Marathi govt jobs   »   RK Sabharwal gets highest civilian award...

RK Sabharwal gets highest civilian award of Mongolia I आर.के.सभरवाल यांना मंगोलिया चा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

RK Sabharwal gets highest civilian award of Mongolia I आर.के.सभरवाल यांना मंगोलिया चा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान_2.1

 

आर.के.सभरवाल यांना मंगोलिया चा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

इंजीनियर्स इंडिया लिमिटेड (ईआयएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी), आर. के. सभरवाल यांना मंगोलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ मंगोलीयाचे भारतातील राजदूत गोंचिंग गॅनबोल्ड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंगोलियातील पहिल्या ओईल रिफायनरीच्या स्थापनेत दिलेल्या योगदानाबद्दल मंगोलियाच्या राष्ट्रपतींतर्फे सभरवाल यांना हा सन्मान देण्यात आला. ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ हा मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांमार्फत देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो मंगोलियाच्या उत्कर्षासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना देण्यात येतो . हा पुरस्कार मंगोलियाच्या मित्र राष्ट्रांतील तसेच त्या देशातील कला, संस्कृती, विज्ञान आणि मानवता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येतो.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • मंगोलियाची राजधानी: उलानबातर
  • मंगोलिया चलन: मंगोलियन टोग्रोग
  • मंगोलियाचे अध्यक्ष: उखना खुरेलसुख

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!