Table of Contents
आयुष्मान भारत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कर्नाटक प्रथम क्रमांकावर
ग्रामीण भागात व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत आरोग्य आणि निरोगीता केंद्रांची स्थापना करण्यात कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे. सन 2020 -2021 मध्ये हा प्रकल्प राबविण्यात कर्नाटक आघाडीवर आहे. केंद्राने 2263 केंद्रे स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले होते, तर राज्याने 31 मार्चपर्यंत 3300 केंद्रे उन्नत केली आहेत. सन 2020-2021 या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना राज्यात 95 पैकी 90 गुणांची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागानुसार आयुष्मान भारत – आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व पीएचसी सुधारित केल्या जात आहेत. राज्यात 11,595 केंद्रे एचडब्ल्यूसी म्हणून श्रेणीसुधारित करण्याचे लक्ष्य आहे. प्रौढांसाठी समुपदेशन सत्रे, सार्वजनिक योग शिबिरे, ईएनटी काळजी, आणीबाणीच्या वेळी प्रथमोपचार आणि तृतीयक रुग्णालयांना संदर्भित करणे या काही सेवा या केंद्रांमध्ये दिल्या जात आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:
- कर्नाटक राजधानी: बेंगळुरू;
- कर्नाटकचे राज्यपाल: वजुभाई वाला;
- कर्नाटकचे मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा.