Marathi govt jobs   »   India’s Rank 120th in Sustainable Development...

India’s Rank 120th in Sustainable Development Report 2021 I शाश्वत विकास अहवाल 2021 मध्ये भारत 120व्या क्रमांकावर आहे.

India's Rank 120th in Sustainable Development Report 2021 I शाश्वत विकास अहवाल 2021 मध्ये भारत 120व्या क्रमांकावर आहे._2.1

 

शाश्वत विकास अहवाल 2021 मध्ये भारत 120व्या स्थानावर

सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन), ने प्रकाशित केलेल्या शाश्वत विकास अहवाल 2021च्या 6व्या आवृत्तीमध्ये भारत 120व्या स्थानावर आहे. फिनलँड हा देश पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे स्वीडन व डेन्मार्क यांचा क्रमांक लागतो. कोव्हीड-19 महामारीमुळे 2015 नंतर प्रथमच सर्व देशांची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेत अधोगती दर्शविली आहे. एसडीआर 2021 चे लेखन प्राध्यापक जेफ्री सॅक्स यांनी केले असून त्याचे प्रकाशन केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने केले आहे.

एसडीआर अहवाल:

  • हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होत असून 193 देशांना 17 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात येतो.
  • याची सुरुवात 2015 साली झाली असून यामध्ये शासकीय आणि अशासकीय संस्थांकडून माहिती घेण्यात येते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन) अध्यक्ष: जेफ्री सॅक्स
  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन) मुख्यालये: पॅरिस, फ्रान्स आणि न्यूयॉर्क, यूएसए

Sharing is caring!