Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Polity | घटनादुरुस्तीचे प्रकार

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण घटनादुरुस्तीचे प्रकार बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Polity (राज्यशास्त्र)
टॉपिक  घटनादुरुस्तीचे प्रकार

घटनादुरुस्तीचे प्रकार आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया

 • भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे.
 • कलम 368 (1) नुसार, संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, संसद घटनादुरुस्ती करतांना घटनेच्या ‘मूलभूत संरचनेत’ बदल करू शकत नाही.
 • राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे.

भारतातील घटनादुरुस्तीचे प्रकार

कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीचे दोन प्रकार दिलेले आहेत:

संसदेच्या साध्या बहुमताने (कलम 368 च्या बाहेरील दुरूस्ती)

दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने( कलम 368 च्या बाहेर) घटनेतील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा/दुरुस्ती (Constitutional Amendment) करता येते.

उदाहरणार्थ:

 • नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा व नावात बदल,
 • राज्यांमध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा नष्ट करणे,
 • दुसरी अनुसूची: राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार, भत्ते, अधिकार इत्यादी.
 • संसदेची गणसंख्या
 • संसद सदस्यांचे पगार व भत्ते
 • संसदेच्या कामकाजाचे नियम
 • संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार (privileges)
 • संसदेत इंग्रजीचा वापर
 • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या
 • सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे.
 • कार्यालयीन भाषेचा वापर
 • संसदेच्या व राज्य विधीमंडळांच्या निवडणूका
 • नागरिकत्व
 • मतदारसंघांचे परिसीमन
 • केंद्रशासित प्रदेश
 • पाचवी व सहावी अनुसूची
संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरूस्ती (By Special Majority of Parliament):
 • घटनेतील बहुतेक तरतुदींमध्ये दुरूस्ती कलम 368 अंतर्गत विशेष बहुमताने करता येते. त्यासाठी घटनादुरूस्ती विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररित्या सभागृहांच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.
 • या पद्धतीने मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि पहिल्या व तिसऱ्या पद्धतींमध्ये न येणाऱ्या तरतुदींमध्ये दुरुस्ती केली जाते.
संसदेचे विशेष बहुमत व निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटनादुरूस्ती (By Special Majority of Parliament and Consent of Half States)
 • घटनेतील संघराज्यीय तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी घटनादुरूस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने त्यास समर्थन देणे गरजेचे असते. मात्र त्यासाठी राज्यांवर कालावधीचे बंधन नाही.
 • पुढील तरतुदींमध्ये दुरूस्ती या पद्धतींनी करता येतेः
  • संघराज्य व घटकराज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती (extent)
  • संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व
  • सातव्या अनुसूचीतील कोणतीही सूची
  • राष्ट्रपतीची निवडणूक व त्याची पद्धत
  • सर्वोच्च व उच्च न्यायालये
  • संघराज्य व घटकराज्ये यांमध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी.
  • कलम 368 मधील तरतुदी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

घटनेमध्ये घटनादुरुस्ती करून बदल करता येतात का?

हो, घटनेच्या 'मूलभूत संरचनेत' बदल न करता घटनेमध्ये बदल करता येतात

राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

घटनादुरुस्तीसाठी कोणते कलम आहे?

घटनादुरुस्तीसाठी कलम 368 आहे.