Marathi govt jobs   »   RBI announces change in Government securities...

RBI announces change in Government securities auction methodology I आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल

RBI announces change in Government securities auction methodology I आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल_2.1

 

आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये बदल जाहीर केला आहे. यापुढे एकसमान किंमत लिलाव पद्धतीचा वापर करून 2-वर्ष, 3-वर्ष, 5-वर्ष, 10-वर्ष, 14-वर्षे  कालावधीचे आणि अस्थायी दर रोखे [फ्लोटिंग रेट बाँड (एफआरबी)] कर्जरोख्यांची विक्री करण्यात येईल. इतर स्थिरमुदत कर्जरोखे जसे 30 वर्ष आणि 40 वर्ष मुदतीच्या कर्जरोख्यांचा  यापुर्वीप्रमाणेच बहुविध किमतींवर आधारित पद्धतीने लिलाव केला जाईल.

एकसमान किंमत लिलाव पद्धत: 

यामध्ये सर्व यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे एकस्मान्र दराने म्हणजेच लिलावाच्या कट-ऑफ दराने विकत घेणे आवश्यक आहे, त्यांनी कोणत्या दराची बोली लावली होती हे विचारात घेतले जाट नाही.

बहुविध किमत लिलाव पद्धत:

या मध्ये यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे ज्या दराला बोली लावली होती त्या दराला विकत घेणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!