Marathi govt jobs   »   7th Indian Ocean Naval Symposium Concludes...

7th Indian Ocean Naval Symposium Concludes in France I 7 वा हिंदी महासागर नौदल परिसंवाद फ्रान्स मध्ये पार पडला

7th Indian Ocean Naval Symposium Concludes in France I 7 वा हिंदी महासागर नौदल परिसंवाद फ्रान्स मध्ये पार पडला_2.1

 

7 वा हिंदी महासागर नौदल परिसंवाद फ्रान्स मध्ये पार पडला

हिंद महासागर नौदल परिसंवादाची (आयओएनएस) 7 वी आवृत्ती  1 जुलै 2021 रोजी फ्रान्स मध्ये पार पडली. फ्रेंच नौसेनेतर्फे हा द्विवार्षिक परिसंवाद ला रियुनियन येथे 28 जून पासून आयोजित करण्यात आला होता. भारतातर्फे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीर सिंह यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीने सहभाग घेतला. फ्रान्स 29 जून 2021 पासून दोन वर्षांकरिता या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे.

आयओएनएस बद्दल:

  • हिंद महासागर नौदल परिसंवाद (आयओएनएस) ही द्विवार्षिक बैठकीची एक श्रृंखला आहे, ज्यामध्ये हिंद महासागर प्रदेशातील किनाऱ्यावरील देशांदरम्यान नौदल सहकार्य वाढविणे आणि क्षेत्रीयदृष्ट्या संबंधित सागरी चर्चेसाठी खुला व समावेशक मंच उपलब्ध करुन देणे आणि मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देणे इत्यादी कार्ये केली जातात.
  • पहिल्या परिसंवादाचे आयोजन 2008 साली झाले होते त्यावेळेस भारत अध्यक्षाच्याच्या भूमिकेत होता.
  • फिरत्या पद्धतीने परिसंवादाचे अध्यक्ष आणि स्थान ठरत असते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!