
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे-स्थित लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांची 2021 च्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोव्हीड-19 महामारीच्या काळात कोव्हीशील्ड लस तयार करून दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.