श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने निवृत्ती जाहीर केली
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून जवळपास 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची समाप्ती केली. श्रीलंकेकडून डिसेंबर 2009 मध्ये पदार्पणानंतर परेराने सहा कसोटी सामने, 166 एकदिवसीय सामने (2338 धावा, 175 बळी) आणि 84 टी -20 (1204 धावा, 51 बळी) खेळले होते.