Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Current Affairs in Marathi | 18...

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 18 ऑगस्ट 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 18 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

राज्य बातम्या(daily Current Affairs for mpsc)

 1. जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी प्रूफ अ‍ॅप चे अनावरण केले

Current Affairs in Marathi | 18 August 2021_40.1
जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी प्रूफ अ‍ॅप चे अनावरण केले
  • जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शासन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी पीआरओओएफ( प्रूफ) नावाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण केले आहे.
  • पीआरओओएफ म्हणजे ‘ऑन-साइट सुविधेचा फोटोग्राफिक रेकॉर्ड-फोटोग्राफीक रेकॉर्ड ऑफ ऑन-साईट फॅसिलिटी’.
  • केंद्रशासित प्रदेशातील विविध विभागांना वाटप केलेल्या सर्व प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे आणि या प्रकल्पांची वेळेवर पूर्णता सुनिश्चित करणे हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे.
  • अ‍ॅप त्याच्या भौगोलिक निर्देशांकासह म्हणजेच अक्षांश व रेखांश आणि कामाच्या प्रगतीवर वापरकर्त्याच्या टिप्पण्या कार्याचे संपूर्ण चित्रमय दृश्य देईल.
  • नवीन नियमांनुसार, प्रकल्पांची छायाचित्रे अपलोड केल्याशिवाय सरकारच्या तिजोरीत कोणतेही बिल स्वीकारले जाणार नाही.

 2. पुडुचेरीने आपला विधीत हस्तांतरण दिवस साजरा केला

Current Affairs in Marathi | 18 August 2021_50.1
पुडुचेरीने आपला विधीत हस्तांतरण दिवस साजरा केला
  • 16 ऑगस्ट रोजी पुडुचेरीने आपला विधीत हस्तांतरण दिन साजरा केला. पुद्दुचेरी विधानसभेचे अध्यक्ष आर. सेल्वम यांनी पुडुचेरीमधील दुर्गम किझूर येथील स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली, जिथे सत्ता हस्तांतरण 16 ऑगस्ट 1962 मध्ये झाले.
  • विधीत हस्तांतरण दिवस म्हणजे या दिवशी फ्रेंचांनी पुडुचेरीची आपली सत्ता भारताला हस्तांतरित केली.
  • फ्रेंच आणि भारतीय सरकार यांच्यात झालेल्या हस्तांतरण कराराला 16 ऑगस्ट 1962 रोजी फ्रेंच संसदेने मंजुरी दिली. त्यामुळे त्या दिवशी विधिवत भारतीय संघासह केंद्रशासित प्रदेशाचे कायदेशीर विलीनीकरण लागू झाले.
  • 178 प्रतिनिधींनी जनमत चाचणीत भाग घेतला ज्यात 170 लोकांनी भारतात विलीन होण्याच्या बाजूने आणि 8 लोकांनी विरोधात मतदान केले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पुडुचेरीचे मुख्यमंत्री: एन रंगासामी

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

 3. यूपी मध्ये एटीएस प्रशिक्षण केंद्र

Current Affairs in Marathi | 18 August 2021_60.1
यूपी मध्ये एटीएस प्रशिक्षण केंद्र
  • उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) कमांडोसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • उत्तर प्रदेशची राजधानी: लखनऊ 
  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ

नियुक्ती आणि राजीनामा बातम्या (Current Affairs for mpsc)

 4. हकाइंडे हिचिलेमा: झांबियाचे नवे राष्ट्रपती

Current Affairs in Marathi | 18 August 2021_70.1
हकाइंडे हिचिलेमा: झांबियाचे नवे राष्ट्रपती
  • झांबियामध्ये, युनायटेड पार्टी फॉर नॅशनल डेव्हलपमेंटचे विरोधी पक्षनेते 59 वर्षीय हाकिंडे हिचिलेमा यांनी  देशाच्या 2021 च्या सार्वत्रिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 59.38% मतांनी विजय मिळवत  राष्ट्रपतीपदावर नाव कोरले आहे.
  • ते पॅट्रीऑटिक फ्रंटचे विद्यमान अध्यक्ष एडगर लुंगू यांची जागा घेतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • झांबिया राजधानी: लुसाका
  • झांबिया चलन: झांबियन क्वाचा

 5. मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांचा राजीनामा

Current Affairs in Marathi | 18 August 2021_80.1
मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांचा राजीनामा
  • मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने संसदेत विश्वासदर्शक ठराव  गमावल्यानंतर राजीनामा दिला.
  • 74 वर्षीय मुहिद्दीन मार्च 2020 मध्ये सत्तेवर आले होते. उत्तराधिकाऱ्याचे नाव येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहतील.

