Marathi govt jobs   »   Kerala police launched ‘Pink Protection’ project...

Kerala police launched ‘Pink Protection’ project | केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प

Kerala police launched ‘Pink Protection’ project | केरळ पोलिसांचा 'पिंक प्रोटेक्शन' प्रकल्प
केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प

केरळ पोलिसांनी सार्वजनिक, खासगी आणि डिजिटल ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. यात 10 घटक आहेत, त्यातील एक विद्यमान पिंक पोलिस पेट्रोलिंग सिस्टम, पिंक जनमैत्री बीट सक्रिय करणे हा आहे. ते पंचायत सदस्य, शेजारी आणि इतर स्थानिकांकडून माहिती गोळा करतील आणि पुढील कारवाईसाठी स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांकडे देतील. केरळ राज्य रस्ता परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि खासगी बस आणि शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानकांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी खास प्रशिक्षित महिला पोलिस अधिकारी तैनात करण्यात येतील. सर्व 14 जिल्ह्यांमध्ये पिंक नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.गर्दीच्या ठिकाणी समाजकंटकांची उपस्थिती शोधण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी पिंक शॅडो गस्त पथकही तैनात केले जाईल. प्रकल्पाचा एक भाग म्हणून “पिंक रोमियो” नावाचे महिला पोलिस अधिकाऱ्यांचे  बुलेटस्वार गस्ती पथकही सुरू करण्यात आली आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!