Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi- 29...

Daily Current Affairs In Marathi- 29 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 29 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 29  जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 29 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. तृतीयपंथी व्यक्तींसाठी गरिमा गृहे

Garima Grihas for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींसाठी गरिमा गृहे
तृतीयपंथी व्यक्तींसाठी गरिमा गृहे
 • सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी लोकसभेला दिल्लेल्या माहिती नुसार केंद्र सरकार देशात तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षित निवारा मिळावा याकरिता प्रायोगिक तत्त्वावर 12 गरिमा गृहे उभारत आहे. या निवासस्थानांचे बांधकाम विविध समुदाय-आधारित संस्थांच्या मदतीने केले जात आहे.
 • अशी निवारा घरे महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, तामिळनाडू आणि ओडिशा राज्यात स्थापित केली गेली आहेत.

 

राज्य बातम्या 

 2. इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड

Indore selected in International Clean Air Catalyst Program | इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड
इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड
 • मध्यप्रदेशातील इंदोर शहर जे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे,त्याची आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी (आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रम) निवडले जाणारे देशातील एकमेव शहर ठरले आहे.
 • इंदोर महानगरपालिका आणि मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीसाठी चालविला जाईल.
 • क्लीन एअर कॅटॅलिस्ट हा कार्यक्रम युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) आणि जागतिक संसाधन संस्था (डब्ल्यूआरआय) आणि पर्यावरण संरक्षण निधी (ईडीएफ) यांसारख्या संस्थांकडून निन्म ते मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी चालविला जातो.

 

 3. तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण

Karnataka to reserve jobs for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण
तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण
 • सर्व शासकीय नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना 1 टक्का आरक्षण देणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य बनले आहे.
 • कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम 1977 मध्ये सुधारणा करून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली. हे आरक्षण सामान्य तसेच आरक्षित प्रवर्गात देण्यात येणार आहे.
 • सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवताना अधिसूचना प्रकाशित होताना लिंग निवडीबाबत पुरुष आणि महिला पर्यायासह ‘इतर’ हा पर्याय जोडणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • कर्नाटकचे मुख्यमंत्री: बसवराज एस बोम्माई
 • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गहलोत
 • कर्नाटक राजधानी: बेंगळुरू

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

 4. नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे साइटिओ बर्ल मार्क्स उद्यान

UNESCO World Heritage site - Sitio Burle Marx of Brazil | युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ले मार्क्स उद्यान
नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ल मार्क्स उद्यान
 • ब्राझिलमधील शहर रिओ दि जानेरो येथील निसर्ग उद्यान साइटिओ बर्ल मार्क्सला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
 • या उद्यानात 3500 हून अधिक रिओ शहरातील स्थानिक प्रजातींची झाडे असून हे उद्यान वनस्पति व निसर्ग प्रयोगासाठी प्रयोगशाळा मानले जाते.
 • या जागेचे नाव ब्राझिलचे लँडस्केप आर्किटेक्ट बर्ल मार्क्स यांच्या नावावर ठेवले गेले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • ब्राझिलचे अध्यक्ष: जैर बोलसोनारो
 • ब्राझिलची राजधानी: ब्राझीलिया
 • ब्राझिलचे चलन: ब्राझिलियन रिआल 

 

 5. इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी

Intrinsic: Alphabet's new Robotics Company | इन्ट्रीन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी
इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी
 • गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेट लवकरच इंट्रिन्सिक नावाची नवीन रोबोटिक्स कंपनी सुरू करणार असून ती औद्योगिक रोबोट्ससाठी सॉफ्टवेअर बनविण्यावर भर देईल.
 • अल्फाबेटच्या वेमो, विंग आणि व्हेरीली यांसारख्या नव-तंत्रज्ञान संस्था आहेत त्यात आता इंट्रिन्सिकची भर पडेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • इंट्रिन्सिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी: वेंडी टॅन व्हाइट
 • अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी: सुंदर पिचाई
 • गूगलची स्थापना: 4 सप्टेंबर 1998, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
 • गूगलचे संस्थापक: लॅरी पेज, सेर्गेई ब्रिन.

 

अर्थव्यवस्था बातम्या 

 6. पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला

Paytm Payments Bank crosses 1 crore FASTags mark | पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला
पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला
 • एक कोटी फास्टटॅगचे वितरण करणारी पेटीएम पेमेंट्स बँक देशातील पहिली बँक ठरली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने दिलेल्या माहितीनुसार जून 2021 अखेरपर्यंत देशात एकूण 3.47 करोड फास्टटॅगचे वितरण झाले असून त्यातील 28% वाटा पेटीएम पेमेंट्स बँकेचा आहे.
 • त्याचबरोबर पेटीएम पेमेंट्स बँक ही राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (एनईटीसी) कार्यक्रमांतर्गत टोल प्लाझाची भारतातील सर्वात मोठी अधिग्राहक ठरली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • पेटीएम मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश.
 • पेटीएम संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: विजय शेखर शर्मा
 • पेटीएम स्थापना: 2009

 

