Marathi govt jobs   »   China turns on world’s 2nd-biggest hydropower...

China turns on world’s 2nd-biggest hydropower dam I चीनने जगातील दुसरे सर्वात मोठे जलविद्युत धरण सुरु केले.

China turns on world's 2nd-biggest hydropower dam I चीनने जगातील दुसरे सर्वात मोठे जलविद्युत धरण सुरु केले._2.1

 

चीनने जगातील दुसरे सर्वात मोठे जलविद्युत धरण सुरु केले

चीन सरकारने बायहात येथील जगातील दुसरे सर्वात मोठ्या जलविद्युत धरणातून उर्जा निर्मितीस सुरुवात केली आहे. हे धरण चीनच्या आग्नेय भागातील जिन्शा नदीवर उभारण्यात आले आहे. हे धरण 289 मीटर उंच असून ते दुहेरी-वक्रता कमानी पद्धतीचे आहे आणि त्यात उर्जा निर्मितीचे 16 युनिट्स आहेत. प्रत्येक युनिटची क्षमता 1दशलक्ष किलोवॅट असून हे धरण “थ्री गॉर्जेस धरणानंतर” दुसरे सर्वात मोठे धरण आहे, ज्याची एकूण क्षमता 22.5 दशलक्ष किलोवॅट आहे. दोन्ही धरणे राज्य सरकारच्या थ्री गॉर्जेज ग्रुप कॉर्पोरेशनने बांधली आहेत. ही जलविद्युत, सौर आणि पवन निर्मितीतील जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • चीनची राजधानी: बीजिंग
  • चीनचे चलन: रेन्मिन्बी
  • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

Sharing is caring!