Marathi govt jobs   »   Study Materials   »   69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023, पुरस्कार विजेत्यांची यादी तपासा

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक म्हणून ओळखले जातात. हे पुरस्कार देशाच्या समृद्ध सिनेमॅटिक टेपेस्ट्रीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या समर्पण आणि सर्जनशीलतेला स्पष्ट करतात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत, चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे आयोजित केले जातात. 2021 या वर्षासाठीचे 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 हा फार महत्वाचा घटक  आहे. या लेखात 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी देण्यात आली आहे.

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती 2023 लास्ट मिनिट रिव्हिजन टिप्स

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: विहंगावलोकन

24 ऑगस्ट 2023 रोजी 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 घोषित करण्यात आले. 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: विहंगावलोकन
श्रेणी चालू घडामोडी
विषय चालू घडामोडी
उपयोगिता तलाठी भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधी जाहीर झाले? 24 ऑगस्ट 2023
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म रॉकेट्री: द नांबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सॅनन (मिमी)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा इतिहास

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954 मध्ये “राज्य पुरस्कार” या नावाने सुरू झाले. त्यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांनाच नामांकन आणि पुरस्कार दिले जात होते. 1967 मध्ये चित्रपटांवर काम करणाऱ्या अभिनेते आणि तंत्रज्ञांना पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारा पहिला अभिनेता म्हणजे नर्गिसने रात और दिनमधील अभिनयासाठी तर उत्तम कुमारला अँटनी फिरंगी आणि चिरियाखानासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: महत्वाचे मुद्दे

  • फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष केतन मेहता, नॉन-फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष वसंत एस साई, सर्वोत्कृष्ट लेखन निवड समितीचे यतींद्र मिश्रा यांनी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा सेखर यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा केली.
  • रॉकेट्री: द नंबी इफेक्ट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म प्रकारात सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव या चित्रपटाला पुरस्कार जाहीर  झाला आहे.
  • द काश्मीर फाईल्सला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर RRR ला परिपूर्ण मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला  आहे.
  • अल्लू अर्जुनला पुष्पा (द राइज पार्ट I) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी, आणि क्रिती सॅनॉन मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या संयुक्त विजेत्या ठरल्या आहेत.
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार एकदा काय झालं या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला जाहीर झाला आहे.
  • निखील महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • चित्रपट विषयक सर्वोत्तम पुस्तकासाठीचा पुरस्कार रूपा पब्लिकेशनच्या राजीव विजयकर लिखित Music by Laxmikant Pyarelal: The Incredibly Melodious Journey या इंग्रजी पुस्तकाला घोषित झाला आहे.
भारतातील शेती
अड्डा247 मराठी अँप

भारताची जणगणना 2011

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी खाली देण्यात आली आहे.

