Table of Contents
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र जाहीर
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 14 व 18 एप्रिल, 2024 रोजी नियोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या लेखात सविस्तर माहिती तपासा.
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी : विहंगावलोकन
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
लेखाचे नाव | MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र |
चाचणी तारीख | 14 व 18 एप्रिल 2024 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र अधिकृत सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 14 व 18 एप्रिल, 2024 रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ तसेच प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र अधिकृत सूचना PDF
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र लिंक
उमदेवार खालील लिंक वर क्लिक करून आपल्या खात्यात लॉग in करून आले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणी प्रवेशपत्र लिंक
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.