Marathi govt jobs   »   Maharashtra’s Name, location and boundaries |...

Maharashtra’s Name, location and boundaries | महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार

Maharashtra's Name, location and boundaries | महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार_20.1

महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार

महाराष्ट्र या शब्दाचा उगम : प्राचीन काळी महाराष्ट्राचा समावेश दक्षिणापथ किंवा दंडकारण्याच्या प्रदेशात होत असे. ढोबळमानाने दक्षिणापथ दंडकारण्य व  महाराष्ट्र हे एकच भौगोलीक प्रदेश मानले जात.

  • सर्वसाधारणपणे महाराष्ट्र हा शब्द चौथ्या दशकापासून वापरात आलेला आढळतो.
  • इ.स. ३६५ : मध्य प्रदेशातील  ‘ऐरण’ गावातील स्तंभालेखात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो.
  • इ.स. ५0५: बृहत्‌संहितेच्या ( वराहमिहीर) १0 व्या अध्यायात    महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख.
  • ७ वे शतक : जैन मुनी संघदास गणीने बृहतकल्प भाष्यात महाराष्ट्राच्या कोल्लक परंपरेचा उल्लेख केला आहे.
  • ८ वे शतक : मरहट्ट लोकांचे वर्णन ‘कुवलयमाला’ या काव्यग्रंथात केलेले आढळते. सम्राट अशोकचा नातू संप्रती याने देखील महारठ्ठ(महाराष्ट्र) असा उल्लेख केला आहे.
  • महानुभव वाङमय  : प्राचीन काळी दक्षिणेकडे आलेल्या लोकांनी  गोंड, मल्ल, पांडू, अपरान्त, विदर्भ व अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली. ही सहा राष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तयार झाले असावे. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र असा महानुभाव वाङमयात उल्लेख आढळतो.

Maharashtra's Name, location and boundaries | महाराष्ट्राचे नाव, स्थान व विस्तार_30.1

महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्‍चिम व मध्य भागात वसलेले आहे.

अक्षवृत व रेखावृत्तीय विस्तार :

अक्षवृत्तीय विस्तार – 15° 08′ 46″ उत्तर ते 22°2’13” उत्तर.

रेखावृत्तीय विस्तार – 72°16′ 45″ पूर्व ते 80°9’17” पूर्व.

महाराष्ट्र विविध परीक्षा साहित्य. 

महाराष्ट्राचा आकार – महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे.  महाराष्ट्राचा आकार दक्षिणेकडे अरुंद आहे, तर उत्तरेकडे विस्तृत स्वरुपाचा आहे.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36%एवढे क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे.

लांबी व रुंदी – महाराष्ट्राची पूर्व-पश्‍चिम लांबी 800 कि.मी. व उत्तर-दक्षिण रुंदी 700 कि. मी. आहे

 

Sharing is caring!