8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट मधील साप्ताहिक चालू घडामोडी

 6. प्रियांका चोप्रा जोनस: मामी चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षा

Current Affairs in Marathi | 18 August 2021_90.1
प्रियांका चोप्रा जोनस: मामी चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षा
  • दीपिका पदुकोण पदावरून पायउतार झाल्याच्या जवळपास चार महिन्यांनी अभिनेत्री-निर्माती प्रियंका चोप्रा जोनास यांना जिओ मामी अर्थात मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. मामीच्या विश्वस्त मंडळाने प्रियंकाला एकमताने नामांकित केले.

7.मीराबाई चानू: एमवे इंडियाच्या सदिच्छादूत

Current Affairs in Marathi | 18 August 2021_100.1
मीराबाई चानू: एमवे इंडियाच्या सदिच्छादूत
  • थेट विकणारी एफएमसीजी फर्म एमवे इंडियाने जाहीर केले आहे की त्याने ऑलिम्पियन सायखोम मीराबाई चानूला एमवे आणि त्याच्या न्यूट्रीलाइट उत्पादनांच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले आहे.
  • चानूने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो गटात भारोत्तलन मध्ये रौप्य पदक जिंकले.

अहवाल आणि निर्देशांक बातम्या(MPSC daily current affairs)

 8. आरबीआयने वित्तीय सर्वसमावेशकता निर्देशांक जारी केला

Current Affairs in Marathi | 18 August 2021_110.1
आरबीआयने वित्तीय सर्वसमावेशकता निर्देशांक जारी केला
  • भारतातील आर्थिक समावेशनाच्या प्रमाणाचे मोजमाप करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वित्तीय समावेशकता निर्देशांक (एफआय-इंडेक्स) जारी केला आहे.
  • एफआय-इंडेक्समध्ये भारतातील बँकिंग, गुंतवणूक, विमा, पोस्ट आणि पेन्शन क्षेत्रातील समावेशकतेबाबत तपशील समाविष्ट आहे.
  • एफआय-इंडेक्सचे मूल्य 0 ते 100 दरम्यान असेल. जेथे 0 पूर्ण आर्थिक असमावेशन दर्शवते तर 100 पूर्ण आर्थिक समावेशन दर्शवते. एफआय-इंडेक्सचे परिमाणे: एफआय-इंडेक्समध्ये तीन परिमाणे आहेत- प्रवेश (35%), वापर (45%), आणि गुणवत्ता (20%) या प्रत्येकामध्ये एकूण 97 संकेतांक आहेत.
  • मार्च 2021 मध्ये समाप्त होणाऱ्या कालावधीसाठी वार्षिक एफआय- निर्देशांक 53.9 आहे तर मार्च 2017 मध्ये संपलेल्या कालावधीसाठी 43.4 आहे. आरबीआय दरवर्षी जुलै महिन्यात एफआय- निर्देशांक जारी करेल. या निर्देशांकासाठी कोणतेही आधारभूत वर्ष ठरविण्यात आले नाही.

 9. 2020 मध्ये गाझियाबाद हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर

Current Affairs in Marathi | 18 August 2021_120.1
गाझियाबाद हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर
  • 2020 मध्ये ब्रिटिश कंपनी हाऊसफ्रेशने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादला जगातील 50 सर्वात प्रदूषित शहरांपैकी दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले.
  • गाझियाबाद शहराने 106.6µg/m3 मध्ये 2.5 पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) इतका सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय)– हवा गुणवत्ता निर्देशांक, नोंदवला.
  • गाझियाबादच्या आधी,चीनच्या झिंजियांग प्रांतातील होतन शहराला 110.2µg/m3 मध्ये पीएम 2.5 सह सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 49 शहरे बांगलादेश, चीन, भारत आणि पाकिस्तानातील आहेत.
  • अहवालानुसार, 2020 मध्ये बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश होता, त्यानंतर पाकिस्तान, भारत आणि मंगोलियाचा क्रमांक लागतो. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील जडबरीने  स्वच्छ हवा असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले.

संरक्षण बातम्या(MPSC group B and C current affairs)

 10. कोकण युद्धसराव 2021

Current Affairs in Marathi | 18 August 2021_130.1
कोकण युद्धसराव 2021
  • भारतीय नौदल जहाज आयएनएस ताबर इंग्लंडमधील पोर्ट्समाउथ येथे भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही दरम्यान वार्षिक द्विपक्षीय युद्धाभ्यास ‘कोकण 2021’ मध्ये भाग घेण्यासाठी दाखल झाले.
  • दोन्ही नौदलांमध्ये परस्पर सहकार्य, समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी 2004 पासून दरवर्षी द्विपक्षीय नौदल सराव कोकण आयोजित केला जातो. रॉयल नेव्हीच्या एचएमएस वेस्टमिन्स्टरने ब्रिटनच्या बाजूने भाग या सरावात भाग घेतला आहे.

