Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Science | ढग व ढगांचे प्रकार

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण ढग व ढगांचे प्रकार बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Science (विज्ञान)
टॉपिक ढग व ढगांचे प्रकार

ढग व ढगांचे प्रकार

ढग व ढगांचे प्रकार: ढग हा वातावणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात (उर्ध्वगामी प्रवाहामुळे). दवबिंदू तापमान पातळीदेखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते.

ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात.

Types of Clouds
Types of clouds | ढगांचे प्रकार

ढगांचे प्रकार

ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात. 

1) अतिउंचीवरील ढग : ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मी. दरम्यान

2) मध्यम उंचीचे ढग:  उंची सुमारे 2000 ते 7000 मी. दरम्यान.

3) कमी उंचीचे ढग : 2000 मी. पेक्षा कमी उंची.

1) जास्त उंचीवरील ढग :

हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस (Cirrus), सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) या प्रकारामध्ये केले जाते.

 • सिरस (Cirrus): हे मुख्यतः तंतुमय असतात.
 • सिरोक्युम्युलस (Cirrocumulus): या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.
 • सिरोस्ट्रेटस (Cirrostratus): हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. – यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल असते.

2) मध्यम उंचीवरील ढग :

यात अल्टोक्युम्युलस (Altocumulus)अल्टोस्ट्रेटस (Altostratus) या ढगांचा समावेश होतो.

 • अल्टोक्युम्युलस (Altocumulus): हे स्तरांच्या स्वरुपात असून तरंगासारखी रचना असते, बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात.
 • अल्टोस्ट्रेटस (Altostratus): यात कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.

3) कमी उंचीवरील ढग :

यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात.

 • स्टॅटोक्युम्युलस (Stratocumulus): त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके असतात.
 • स्ट्रेटस् (Stratus): या ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो.
 • निम्बोस्ट्रेटस (Nimbostratus): गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. हे ढग जाड थरांचे असतात
 • क्युम्युलस ढग (Cumulus): – भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. घुमटाकार व अवाढव्य असतात. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढलो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रुपांतर होते.
 • क्युम्युलोनिम्बस ढग (Cumulonimbus): हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसांसह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. जेव्हा ढगातील हवा फार थंड असते, तेव्हा हे थेंब गोठतात व गारा स्वरुपात जमिनीवर येतात.

ढगांचे प्रकार

साधारण उंची (मी.)

 • सिरस (Cirrus)
 • सिरोस्ट्रॅंटस (Cirro-Stratus)
 • सिरोक्युम्युलस (Cirro-cumulus)

7000 ते 14000

 • अल्टो स्ट्रॅटस (Alto-stratus)
 • अल्टो क्युमुलस (Alto-Cumulus)

2000 ते 7000

 • स्ट्रॅटोक्युमुलस (Strato-cumulus)
 • स्ट्रॅटस् (Strutus)
 • निम्बोस्ट्रॅटस (Nimbostratus)

2000 पेक्षा कमी

 • क्युम्युलस (Cumulus)
 • क्युम्युलोनिम्बस (Cumulonimbus)

विस्तार कमी जास्त असतो

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

ढग म्हणजे काय?

ढग हा वातावणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे.

ढगांचे मुख्य किती प्रकार पडतात?

ढगांचे मुख्य 3 प्रकार पडतात.