Marathi govt jobs   »   Job Notification   »   MHADA Recruitment 2021

म्हाडा भरती 2021: 565 पदांसाठी अर्ज करा | MHADA Recruitment 2021: Apply for 565 Posts

म्हाडा भरती 2021: 565 पदांसाठी अर्ज करा | MHADA Recruitment 2021: Apply for 565 Posts: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे MHADA Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक MHADA Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

MHADA Recruitment 2021 | म्हाडा भरती 2021

MHADA Recruitment 2021 | म्हाडा भरती 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने 16 सप्टेंबर 2021 रोजी Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer, इ पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे आणि 17 सप्टेंबर 2021 सकाळी 11 वाजल्या पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल. या लेखात, MHADA Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.

MHADA Recruitment 2021 Notification | म्हाडा भरती 2021 अधिसूचना

MHADA Recruitment 2021 Notification | म्हाडा भरती 2021 अधिसूचना: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्यला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल.

MHADA Recruitment 2021 अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MHADA Recruitment 2021: Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा

MHADA Recruitment 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2021: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022 ते 03 फेब्रुवारी 2022

07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2021: Vacancies | म्हाडा भरती 2021 रक्त जागांचा तपशील 

MHADA Recruitment 2021: Vacancies: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), मुंबई ने खालील पदांसाठी एकूण 565 जागा जाहीर केल्या आहेत. तक्त्यात खाली दिलेल्या पोस्टनिहाय रिक्त जागा तपासा.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) 13
2 उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) 13
3 मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, 2
4 सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), 30
5 सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, 2
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), 119
7 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, 6
8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, 44
9 सहायक / Assistant, 18
10 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, 73
11 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, 207
12 लघुटंकलेखक / Shorthand writer, 20
13 भूमापक / Surveyor, 11
14 अनुरेखक / Tracer 7
Total / एकूण 565

MHADA Recruitment 2021 Eligibility Criteria | म्हाडा भरती 2021 पात्रता निकष

MHADA Recruitment 2021 Eligibility Criteria: MHADA Recruitment 2021 अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी /, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक इ. पदांसाठी अर्ज करण्यासाठीचे शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा खाली देण्यात आले आहे

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

 1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil): 1) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. 2) वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय /निमशासकीय / मंडळे/ महामंडळे/सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी / फर्म कार्यालयातील 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा,
 2. उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil): 1) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. 2) वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय /निमशासकीय / मंडळे/महामंडळे / सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी / फर्म कार्यालयातील 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा.
 3. मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer: 1) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी धारण 19 ते 38 केलेली असावी. आणि 2) व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) मधील वाणिज्य व वित्त मधील (Marketing and Finance) पदवी/पदविका धारण केलेली असावी. 3) वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर शासकीय / निमशासकीय / मंडळे / महामंडळे/सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी / फर्म कार्यालयात वाणिज्य व वित्त क्षेत्राचा प्रशासकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असावा
 4. सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil): महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी. शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी.
 5. सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor: महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायदयाची पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. २) वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलीचा विशेषतः भूधारणा (Land Tenures), मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी मालकी हक्काचे प्लॅटस, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेल्या कामांचा पाच वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असावा.
 6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil): महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखतील पदविका धारण केलेली असावी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी.
 7. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant: 1) ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी / पदव्युत्तर 19 ते 38 पदवी धारण केलेली असावी, 2) ज्यांची Council of Architecture (COA) मध्ये नोंदणी झालेली असेल.
 8. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant: आद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र किंवा त्यांच्याशी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.
 9. सहायक / Assistant: 1) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. 2) प्रशासकीय कामाचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा.
 10. वरिष्ठ लिपिक / Senior Clerk: 1) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. 2) प्रशासकीय कामाचा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा
 11. कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist: 1) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. आणि 2) मराठी टंकलेखनाचे किमान 30 श.प्र.मि. वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 श.प्र.मि. वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
 12. लघुटंकलेखक / Shorthand writer: 1) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 2) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 श.प्र.मि. उत्तीर्ण असावी
 13. भूमापक / Surveyor: 1) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 2) वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यावर शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले भू मापक (Surveyor) या विषयाचे दोन वर्षाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
 14. अनुरेखक / Tracer: 1) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने त्या परीक्षेशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली कोणतीही इतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 2) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. किंवा 3) वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

Age Limit | वयोमर्यादा

Sr. No Post / पदाचे नाव  किमान व कमल वयोमर्यादा
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) 18 ते 40
2 उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) 18 ते 38
3 मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, 19 ते 38
4 सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), 18 ते 38
5 सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, 18 ते 38
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), 18 ते 38
7 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, 19 ते 38
8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, 18 ते 38
9 सहायक / Assistant, 19 ते 38
10 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, 19 ते 38
11 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, 19 ते 38
12 लघुटंकलेखक / Shorthand writer, 19 ते 38
13 भूमापक / Surveyor, 18 ते 38
14 अनुरेखक / Tracer 18 ते 38

Note: काही उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत काही शिथिलता देण्यात आले आहे.

MHADA Recruitment 2021: Apply Online | म्हाडा भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा

MHADA Recruitment 2021: Apply Online: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), मुंबई ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand writer, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer इ पदांची रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि.   17 सप्टेंबर 2021 (स. 11.00 वा पासून) ते 14 ऑक्टोबर 2021 (रात्री 23.59 वा. पर्यंत) या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. MHADA मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. MHADA Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.

MHADA Recruitment 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

MHADA Recruitment 2021 Application Fee | म्हाडा भरती 2021 अर्ज शुल्क

MHADA Recruitment 2021 Application Fee: MHADA Recruitment 2021 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

MHADA Recruitment 2021: Application Fees
Category Fees
अमागास प्रवर्ग Rs. 500
मागास प्रवर्ग Rs. 300

टिप :

 • वर दर्शविण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बैंक प्रोसेसिंग शुल्क (लागू असेल तर) वगळून आहे. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम ही ना परतावा असेल.
 • उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.
 • माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू नाही.

MHADA Recruitment 2021: Selection Process | म्हाडा भरती 2021 निवड प्रक्रिया

MHADA Recruitment 2021: Selection Process: निवडप्रकिया खालीलप्रमाणे असेल

 1. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन/लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथील करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.
 2. पदासाठी विहित केलेल्या अर्हता /अटी / शर्ती पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
 3. एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02/12/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल

(1) समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील,

(2) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

(3) वरील अनु.क्र. 1 व 2 या दोन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतम शैक्षणिक अर्हता (पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे ) धारण करणा-या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

(४) वरील अनु.क्र. 1, 2 व 3 या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत. सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

Read In English: MHADA Recruitment 2021

MHADA Recruitment 2021: FAQs

Q1. म्हाडा ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय असेल?

Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याचीप्रारंभ तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

Q2. म्हाडाच्या ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय असेल?

Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.

Q3. म्हाडा भरती अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. म्हाडा भरती अधिसूचनेनुसार 565 रिक्त जागा आहेत.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

FAQs

How many vacancies are released as per the MHADA Recruitment Notification?

There are 565 vacancies released as per the MHADA Recruitment Notification.

What is the opening date of registration for the MHADA Recruitment 2021?

The starting date of registration for the MHADA Recruitment 2021 is 17th September.

What is the last date of registration for the MHADA Recruitment 2021?

The last date of registration for the MHADA Recruitment is 14th October 2021.