Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भारतातील खनिज संपत्ती बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Geography (भूगोल) |
टॉपिक | भारतातील खनिज संपत्ती |
भारतातील खनिज संपत्ती: खनिजाचे गुणधर्म
खनिजांच्या प्राकृतिक, रासायनिक, चुंबकीय, इ. गुणधर्मांची माहिती घेऊन गरजांप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केल्या जाते. खनिजाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.
- रंग (Color): कोणतीही गोष्ट आपण तिच्या रंगावरून ओळखू शकतो. खनिजेही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच खनिजाचा रंग हे त्याचे सगळ्यात मूलभूत वैशिष्ट्य आहे.
- चकाकी (Luster): एखाद्या वस्तूवर प्रकाश पडला की, त्या वस्तूचा पृष्ठभाग चमकायला लागतो. याला ‘चकाकी’ असे म्हणतात. ‘चकाकी’ म्हणजे खनिजाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता. ही ‘चकाकी’ मुख्यतः खनिजाच्या पृष्ठभागावरील परिस्थितीवर अवलंबून असते.
- स्ट्रीक (Streak): जेव्हा खनिज हे पोर्सेलिनप्लेटवर घासले जाते, तेव्हा त्या खनिजाचे थोडेसे चूर्ण त्या प्लेटवर तयार होते. या चूर्णाचा रंग म्हणजेच ‘स्ट्रीक’ होय. हा फार महत्त्वाचा गुणधर्म आहे, कारण काही वेळेला दोन खनिजांचा रंग एकच असू शकतो, पण ‘स्ट्रीक’ एक नसतो. उदाहरणार्थ, क्रोमाईट (Chromite) व मॅग्नेटाईट (Magnetite) या दोघांचाही रंग काळा असतो. पण क्रोमाईटची ‘स्ट्रीक’ ही मातकट, तर मॅग्नेटाईटची ‘स्ट्रीक’ ही काळी असते. यावरून खनिजांचे वर्गीकरण करणे सोपे होते.
- काठिण्य (Hardness): खनिजांच्या ‘काठिण्यपातळी’ची माहिती घेऊन त्यांचे उपयोग ठरवता येतात. ‘काठिण्यता’ म्हणजे खनिजाची घर्षणीय बलाला विरोध करणारी क्षमता. कठीण खनिजांपासून ड्रिल बिट्स् बनवतात, तर मऊ खनिजांचेचूर्ण करून त्यांचा वापर करणे सोपे असते. मोह या शास्त्रज्ञाने ‘काठिण्यपातळी’चा तक्ता तयार केला आहे. यात एक ते दहा अंक असून एकवर शंखजिरे (Talc) म्हणजे सर्वात मऊ, तर दहावर हिरा (Diamond) म्हणजे सर्वात कठीण अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
- रासायनिक घटक (Chemical elements): विविध खनिजांमध्ये विविध रासायनिक घटक असतात. या रासायनिक घटकांवरून त्यांची उपयोगिता ठरवता येते. तसेच या रासायनिक घटकांमुळेच खनिजांना विविध रंगही प्राप्त होतात. उदाहरणार्थ, काचमणी (Rock Crystal – SiO2) हा शुद्ध स्वरूपात असताना रंगहीन असतो, पण जर यात टायटेनियमही असेल, तर त्याचा रंग गुलाबी होतो.
भारतातील खनिज संपत्ती: खनिज उत्पादनाची राज्यनिहाय यादी
खनिज उत्पादनाची राज्यनिहाय यादी खाली देण्यात आली आहे.
