Table of Contents
MPSC PSI 2021 निकाल जाहीर
MPSC PSI 2021 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी MPSC PSI 2021 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या अनाथ आरक्षणासंदर्भात मूळ अर्ज क्रमांक 396/2024 प्रकरणावरील मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या दिनांक 5 एप्रिल, 2024 रोजीच्या आदेशानुसार अनाथांची 02 पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये समाविष्ट करून एकूण 378 पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखात MPSC PSI 2021 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
MPSC PSI 2021 निकाल: विहंगावलोकन
MPSC PSI 2021 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.
MPSC PSI 2021 निकाल: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
भरतीचे नाव | महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 |
परीक्षा पद्धती | ऑफलाईन |
पदाचे नाव | पोलीस उपनिरीक्षक |
MPSC PSI 2021 निकाल | 10 एप्रिल 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in. |
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी गुणवत्ता यादी
दिनांक 10 एप्रिल 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in पोलीस उपनिरीक्षक पदासाठी गुणवत्ता यादी जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अंतिम गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.
पदाचे नाव | गुणवत्ता यादी PDF |
पोलीस उपनिरीक्षक | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सूचना
सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तुत गुणवत्ता यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.