 7. आरबीआयने अ‍ॅक्सिस बँकेला 5 कोटींचा दंड ठोठावला

RBI slaps 5 cr. penalty on Axis Bank | आरबीआयने अ‍ॅक्सिस बँकेला 5 कोटींचा दंड ठोठावला
आरबीआयने अ‍ॅक्सिस बँकेला 5 कोटींचा दंड ठोठावला
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील बँक अ‍ॅक्सिस बँकेला 5 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
 • दंड हा ‘कॉर्पोरेट ग्राहक म्हणून प्रायोजक बँका आणि एससीबी / यूसीबी दरम्यान पेमेंट यंत्चेरणेचे बळकटीकरण‘, ‘बँकांमधील सायबर सुरक्षा आराखडा‘, ‘आरबीआय (बँकांद्वारे वित्तीय सेवा पुरविणे) नियम,2016 च्या निर्देशांच्या काही तरतुदींचे उल्लंघन आणि पालन न करण्याबद्दल आहे.
 • बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 47 ए (1) (सी) आणि कलम 46 (4) (आय) तरतुदींनुसार हा दंड आकारण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • अ‍ॅक्सिस बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
 • अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्यालय: मुंबई
 • अ‍ॅक्सिस बँकेची स्थापना: 1993

 

 8. लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार

Ladakh to acquire 8.23% stake in J&K Bank | लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार
लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्रशासित प्रदेश लडाखच्या शासनास जम्मू आणि काश्मीर बँकेतील 8.23% भागभांडवलाचे अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 • जम्मू- काश्मीर सरकारच्या 30 ऑक्टोबर 2020 च्या 8.23% भागभांडवल लडाखच्या शासनाला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला यामुळे अधिमान्यता प्राप्त झाली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी: आर के छिब्बर
 • जम्मू-काश्मीर बँक लिमिटेड स्थापना: 1 ऑक्टोबर 1938
 • जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड मुख्यालय: श्रीनगर 

 

करार बातम्या 

 9. मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार

Maruti Suzuki and Pune University to train youth | मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार
मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार
 • मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी युवकांना ऑटोमोबाईल रिटेलमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.
 • विद्यार्थ्यांना याद्वारे तीन वर्षांचा किरकोळ बाजार व्यवस्थापनाचा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.
 • या मध्ये एक वर्ष वर्ग शिक्षण आणि 2 वर्षे मारुती सुझुकी च्या अधिकृत विक्रेत्याकडे प्रशिक्षण असणार आहे.
 • ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: केनिची आयुकावा
 • स्थापना: 1982, गुरुग्राम
 • मारुती सुझुकी मुख्यालय: नवी दिल्ली

 

महत्त्वाचे दिवस 

 10. 29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

International Tiger Day: 29 July | 29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
 • वाघांची घटती लोकसंख्या आणि त्यांचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन किंवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पाळला जातो.आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे हे 11 वे वर्ष आहे.
 • 2010 साली रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग घोषणेद्वारे या दिनाची सुरुवात 13 व्याघ्र श्रेणी देशांमार्फात करण्यात आली.
 • 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट या घोषणेद्वारे ठरविण्यात आले.
 • 2021 संकल्पना: “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हँड)

 

नियुक्ती बातम्या 

 11. राकेश अस्थाना: नवे दिल्ली पोलिस आयुक्त

Rakesh Asthana: New Delhi Police Commissioner | राकेश अस्थाना: नवे दिल्ली पोलिस आयुक्त
राकेश अस्थाना: नवे दिल्ली पोलिस आयुक्त
 • सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक (डीजी), राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • 31 जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या अस्थाना यांचा कार्यकाल मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एका वर्षाने वाढविला आहे.
 • 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी अस्थाना यांनी यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या विशेष संचालकपदी काम केले होते.

 

12. नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान

Najib Mikati: new prime minister of Lebanon | नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान
नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान
 • राष्ट्राध्यक्ष मिशेल आऊन यांच्याशी बंधनकारक संसदीय सल्ल्यांनंतर झालेल्या मतदानात अब्जाधीश उद्योजक नजीब मिकाटी लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत.
 • त्यांनी माजी राजदूत नवाफ सलाम यांचा 72-1 असा पराभव केला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • लेबनॉनची राजधानी: बेरूत.
 • लेबनॉन चलन: लेबनीज पाउंड

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या 

13. गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला

First Evidence of Water Vapor at Ganymede | गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला
गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला
 • नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांना नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीद्वारे केलेल्या संशोधनातून गुरू ग्रहाचा उपग्रह गॅनीमेडाच्या वातावरणात पहिल्यांदाच पाण्याची वाफ/ बाष्प असल्याचे पुरावे आढळले आहेत.
 • जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फ घन ते वायू या अवस्थांतून जातो तेव्हा ही पाण्याची वाफ तयार होते.
 • 1998 मध्ये हबलच्या स्पेस टेलीस्कोप इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफच्या सहाय्याने गॅनीमेडाची पहिली अतिनील प्रतिमा घेण्यात आली होती.

 

निधन बातम्या 

 14. दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

Badminton Legend Nandu Natekar passes away | दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
 • 1956 साली आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन झाले आहे.
 • 1956 साली नाटेकर यांनी क्वालालंपूरमधील सेलंगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले होते. 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.
 • 1961 साली सुरू झालेल्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते.

 

पुरस्कार बातम्या

 15. बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा

Sunjeev Sahota among Booker Prize contenders | बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा
बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा
 • भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक,संजीव सहोटा यांना त्यांच्या ‘चायना रूम’ या कादंबरीसाठी नोबेल पुरस्कार विजेते काझुओ इशिगुरो आणि पुलित्झर पुरस्कार विजेते रिचर्ड पॉवर्स यांच्यासमवेत प्रतिष्ठित बुकर पुरस्कार 2021 साठी शेवटच्या 13 लेखकांमध्ये नामांकन मिळाले आहे.
 • सहा पुस्तकांची संक्षिप्त यादी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल आणि 3 नोव्हेंबर ला लंडन ला एका समारंभात विजेत्याचे नाव घोषीत करण्यात येईल.

 

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

मिशन MPSC त्रिशूळ बॅच
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

Sharing is caring!