आंध्र प्रदेशने एसएएलटी कार्यक्रम सुरु केला
आंध्र प्रदेशने सरकारी शाळांमध्ये पायाभूत शिक्षणात मुलभूत बदल करण्यासठी सपोर्टिंग आंध्राज लर्निंग ट्रान्सफॉर्मेशन (एसएएलटी) हा कार्यक्रम सुरु केला असून त्याला जागतिक बँकेने 250 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळांचे बळकटीकरण करणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे व कौशल्य विकास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आंध्र प्रदेश राज्यात साधारण 40 लाख विद्यार्थी आणि 2 लाख शिक्षक आहेत.
कार्यक्रमाविषयी:
- हा कार्यक्रम 5 वर्षांचा असून महत्त्वपूर्ण उद्दीष्टे गाठल्यानंतरच जागतिक बँकेकडून कर्जाचे वितरण होणार आहे. सरकारने सर्व अंगणवाड्यांना पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये रूपांतरित करून जवळच्या शाळांशी जोडले आहे.
- आंध्र प्रदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), राज्य शिक्षण व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था (एसआयईएमएटी) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) या सारख्या संस्थांचे मजबुतीकरण करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
- शाळांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार नवीन प्रशासकीय रचनाही स्थापन करीत आहे जसे एपी स्कूल एजुकेशन रेग्युलेटरी अॅन्ड मॉनिटरींग कमिशन.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी
- आंध्र प्रदेशचे राज्यपाल: बिस्वा भूषण हरीचंदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा