नोवाक जोकोविच ने जिंकले फ्रान्स खुल्या टेनिस स्पर्धा 2021 चे अजिंक्यपद
स्तेफोनास त्सित्सिपास ला नमवून नोवाक जोकोविच आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा फ्रान्स खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता बनला आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेल्यांच्या यादीत रॉजर फेडरर आणि राफेल नादाल यांच्या नंतर जोकोविच 19 ग्रँड स्लॅम किताबांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर दोघांनी प्रत्येकी 20 ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत.
खुल्या स्पर्धेच्या युगात 2 वेळा करीयर ग्रँड स्लॅम जिंकेलेला जोकोविच पहिला खेळाडू आहे. त्याने ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा 9 वेळा, विम्बल्डन 5 वेळा आणि अमेरिकन खुली 3 वेळा जिंकली आहे. चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन वेळा जिंकणारा, रॉड लॅव्हर नंतर तो 52 वर्षात पहिला खेळाडू आहे. असा अद्वितीय पराक्रम करणारा तो एकुणात तिसरा खेळाडू आहे. पहिला आहे रॉय इमर्सन.
2021 च्या फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेते
- पुरुष एकेरी: नोवाक जोकोविच (सर्बिया)
- महिला एकेरी: बार्बरा क्रेजीकोव्हा (झेक प्रजासत्ताक)
- पुरुष दुहेरी: पियेरे-हुजेस-हर्बर्ट (फ्रान्स) आणि निकोलस माहूत (फ्रान्स)
- महिला दुहेरी: बार्बरा क्रेजीकोव्हा (झेक प्रजासत्ताक) आणि कतरिना सिनियाकोव्हा (झेक प्रजासत्ताक)
- मिश्र दुहेरी: डीझायरे क्रोझाईक (संयुक्त संस्थाने) आणि जोई सॅलीसबुरी ( युनायटेड किंगडम)
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi
App- Adda247 (मराठी भाषा)
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक