Marathi govt jobs   »   World Malala Day: 12 July |...

World Malala Day: 12 July | 12 जुलै: जागतिक मलाला दिन

World Malala Day: 12 July | 12 जुलै: जागतिक मलाला दिन_2.1

 

12 जुलै: जागतिक मलाला दिन

युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफजईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलैला जागतिक मलाला दिन म्हणून घोषित केले आहे. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफजईचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर 2012 रोजी मलालाला जाहीररीत्या मुलींच्या शिक्षणाची वकिली केल्याबद्दल तालिबानी अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातली होती पण या हल्ल्यातून ती बचावली. तरुण मुलींना शाळेत जाण्यास मदत करण्यासाठी तिने मलाला फंड ही एक ना-नफा संस्था स्थापन केली आणि “मी आहे मलाला” नावाच्या पुस्तकाचे सह-लेखन केले.

मलालाला मिळालेले इतर सन्मान आणि पुरस्कार: 

  • 2012 -पाकिस्तान सरकारने पहिला राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार.
  • 2014 – वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
  • 2015-  ‘ही नेम्ड मी मलाला’ माहितीपट ऑस्करसाठी निवडण्यात आला होता.
  • 2019- जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन – संयुक्त राष्ट्र
  • मलाला यांना मानद कॅनेडियन नागरिकत्व देखील देण्यात आले आहे आणि कॅनडामधील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधणारी ती सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे.
  • ‘वी आर डिसप्लेस्ड’ – दुसरे पुस्तक.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!