट टाइम डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींग.

रिक्त पदे: 35 (सर्वसाधारण- 17 आणि राखीव – 18)

 2. कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM]  (वर्ग क) – वेतन श्रेणी एस 14 (38600-122800) 

अर्हता: मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जसे की डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन मॅकेनिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलोकम्युनिकेशन, डिप्लोमा इन इन्स्ट्रूमेंटल इंजिनिअरींग, पार्ट टाइम डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, पार्ट टाइम डिप्लोमा इन मॅकेनिकल

रिक्त पदे: 09 (सर्वसाधारण- 07 आणि राखीव -02 )

   3. लघुलखेक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade] (वर्ग क ) वेतन श्रेणी एस 14 (38600-122800) 

अर्हता: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर. 2) राज्य शासनाची मराठी लघुटंकलेखनाची 80 श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 श.प्र.मि. वेगाची परिक्षा उत्तीर्ण. अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुटंकलेखनाची 100 श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40  श.प्र.मि. वेगाची परिक्षा उत्तीर्ण.

रिक्त पदे: 20 (सर्वसाधारण – 12 आणि राखीव – 08)

4. वरिष्ठ लेखापाल (वर्ग क) [Senior Accountant] – वेतन श्रेणी एस 14 (38600-122800) 

अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.

रिक्त पदे: 04 (सर्वसाधारण – 03 आणि राखीव – 01)

5. सहायक [Assistant] (वर्ग क) – वेतन श्रेणी एस 13 (35400 – 112400)

अर्हता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. 2) सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

रिक्त पदे: 31 ( सर्वसाधारण – 15 आणि राखीव – 16)

 6. लिपिक टंकलेखक [Clerk Typist] (वर्ग क ) वेतन श्रेणी एस 6 (19900 – 63200)

अर्हता: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. 2) राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची 40 श.प्र.मि. वेगाची परिक्षा उत्तीर्ण. 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण

रिक्त पदे: 211 ( सर्वसाधारण – 78 आणि राखीव – 133)

 7. भूमापक [Surveyor] (वर्ग क ) वेतन श्रेणी एस 8 (25500-81100) 

अर्हता: 1) शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण 2) संगणक प्रणालीचा Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण

  रिक्त पदे: 29 ( सर्वसाधारण – 15 आणि राखीव – 14)

   8. वाहनचालक [Motor driver grade 2] (श्रेणी-2) (वर्ग क ) – वेतन श्रेणी एस 6 (19900 – 63200)

अर्हता: 1) इयत्ता 7 वी उत्तीर्ण 2) हलके किंवा अवजड वाहन चालविण्याचा परवाना 3) परवाना मिळविल्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव

रिक्त पदे: 29 ( सर्वसाधारण – 16 आणि राखीव – 13)

  9. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) [Technical Assistant grade-2] (वर्ग क) वेतन श्रेणी एस 8 (25500-81100)

अर्हता: शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/ यांत्रिकी या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

रिक्त पदे: 34 ( सर्वसाधारण – 17 आणि राखीव – 17)

  10. जोडारी (श्रेणी-2) [Pairer grade-2] (वर्ग क) – वेतन श्रेणी एस 6 (19900 – 63200)

अर्हता: 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

रिक्त पदे: 41 ( सर्वसाधारण – 19 आणि राखीव – 21)

   11. पंपचालक (श्रेणी-2) [Pump operator grade 2] (वर्ग क) – वेतन श्रेणी एस 6 (19900 – 63200)

अर्हता: 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र

रिक्त पदे: 79 ( सर्वसाधारण – 28 आणि राखीव – 51)

12. विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2] (वर्ग क ) – वेतन श्रेणी एस 8 (25500-81100)

अर्हता: 1) शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि 2) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक

रिक्त पदे: 09 ( सर्वसाधारण – 06 आणि राखीव – 03)

13. शिपाई [Peon] (वर्ग ड) – वेतन श्रेणी एस 1 (15000 – 47600)

