एन रांगासामी यांनी घेतली पुदूचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
ऑल इंडिया एनआर कॉंग्रेस (एआयएनआरसी) चे संस्थापक नेते एन. रंगासामी यांनी 07 मे 2021 रोजी पुदूचेरीच्या केंद्र शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एन रंगासामी यांना पदाची व गोपनीयतेची शपथ लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) तमिळसाई सौंदराराजन यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
याआधी, 71-वर्षीय रंगासामी यांनी पुदूचेरीचे मुख्यमंत्री म्हणून 2001 ते 2008 पर्यंत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य म्हणून आणि त्यानंतर 2011 ते 2016 पर्यंत एआयएनआरसीचे सदस्य म्हणून काम केले. यंदा प्रथमच रंगासमी हे संयुक्त मंत्रिमंडळ, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) चे अध्यक्ष असतील, ज्यात भाजप आणि एआयएनआरसीचे सदस्य आहेत.