Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   (Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021

चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 07 सप्टेंबर 2021

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021 पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या (Current Affairs for Competitive Exams)

 1. आयआयटी हैदराबाद येथे भारतातील पहिली जैव-वीट आधारित इमारतीचे अनावरण केले

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_3.1
भारतातील पहिली जैव-वीट आधारित इमारत
 • आयआयटी हैदराबाद येथे कृषी-कचऱ्यापासून जैव-विटांनी बनलेल्या भारतातील पहिल्या इमारतीचे उद्घाटन झाले आहे.
 • उष्णता कमी करण्यासाठी छप्पर पीव्हीसी शीटवर जैव-विटांनी बनलेले आहे.
 • सामग्रीची ताकद आणि अष्टपैलुत्व प्रदर्शित करण्यासाठी हा बोल्ड युनिक आयडिया लीड डेव्हलपमेंट (बिल्ड) प्रकल्पाचा भाग आहे.

राज्य बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 2. तामिळनाडूमध्ये भारतातील पहिले डूगोंग संवर्धन क्षेत्र 

 • तामिळनाडू राज्य सरकारने पाल्क सामुद्रधुनीच्या उत्तर भागात भारतातील पहिले डूगोंग संवर्धन क्षेत्र उभारण्याची घोषणा केली आहे. डूगोंग सामान्यतः समुद्री गाय म्हणून ओळखले जाते.
 • वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) च्या अंदाजानुसार, सध्या फक्त 200-250 डुगोंग शिल्लक आहेत, त्यापैकी 150 पाल्क सामुद्रधुनी आणि तामिळनाडूतील मन्नारच्या खाडीमध्ये आढळतात.
 • हा क्षेत्र पाल्क सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील भागात आदिरामपट्टिनम ते अमापट्टिनम पर्यंत पसरलेला असेल. हा राखीव 500 चौरस किमी पेक्षा जास्त क्षेत्र व्यापेल.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

 • तामिळनाडू राजधानी: चेन्नई
 • तामिळनाडूचे मुख्यमंत्री: एमके स्टालिन.
 • तामिळनाडूचे राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित.
 • तामिळनाडू राज्य नृत्य: भरतनाट्यम.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 05 and 06-September-2021

महत्त्वाचे दिवस (Current Affairs for Competitive Exams)

 3. 07 सप्टेंबर: निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_4.1
07 सप्टेंबर: निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन
 • निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन जागतिक पातळीवर 07 सप्टेंबर रोजी पाळला जातो जेणेकरून हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या कृतींना प्रोत्साहन आणि सुविधा मिळतील.
 • हा संयुक्त राष्ट्र-मान्यताप्राप्त दिवस आहे ज्याचा उद्देश सर्व स्तरांवर जनजागृती वाढवणे आहे. 2021 साठी या दिवसाची संकल्पना “निरोगी हवा, निरोगी ग्रह” ही आहे.
 • संयुक्त राष्ट्र महासभेने 74 व्या सत्रादरम्यान 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस पाळण्याचा ठराव स्वीकारला. निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाची उद्घाटन आवृत्ती 2020 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

4. 06 ते 12 सप्टेंबर: अन्न प्रक्रिया सप्ताह

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_5.1
अन्न प्रक्रिया सप्ताह
 • भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी, भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे.
 • उत्सवाचा एक भाग म्हणून, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय 6 ते 12 सप्टेंबर 2021 अंतर्गत ‘अन्न प्रक्रिया सप्ताह’ साजरा करत आहे.यानिमित्ताने मंत्रालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले  आहे.
 • श्रीमती. राधिका कामत यांची पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस (पीएमएफएमई) योजनेच्या लाभार्थी म्हणून यशोगाथा, मंत्रालयाच्या वेबसाइटवर ‘आत्मनिभर उद्योग’ मालिकेत प्रकाशित झाली.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

 • केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री: पशुपती कुमार पारस
 • अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री: प्रल्हाद सिंह पटेल

नियुक्ती बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 5. इक्विटास बँकेने राणी रामपाल आणि स्मृती मंधाना यांची जाहिरातदूत म्हणून नियुक्ती केली

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_6.1
राणी रामपाल आणि स्मृती मंधाना
 • इक्विटास लघू वित्त बँकेने (ईएसएफबी) भारतीय महिला हॉकीपटू, राणी रामपाल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांना कंपनीचे जाहिरातदूत म्हणून नियुक्त केले आहे.
 • 5 सप्टेंबर 2021 रोजी ईएसएफबीच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

 • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (ईएसएफबी) मुख्यालय: चेन्नई
 • ईएसएफबीचे एमडी आणि सीईओ: वासुदेवन पी एन

Monthly Current Affairs PDF in Marathi | August 2021 | Download PDF

 6. शॉन टेटची पुडुचेरीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_7.1
शॉन टेटची पुडुचेरीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
 • पुंडुचेरी क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • पुंडुचेरी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक चमूत मुख्य प्रशिक्षक दिशांत याज्ञिक आणि व्यवस्थापक कल्पेंद्र झा यांचा समावेश आहे.
 • नुकतेच शॉन टेटची अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी पाच महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

 7. एस. एल. त्रिपाठी यांची युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या सीएमडीपदी नियुक्ती

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_8.1
एस. एल. त्रिपाठी
 • केंद्र सरकारने एसएल त्रिपाठी यांची युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष-आणि-व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे.
 • ते सध्या द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक आणि संचालक आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुख्यालय: चेन्नई
 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची स्थापना: 18 फेब्रुवारी 1938
 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सीईओ: श्री गिरीश राधाकृष्णन

संरक्षण बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 8. AUSINDEX – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नौदल सराव

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_9.1
AUSINDEX
 • भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव AUSINDEX ची चौथी आवृत्ती 06 सप्टेंबर 2021 पासून 10 सप्टेंबर 2021 पर्यंत आयोजित करण्यात येत आहे.
 • भारतातर्फे आयएनएस शिवालिक आणि आयएनएस कदमत या सरावात भाग घेणार आहेत
 • या सरावाची सुरुवात 2015 साली करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त माहिती:

 • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान: स्कॉट मॉरिसन
 • ऑस्ट्रेलियाची राजधानी: कॅनबेरा
 • ऑस्ट्रेलिया चलन: ऑस्ट्रेलियन डॉलर

 9. हवाईदल प्रमुख हवाई येथे पॅसिफिक एअर चीफ सिम्पोजियम 2021 मध्ये उपस्थित

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_10.1
पॅसिफिक एअर चीफ सिम्पोजियम 2021
 • हवाई प्रमुख मार्शल आरकेएस भदौरिया यांनी हवाई येथील जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम येथे तीन दिवस चालणाऱ्या पॅसिफिक एअर चीफस सिम्पोजियम 2021 मध्ये भाग घेतला.
 • “प्रादेशिक स्थिरतेच्या दिशेने चिरस्थायी सहकार्य” संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे हवाई प्रमुख उपस्थित होते. भदौरिया यांची चर्चासत्रासाठी प्रमुख म्हणून नामांकन करण्यात आले.
 • भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इतर अनेक समविचारी देश मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहेत.

पुस्तक आणि लेखक बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 10. ‘बॅक टू द रूट्स’ – तमन्ना भाटिया यांचे पुस्तक

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_11.1
‘बॅक टू द रूट्स’
 • अभिनेत्री तमन्ना भाटियाने, सेलिब्रिटी जीवनशैली प्रशिक्षक ल्यूक कौटिन्हो यांच्यासह सह-लेखन केलेले पुस्तक ‘बॅक टू द रूट्स’ प्रकाशित झाले आहे.
 • हे पुस्तक सखोल संशोधनावर आधारित आहे आणि भारताच्या आरोग्य आणि निरोगीपणाच्या प्राचीन रहस्यांचा उल्लेख आहे.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

क्रीडा बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

11. ड्युरँड चषकाची 130 वी आवृत्ती कोलकाता येथे सुरु 

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_12.1
ड्युरँड चषकाची 130 वी आवृत्ती
 • ड्युरँड चषकाची 130 वी आवृत्ती कोलकाता येथील विवेकानंद युवाभारती क्रीडांगण येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.
 • या आवृत्तीत 16 संघ समाविष्ट होत आहेत मात्र आशियामधील सर्वात जुने फुटबॉल क्लब ईस्ट बंगाल आणि मोहन बागान यावेळेस भाग घेणार नाही आहेत.
 • ड्युरँड चषक ही एक प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा आहे. हिमाचल प्रदेशातील डागशाई येथे 1888 मध्ये प्रथम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला मॉर्टिमर ड्युरँड असे नाव देण्यात आले आहे. ते भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव होते.

पुरस्कार बातम्या (Daily Current Affairs for MPSC)

 12. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षण पुरस्काराचे वितरण 

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_13.1
राष्ट्रीय शिक्षण पुरस्काराचे वितरण
 • 5 सप्टेंबर 2021, अर्थात राष्ट्रीय शिक्षक दिनारोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले.
 • राष्ट्रपती कोविंद यांनी देशातील 44 उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या समर्पित योगदानासाठी पुरस्कार प्रदान केले, ज्यात 9 महिलांचा समावेश आहे.
 • एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल (ईएमआरएस), छत्तीसगडचे प्रमोद कुमार शुक्ला यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत स्थापन केलेल्या ईएमआरएससाठी हा सलग दुसरा पुरस्कार आहे.

निधन बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 13. फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जीन-पियरे अ‍ॅडम्स यांचे निधन

(Daily Current Affairs) 2021 | 07-September-2021_14.1
जीन-पियरे अ‍ॅडम्स यांचे निधन
 • फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जीन-पियरे अ‍ॅडम्स, जे 39 वर्षांपासून कोमात होते, त्यांचे निधन झाले.
 • 1982 मध्ये, गुडघ्याच्या नियमित शस्त्रक्रियेदरम्यान, वैद्यकीय त्रुटीमुळे अ‍ॅडम्स कोमात गेले.
 • त्यांनी फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी 1972-1976 पर्यंत एकूण 22 सामने केले. क्लब स्तरावर, अ‍ॅडम्स पॅरिस सेंट-जर्मेन, नेम्स आणि नाइससाठी बचावपटू म्हणून खेळले.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!