अर्हता: 1) किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण 2) मराठी लिहीता वाचता येणे आवश्यक

रिक्त पदे: 56 ( सर्वसाधारण – 22 आणि राखीव – 34)

14.मदतनीस [Helper] (वर्ग ड) – वेतन श्रेणी एस 1 (15000 – 47600)

अर्हता :1) किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण 2) मराठी लिहीता वाचता येणे आवश्यक

रिक्त पदे: 278 ( सर्वसाधारण – 99 आणि राखीव – 179)

परीक्षेचे अधिकृत सविस्तर घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC Recruitment: Post-wise Age Limit

कमाल व किमान वयोमर्यादा:- (अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 07/08/2019 रोजी)

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 व कमाल 38 वर्ष

2) मागास प्रवर्गासाठी किमान 18 व कमाल 43 वर्षे.

3) महामंडळातील कायम आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 48 वर्षे इतकी शिथिलक्षम राहील.

4) खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथील राहील. तथापि कोणत्याही प्रवर्गात उमेदवारांची उच्चत्तम वयोमर्यादा 43 वर्षे राहील.

5) माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील.

6) स्वातंत्र सैनिकांचे नाम निर्देशित पाल्य, जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना 45 वर्ष.

7) अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 55 वर्षे.

MIDC Recruitment: Post-wise exam pattern

परीक्षेचे पदनिहाय स्वरूप खालीलप्रमाणे: 

अनु. क्र.  पदाचे नाव  भाग 1 (इंग्रजी)   भाग 2 (मराठी)   भाग 3 (सामान्य ज्ञान)  भाग 4 (तर्क क्षमता)   भाग 5 (MIDC अधिनियम)  भाग 6 (तांत्रिक)   एकूण प्रश्न  एकूण गुण  परीक्षेचे स्वरूप  कालावधी (मि) व्यावसायिक परीक्षा 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 10 10 10 10 10 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
2 कनिष्ठ अभियंता (विवयां) 10 10 10 10 10 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
3 लघुलखेक (निम्न श्रेणी) 10 10 10 10 10 0 50 100 ऑनलाईन 60 लघू लेखन परीक्षा
4 वरिष्ठ लेखापाल 10 10 10 10 10 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
5 सहायक 10 10 10 10 10 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
6 लिपिक टंकलेखक 20 20 20 20 20 0 100 200 ऑनलाईन 120 नाही
7  भूमापक 10 10 10 10 10 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
8 तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) 10 10 15 15 0 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
9 जोडारी (श्रेणी-2) 10 10 15 15 0 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
10 पंपचालक (श्रेणी-2) 10 10 15 15 0 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
11 विजतंत्री (श्रेणी-2) 10 10 15 15 0 50 100 200 ऑनलाईन 120 नाही
12 वाहनचालक (श्रेणी-2) 10 10 15 15 0 0 50 100 लेखी 60 वाहनचालक परीक्षा
13 शिपाई 10 10 15 15 0 0 50 100 लेखी 60 नाही
14 मदतनीस 10 10 15 15 0 0 50 100 लेखी 60 नाही
  • सर्व पदांकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

MIDC Recruitment: Post-wise syllabus

उपरोक्त नमूद केलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil], कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM], लघुलेखक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade], वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant), सहाय्यक(Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), भूमापक (Surveyor), तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) [Technical Assistant grade-2], जोडारी (श्रेणी-2) , पंपचालक (श्रेणी 2) [Pump operator grade 2] , विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2], वाहनचालक (श्रेणी-2) [Motor driver grade 2] शिपाई (Peon) व मदतनीस (Helper) या 14 सवर्गातील पदांकरिता असलेला सविस्तर अभ्यासक्रम खाली दिलेल्या link वर उपलब्ध आहे.

प्रत्येक पदाकरिता असलेला सविस्तर अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

—————————————————————————————————————————————–

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MIDC Exam Dates Out | म. औ. वि. म. परीक्षेच्या तारखा जाहीर_30.1
Maharashtra Mahapack

Sharing is caring!