Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण रोग व रोगांचे प्रकार बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Science (विज्ञान) |
टॉपिक | रोग व रोगांचे प्रकार |
रोग व रोगांचे प्रकार – संक्रामक रोगांचे प्रकार
संक्रामक रोगांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. त्यांची नावे व व्याख्या खालीलप्रमाणे आहे.
संक्रामक रोग (Infectious diseases)
- संसर्गजन्य रोग (Communicable Diseases)
- संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases)
- साथीचे रोग
संसर्गजन्य रोग (Communicable Diseases): सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतू निरोगी व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. उदा. क्षयरोग
संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases): आजारी व्यक्तीमधील रोगजंतूंचा स्पर्शावाटे निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास त्यालाच संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदा. कुष्ठरोग, गजकर्ण
साथीचे रोग: हवामानातील विशिष्ट बदलामुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना एकच रोग होतो त्या रोगांना साथीचे रोग असे म्हणतात.
उदा. कॉलरा, हगवण, डोळे येणे, इन्फ्युएंझा, विषमज्वर
रोग व रोगांचे प्रकार – प्रसारानुसार रोगांचे प्रकार
प्रसारानुसार रोगांचे तीन प्रकार पडतात. ते प्रकार व त्यांच्या व्याख्या खाली दिलेल्या आहेत.
प्रसारानुसार रोगांचे प्रकार (Types of diseases according to prevalence)
- सार्वत्रिक रोग (Pandemic diseases)
- प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases)
- व्यापक रोग (Epidemic Diseases)
सार्वत्रिक रोग (Pandemic diseases): जे आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेले असतात त्यांनाच सार्वत्रिक रोग असे म्हणतात. उदा. कोरोना
प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases): जे आजार विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात त्यांनाच प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात. उदा. केरळ मधील अल्लापुझा, कोट्टायम व एर्नाकुलम या तीन जिल्ह्यांमध्ये हत्तीपाय ( फायलेरिआसिस ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे.
व्यापक रोग (Epidemic Diseases): जे आजार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्यांनाच व्यापक आजार असे म्हणतात. उदा. कॉलरा, टायफाईड
रोग व रोगांचे प्रकार – रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार
ज्याप्रमाणे रोगांचे त्यांच्या प्रसार व किती भागात रोगाचा विस्तार झाला आहे त्यानुसार प्रकार पडतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार (Diseases and Types of Diseases) आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.
- विषाणूजन्य आजार (Diseases Caused by Viruses)
- जीवाणूजन्य आजार (Diseases Caused by Bactria)
- आदिजीवजन्य आजार (Protozoal diseases)
- कवके (Fungus) व कृमी (Worms) यांच्यामुळे होणारे आजार
रोग व रोगांचे प्रकार – काही रोगांचे कारक सूक्ष्मजीव
परीक्षेत वारंवार रोग व त्याचे कारक जीव (म्हणजेच कोणता रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो) यावर प्रश्न विचारातात. त्याचा संपूर्ण तक्ता खाली दिलेला आहे.
विषाणूजन्य रोग
विषाणूजन्य रोग | |
रोगाचे नाव | कारक विषाणू |
इन्फ्लुएंझा
(Influenza) |
मायक्सोव्हायरस ए, बी, सी
(Myxovirus A, B, C) |
स्मॉल पॉक्स
(Small Pox) |
व्हेरिओला विषाणू
(Variola virus) |
कांजिण्या
(Chicken pox) |
व्हेरिसेला झोस्टर
(Varicella Zoster) |
गोवर
(Measles) |
पॅरामीक्सोव्हायरस
(Paramyxovirus) |
जर्मन गोवर (रुबेला)
(German Measles (Rubella)) |
रुबेला विषाणू
(Rubella virus) |
रेबीज
(Rabies) |
रेबीज विषाणू
(Rabies Virus) |
गलगंड
(Mumps) |
पॅरामीक्सो व्हायरस
(Paramyxo virus) |
ट्रेकोमा
(Trachoma) |
क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस
(Chlamydia trachomatis) |
पोलिओमायलायटीस
(Poliomyelitis) |
पोलिओव्हायरस (पिकोर्ना व्हायरस)
(Poliovirus (Picorna virus)) |
पीतज्वर
(Yellow fever) |
आर्बो व्हायरस
(Arbo virus) |
एड्स
(AIDS) |
एचआयव्ही
(HIV) |
हिपॅटायटीस
(Hepatitis) |
HAV, HVB, HCV HDV, HEV |
डेंग्यू ताप
(Dengue fever) |
DEN₁, DEN₂, DEN₃, DEN₄ |
डिप्थीरिया
(Diphtheria) |
कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थीरिया
(Cornebacterium diphtheriae) |
जीवाणूजन्य रोग
जीवाणूजन्य रोग | |
रोगाचे नाव | कारक जीवाणू |
क्षयरोग
(Tuberculosis) |
मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस
(Mycobacterium tuberculosis) |
डांग्या खोकला (पर्टुसिस)
(Whooping cough(pertussis)) |
बोर्डेटेला पेर्टुसिस
(Bordetella pertusis) |
गोनोरिया
(Gonorrhea) |
निसेरिया गोनोरिया
Neisseria gonorrhea |
उपदंश
(Syphilis) |
ट्रेपोनेमा पॅलिडम
(Treponema pallidum) |
धनुर्वात
(Tetanus) |
क्लोस्ट्रीडियम टेटानी
(Clostridium tetani) |
कॉलरा
(Cholera) |
व्हिब्रियो कोमा, व्ही. कॉलरा
(Vibrio coma, V. Cholera) |
विषमज्वर
(Typhoid) |
साल्मोनेला टायफी किंवा एस टायफोसा
(Salmonella typhi or S. typhosa) |
न्यूमोनिया
(Pneumonia) |
डिप्लोकोकस न्यूमोनिया
(Diplococcus Pneumonia) |
प्लेग
(Plague) |
येर्सिनिया पेस्टिस किंवा पाश्चुरेला पेस्टिस
(Yersinia pestis or Pasteurella pestis) |
कुष्ठरोग (हेन्सेन रोग)
(Leprosy (Hensen’s disease)) |
मायकोबॅक्टेरियम लेप्रेल
(Mycobacterium leprale) |
प्रोटोझोअन्स रोग
प्रोटोझोअन्स रोग | |
रोगाचे नाव | कारक प्रोटोझोअन्स |
मलेरिया
(Malaria) |
प्लास्मोडियम विवाक्स
(Plasmodium vivax) |
अमीबियासिस
(Amoebiasis) |
एंटामोएबा हिस्टोलिटिका
(Entamoeba histolytica) |
ट्रायपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार)
(Trypanosomiasis (Sleeping sickness)) |
ट्रायपॅनोसोमा एसपी.
(Trypanosoma sp.) |
कीटक वाहून नेणारे रोग
कीटक वाहून नेणारे रोग | |
डास (एनोफिलीस)
(Mosquito (Anopheles)) |
मलेरिया
(Malaria) |
एडीस इजिप्ती
(Aedes aegypti) |
डेंग्यू ताप
(Dengue fever) |
उंदीर, पिसू
(Rat. flea) |
प्लेग
(Plague) |
क्युलेक्स
(Calex) |
फायलेरियासिस किंवा हत्तीरोग
(Filariasis or elephantiasis) |
घर माशी
(House fly) |
कॉलरा
(Cholera) |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.