Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Polity | पंचायत राज

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पंचायत राज बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Polity (राज्यशास्त्र)
टॉपिक पंचायत राज

पंचायत राज- केंद्रीय समित्या

केंद्र शासनाच्या पंचायत राज संबंधी समित्या :

  1. बलवंतराय मेहता समिती: 1957
  2. व्ही. टी. कृष्णमाचारी समिती: 1960
  3. तखतमल जैन समिती: 1966
  4. अशोक मेहता समिती: 1977
  5. डॉ. व्ही. के. राव समिती: 1985
  6. एल. एम. सिंघवी समिती: 1986
  7. पी. के. थंगन समिती: 1988

पंचायत राज- रचना

पंचायत राज- ग्रामीण भागातील रचना पुढील तक्त्यात दिलेली आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाईल.

ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद
निर्वाचित सदस्य 7 ते 17 50 ते 75
पदसिद्ध सदस्य सरपंच जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती
कालावधी 5 वर्षे 5 वर्षे 5 वर्षे
सदस्य निवडीसाठीचे मतदारसंघ प्रभाग/ वॉर्ड निर्वाचन गण निवडणूक विभाग
एका मतदार संघातून निवडावयाचे सदस्य 2 किंवा 3 1 1
मतदारसंघ रचना संख्या जिल्हाधिकारी ठरवतात, रचना तहसिलदार जाहिर करतात. विभागणी: जिल्हाधिकारी अंतिम मान्यता: विभागीय आयुक्त विभागणी: जिल्हाधिकारी अंतिम मान्यता: विभागीय आयुक्त
पहिली बैठक कोण बोलवणार? जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
अध्यक्ष निवड निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला सरपंच म्हणून निवडतात.(2019 पासून) निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला सभापती म्हणून निवडतात.

 

निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला अध्यक्ष म्हणून निवडतात.

 

उपाध्यक्ष उप-सरपंच उप-सभापती उपाध्यक्ष
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी 5 वर्षं 2 ½ वर्षं 2 ½ वर्षं

पंचायत राज- अविश्वास ठराव

पंचायत राज- अविश्वास ठरावाची पद्धत पुढील तक्त्यात दिलेली आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाईल.

ग्रामपंचायत (सरपंच- उपसरपंच)

पंचायत समिती (सभापती- उपसभापती)

जिल्हा परिषद (अध्यक्ष- उपाध्यक्ष)

अविश्वासाच्या ठरावाच्या विशेष सभेकरिता किमान किती सदस्यांनी मागणी करावी लागते? किमान 1/3 किमान 1/3 किमान 1/2
विशेष सभेची मागणी कोणाकडे करावी? जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी
किती दिवसाच्या आत सभा बोलावली जाते? 10 10 10
अध्यक्षस्थानी कोण असतात? तहसिलदार जिल्हाधिकारी / त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी

 

जिल्हाधिकारी / त्याने प्राधिकृत केलेला उप-जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी

 

ठराव मंजूरी करिता बहुमत किमान 2/3 सदस्याचे बहुमत आणि ग्रामसभेने बहुमताने त्या ठरावाला अनुमोदन दिलेले असावे. (2019 पासून) किमान 2/3 सदस्यांचे बहुमत. परंतु पद महिले करिता राखीव असल्यास किमान 3/4 बहुमत.

 

किमान 2/3 सदस्यांचे बहुमत. परंतु पद महिले करिता राखीव असल्यास किमान 3/4 बहुमत.

 

विवादा बाबत कोणाकडे अर्ज करता येतो? जिल्हाधिकारी

(30 दिवसात)

अपील कोणाकडे करता येते? विभागीय आयुक्त (7 दिवसात)
कोणत्या कालावधीत अविश्वास ठराव मांडता येत नाही? निवडी पासून 6 महिने आणि अविश्वास ठराव असफल झाल्या पासून 1 वर्षाच्या आत. (2019 पासून) निवडी पासून 6 महिने आणि अविश्वास ठराव असफल झाल्या पासून 1 वर्षाच्या आत.

निवडी पासून 6 महिने आणि अविश्वास ठराव असफल झाल्या पासून १ वर्षाच्या आत.

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

पंचायत राज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पंचायत राज बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

पंचायत राज हा विषय कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे?

पंचायत राज हा विषय MPSC परीक्षेसाठी उपयुक्त आहे.