खनिज | खाणी | जास्त उत्पादक घेणारी राज्य | जास्त साठा असणारी राज्ये |
लोखंड (आयर्न) | बाराबिल – कोईरा व्हॅली (ओरिसा) बैलादिला खाण (छत्तीसगड) दल्ली-राजहरा (CH) – भारतातील सर्वात मोठी खाण |
1. ओरिसा 2. छत्तीसगड 3. कर्नाटक |
1. ओरिसा 2. झारखंड 3. छत्तीसगड |
मॅंगनीज | नागपूर- भंडारा प्रदेश (महाराष्ट्र) गोंडाईत खाणी (ओरिसा) खोंडोलाइट ठेवी (ओरिसा) |
1. मध्य प्रदेश 2. महाराष्ट्र |
1. ओरिसा 2. कर्नाटक 3. मध्य प्रदेश |
क्रोमाइट | सुकिंदा व्हॅली (ओरिसा) हसन प्रदेश (कर्नाटक) |
1. ओरिसा 2. कर्नाटक 3. आंध्र प्रदेश |
1. सुकिंदा व्हॅली (OR) 2. गुंटूर प्रदेश (AP) |
निकेल | सुकिंदा व्हॅली (ओरिसा) सिंगभूम प्रदेश (झारखंड) |
1. ओरिसा 2. झारखंड |
1. ओरिसा 2. झारखंड 3. कर्नाटक |
कोबाल्ट | सिंहभूम प्रदेश (झारखंड) केंदुझार (ओरिसा) तुएनसांग (नागालँड) |
1. झारखंड 2. ओरिसा 3. नागालँड |
|
बॉक्साइट | बालंगीर (ओरिसा) कोरापुट (ओरिसा) गुमला (झारखंड) शहडोल (मध्य प्रदेश) |
1. ओरिसा 2. गुजरात |
1. जुनागड (GJ) 2. दुर्ग (CH) |
तांबे | मालंजखंड बेल्ट (मध्य प्रदेश) खेत्री बेल्ट (राजस्थान) खो-दरिबा (राजस्थान) |
1. मध्य प्रदेश 2. राजस्थान 3. झारखंड |
1. राजस्थान 2. मध्य प्रदेश 3. झारखंड |
सोने | कोलार गोल्ड फील्ड (कर्नाटक) हुट्टी गोल्ड फील्ड (कर्नाटक) रामगिरी माईन्स (आंध्र प्रदेश) सुनर्णरेखा सँड्स (झारखंड) |
1. कर्नाटक 2. आंध्र प्रदेश |
1. बिहार 2. राजस्थान 3. कर्नाटक |
चांदी | झावर माईन्स (राजस्थान) टुंडू माईन्स (झारखंड) कोलार गोल्ड फील्ड्स (कर्नाटक) |
1. राजस्थान 2. कर्नाटक |
1. राजस्थान 2. झारखंड |
लीड | रामपुरा अघुचा (राजस्थान) सिंदेसर खाणी (राजस्थान) |
1. राजस्थान 2. आंध्र प्रदेश 3. मध्य प्रदेश |
1. राजस्थान 2. मध्य प्रदेश |
टीन | दंतेवाडा (छत्तीसगड) | छत्तीसगड (भारतातील एकमेव राज्य) | छत्तीसगड |
मॅग्नेशियम | चॉक हिल्स (तामिळनाडू) अल्मोडा (उत्तराखंड) |
1. तामिळनाडू 2. उत्तराखंड 3. कर्नाटक |
1. तामिळनाडू 2. कर्नाटक |
चुनखडी | जबलपूर (मध्य प्रदेश) सतना (मध्य प्रदेश) कडप्पा (एपी) |
1. राजस्थान 2. मध्य प्रदेश |
1. आंध्र प्रदेश 2. राजस्थान 3. गुजरात |
जिप्सम | जोधपूर, बिकानेर, जैसलमेर-राजस्थान | 1. राजस्थान 2. तामिळनाडू 3. गुजरात |
1. राजस्थान 2. तामिळनाडू 3. जम्मू-काश्मीर |
हिरा | माझगवान पन्ना खाण (मध्य प्रदेश) ही भारतातील एकमेव सक्रिय हिऱ्याची खाण आहे | 1. मध्य प्रदेश – फक्त हिरे उत्पादक राज्य | |
कोळ | कोरबा कोलफिल्ड, बिरामपूर – छत्तीसगड झारिया कोलफिल्ड, बोकारो कोलफिल्ड, गिरडीह – (झारखंड) तालचेर फील्ड – (ओरिसा) सिंगरुली कोलफिल्ड (छत्तीसगड) – सर्वात मोठे |
1. छत्तीसगड 2. झारखंड 3. ओरिसा |
1. झारखंड 2. ओरिसा 3. छत्तीसगड |
पेट्रोलियम | लुनेज, अंकलेश्वर, कलोल-गुजरात- मुंबई उच्च-महाराष्ट्र- सर्वात मोठे तेल क्षेत्र दिग्बोई-आसाम- भारतातील सर्वात जुने तेल दाखल |
1. महाराष्ट्र 2. गुजरात |
1. गुजरात 2. महाराष्ट्र |
युरेनियम | जादुगुडा खाण (झारखंड) तुम्मालापल्ले खाण (आंध्र प्रदेश) – डोमियासियात खाण (मेघालय) सर्वात मोठी खाण |
1. आंध्र प्रदेश 2. झारखंड 3. कर्नाटक |
1. झारखंड 2. आंध्र प्रदेश 3. कर्नाटक |
थोरियम | 1. केरळ 2. झारखंड 3. बिहार |
1. आंध्र प्रदेश 2. तामिळनाडू 3. केरळ |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.