श्रेणी विजेता
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म रॉकेट्री: द नांबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन (गोदावरी)
बेस्ट पॉपुलर फिल्म प्रोवाइडिंग होलसम एंटरटेनमेंट आरआरआर
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार भाविन रबारी (छेल्लो शो)
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजनल) शाही कबीर (नायट्टू)
सर्वोत्कृष्ट पटकथा (एडेप्टेड) संजय लीला भंसाली आणि उत्कर्षिनी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक उत्कर्षिणी वशिष्ठ व प्रकाश कपाडिया (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (स़ॉन्गस) देवी श्री प्रसाद (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत) एम. एम, कीरावानी (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक काला भैरव (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका श्रेया घोषाल (इराविन निज़ल)
सर्वोत्कृष्ट गीत चंद्रबोस (कोंडा पोलमचा धाम धाम धाम)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट 777 चार्ली
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट होम
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट छेल्लो शो
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट काडैसी विवसयी
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट उपपेना
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट समानान्तर
सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट बूंबा राइड
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकडा काय झालं
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट कल्कोक्खो
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट अनुर
सर्वोत्कृष्ट मेइतिलोन चित्रपट इखोइगी यम
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट प्रत्यक्षा
इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ड डेब्यू फिल्म ऑफ डायरेक्टर मेप्पडियन (विष्णू मोहन)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुनाद – द रेज़ोनेंस
पर्यावरण संवर्धन/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आवासव्यूहम
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट गांधी अँड कंपनी
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (लोकेशन साउंड रेकॉर्डिस्ट) अरुण अशोक आणि सोनू केपी (चविट्टू)
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (साउंड डिझायनर) अनिश बसू (झिल्ली)
बेस्ट ऑडियोग्राफी (री-रिकॉर्डिस्ट ऑफ द फाइनल मिक्स्ड ट्रैक) सिनॉय जोसेफ (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन प्रेम रक्षित (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी अविक मुखोपाध्याय (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर वीरा कपूर (सरदार उधम)
बेस्ट स्पेशल इफेक्ट्स श्रीनिवास मोहन (आरआरआर)
बेस्ट प्रोडक्शन डिज़ाइन दिमित्री मलिच आणि मानसी ध्रुव मेहता (सरदार उधम)
बेस्ट एडीटिंग संजय लीला भंसाली (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्तम मेकअप प्रीतीशील सिंग (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन राजा सोलोमन (आरआरआर)
विशेष ज्युरी पुरस्कार शेरशाह (विष्णुवर्धन)
स्पेशल मेंशन 1. स्वर्गीय श्री नलंदी (कडैसी विवसयी) 2. अरण्य गुप्ता आणि बिथन बिस्वास (झिल्ली) 3. इंद्रन्स (होम) 4. जहांआरा बेगम (अनुर)
सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म एक था गांव
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (नॉन फीचर फिल्म) बकुल मतियानी (स्माईल प्लीज)
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण नॉन-फीचर चित्रपट पंचिका, अंकित कोठारी
सर्वोत्कृष्ट एंथ्रोपोलॉजिकल चित्रपट फायर ऑन एज
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट रुखु मतिर दुखु माझी आणि बियॉन्ड ब्लास्ट
सर्वोत्कृष्ट कला चित्रपट टी.एन. कृष्णन (बो स्ट्रिंग्स टू डिवाइन)
सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट एथोस ऑफ़ डार्कनेस
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट लुप्तप्राय विरासत ‘वर्ली आर्ट’
सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट (नॉन फीचर फिल्म) मुन्नम वलावु
सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फीचर फिल्म) मिट्ठू दी आणि थ्री टू वन
सर्वोत्कृष्ट इंवेस्टिगेटिव चित्रपट लुकिंग फॉर चालान
सर्वोत्कृष्ट एक्सप्लोरेशन चित्रपट आयुष्मान
सर्वोत्कृष्ट एजुकेशनल चित्रपट सिरपिगलिन सिरपंगल
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म दाल भात
सर्वोत्कृष्ट अँनिमेशन चित्रपट कंदित्तुंडु
सर्वोत्कृष्ट  फिल्म ऑफ फैमिली वैल्यूज चित्रपट चांद सांसे
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (नॉन फीचर फिल्म) बिट्टू रावत (पाताल)
सर्वोत्कृष्ट ऑडियोग्राफी (री-रिकॉर्डिस्ट ऑफ द फाइनल मिक्स्ड ट्रैक) (नॉन-फीचर फिल्म) उन्नी कृष्णन (एक था गाव)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन साउंड रिकॉर्डिस्ट (लोकेशन/सिंक साउंड) (नॉन-फीचर फिल्म) सुरुची शर्मा (मीन राग
सर्वोत्कृष्ट एडीटिंग (नॉन-फीचर फिल्म) अभ्रो बॅनर्जी (इफ मेमोरी सर्व्स मी राइट)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (नॉन फीचर फिल्म) ईशान दिवेचा (सक्सेलेंट)
सर्वोत्कृष्ट कथन/व्हॉइस ओव्हर (नॉन-फीचर फिल्म) कुलदा कुमार भट्टाचार्जी (हाथीबंधु)
स्पेशल मेंशन (नॉन-फीचर फिल्म) 1. अनिरुद्ध जटकर (बाले बंगारा), 2. श्रीकांत देवा (करुवराई), 3. स्वेता कुमार दास (द हीलिंग टच), 4. राम कमल मुखर्जी (एक दुआ)
विशेष ज्युरी पुरस्कार (नॉन फीचर फिल्म) शेखर बापू रणखंबे (रेखा)
सिनेमा वरील बेस्ट पुस्तक राजीव विजयकर लिखित म्यूजिक बाय लक्ष्मीकांत प्यारेलाल: द इनक्रेडिबली मेलोडियस जर्नी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) पुरूषोत्तम चार्युलु
सर्वोत्कृष्ट चित्रपट – समीक्षक (स्पेशल मेंशन) सुब्रमण्य बंडूर
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.

लेखाचे नाव लिंक
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 कधी जाहीर झाले?

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला?

माधवन स्टारर रॉकेट्री: द नंबी इफेक्टला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सॅनन (मिमी) यांना मिळाला.