Current Affairs Daily Quiz In Marathi | 18 August 2021

पुरस्कार बातम्या(Daily current affairs for rajyaseva)

 11. महात्मा गांधीना अमेरिकन काँग्रेसचे सुवर्णपदक 

Current Affairs in Marathi | 18 August 2021_140.1
महात्मा गांधीना अमेरिकन काँग्रेसचे सुवर्णपदक
  • न्यूयॉर्कमधील एका प्रभावशाली काँग्रेस सदस्याने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात शांती आणि अहिंसेला प्रोत्साहन दिल्याबद्दल महात्मा गांधींना मरणोत्तर प्रतिष्ठेचे काँग्रेशनल सुवर्णपदक देण्याचा ठराव सादर केला.
  • कॉंग्रेशनल गोल्ड मेडल हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, मदर टेरेसा आणि रोझा पार्क्स सारख्या महान व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 12. मोहम्मद आझम यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

Current Affairs in Marathi | 18 August 2021_150.1
मोहम्मद आझम यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार
  • तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील मोहम्मद आझम यांना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी अनुकरणीय नेतृत्व गुण प्रदर्शित केल्याबद्दल दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित केले.या पुरस्काराचे स्वरूप प्रशंसा प्रमाणपत्र आणि 50,000 रुपये रोख असे आहे
  • आझम यांनी हरित हरम प्रकल्पांतर्गत रक्तदान, अवयव दान आणि वृक्षारोपण कार्यक्रमांशी संबंधित अनेक जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत.
  • मोहम्मद आझम यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून त्यांना ‘इंदिरा गांधी एनएसएस पुरस्कार’ आणि आंध्र प्रदेश राज्य सरकारकडून प्रतिभा पुरस्कार आणि राष्ट्रीय गौरव सन्मान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

क्रीडा बातम्या(Current Affairs for MPSC)

 13. रौनक साधवानीने 2021 स्पिलिम्बर्गो खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली

Current Affairs in Marathi | 18 August 2021_160.1
रौनक साधवानीने 2021 स्पिलिम्बर्गो खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
  • नागपूर येथील 15 वर्षीय तरुण भारतीय ग्रँडमास्टर रौनक साधवानीने इटलीमध्ये 19 वी स्पिलिम्बर्गो खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.
  • चौथ्या मानांकित साधवानीने नवव्या आणि शेवटच्या फेरीत  इटालियन जीएम पियर लुईगी बसो यांच्यातील टायब्रेकरच्या चांगल्या गुणांच्या आधारे रौनकला विजेता घोषित करण्यात आले.

 14. मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह करार केला

Current Affairs in Marathi | 18 August 2021_170.1
मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह करार केला
  • लिओनेल मेस्सीने 21 वर्षांनंतर, बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देत दिग्गजांचा भरणा असलेल्या पॅरिस सेंट जर्मेन या क्लबमध्ये समावेश केला आहे.
  • युरोपच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी सहा वेळा बालोन डी’ओर विजेत्या मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह दोन वर्षांचा करार केला आहे जो एका वर्षाने वाढविता येऊ शकतो. पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल क्लब, सामान्यतः पॅरिस सेंट-जर्मेन किंवा पीएसजी म्हणून ओळखला जातो.
  • मेस्सीने बार्सिलोना कडून खेळताना विक्रमी 778 सामन्यांत 672 गोलसह डागले असून त्याने जिंकून दिलेल्या ट्रॉफीमध्ये चार चॅम्पियन्स लीग आणि 10 ला लीगा जेतेपदांचा समावेश आहे.

निधन बातम्या(Current Affairs for mpsc in Marathi)

 15. सुडोकू कोड्याचे निर्माते माकी काजी यांचे निधन

Current Affairs in Marathi | 18 August 2021_180.1
सुडोकू कोड्याचे निर्माते माकी काजी यांचे निधन
  • सुडोकू कोड्याचे निर्माते जपानचे माकी काजी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी पित्त नलिकांच्या कर्करोगाने निधन झाले.
  • ते जपानी कोडी निर्माण करणाऱ्या निकोली कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष होते. काजींनी 1980 मध्ये मित्रांसह जपानची पहिली कोडे मासिक, पझल सुशिन निकोलीची स्थापना केली.
  • त्याची सर्वात प्रसिद्ध निर्मिती सुडोकू 1983 मध्ये झाली.

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Current Affairs in Marathi | 18 August 2021_190.1
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Current Affairs in Marathi | 18 August 2021_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Current Affairs in Marathi | 18 August 2021_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.