Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-26 June...

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी:  26 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 26 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

1.भारत-भूतान: सीमेहीन कर निरीक्षक कार्यक्रम

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_3.1

  • भारत आणि भूतान या दोन देशांनी सीमा विरहीत कर निरीक्षक करार (टीआयडब्ल्यूबी) करण्यात आला आहे. भूतानचे कर प्रशासन अधिक बळकट करण्यासठी हा प्रकल्प आहे.
  • हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय कर आणि हस्तांतरण किंमतींवर लक्ष केंद्रित करेल. याचा कार्यकाल 24 महिन्यांचा असेल.
  • टॅक्स इन्स्पेक्टर विदाऊट बॉर्डर्स विषयी: सुरुवात- 2015, उद्देश- विकसनशील देशांची ऑडिट क्षमता बळकट करणे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि आर्थिक सहकार आणि विकास संस्था (ओईसीडी) यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमअंतर्गत 45 देशांतील 80 कार्यक्रम पूर्ण झाले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • भूतान राजधानी: थिंफु
  • भूतानचे पंतप्रधान: लोटे शेरिंग
  • भूतानचे चलन: भूतानीज नगुलतरम

राज्य बातम्या

2. दिल्ली सरकारने सुरु केली “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता” योजना

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_4.1

  • कोव्हीड-19 महामारीमुळे आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडेल्या परिवारांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता” ही योजना सुरु केली आहे.
  • समाज कल्याण विभागाच्या अधिसूचनेनुसार, सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला रु.50000 चे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तसेच ज्या कुटुंबाच्या पोशिंद्याचे निधन झाले आहे अशा कुटुंबाना प्रति महिना 2,500 पेन्शन देखील देण्यात येणार आहे.
  • ज्या मुलांच्या दोन्ही किंवा एका पालकाचा कोव्हीड मुळे मृत्यू झाला असेल अशा मुलांना वयाची 25 वर्षे पूर्ण करेस्तोवर प्रति महिना 2,500 आर्थिक भत्ता देण्यात येणार आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील दिल्ली सरकार करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • दिल्लीचे मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल
  • दिल्लीचे नायब राज्यपाल: अनिल बैजल
अर्थव्यवस्था बातम्या

3. भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_5.1

  • बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील वित्तीय वर्ष 2021 सालचा कर्ज वाढीचा दर मागील 59 वर्षांच्या नीचांकी 5.56% पातळीवर असूनही 2020 साली बँक कर्जाचे जीडीपीशी असलेले गुणोत्तर वाढून 56% वर पोहोचले आहे जे मागील 5 वर्षांत सर्वाधिक आहे.
  • 2020 साली देशातील बँकांची कर्जाची एकूण रक्कम 1.52 ट्रिलियन डॉलर्स तरी आशियातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुसरे सर्वात कमी आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या हेच प्रमाण 135.5% तर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये 88.7% आहे.

पुरस्कार बातम्या

4. केंद्राने जाहीर केली 2020 साठीची स्मार्ट शहरे पुरस्कार विजेत्यांची यादी

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_6.1

  • केंद्राने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या यादीत इंदोर (मध्यप्रदेश) आणि सुरत (गुजरात) त्यांच्या सर्वांगीण विकासाकारिता संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळाला आहे.
  • सर्वाधिक पुरस्कार जिंकलेल्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी असून त्यानंतर त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक आहे. स्मार्ट सिटी पुरस्कार सामाजिक पैलू, शासन, संस्कृती, नागरी पर्यावरण, स्वच्छता, अर्थव्यवस्था, पाणी, शहरी गतिशीलता या श्रेणींसाठी देण्यात येतो.

विविध श्रेणी अंतर्गत स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकणाऱ्या शहरांची यादी: 

  1. सामाजिक पैलू- तिरुपती: मनपा शाळांसाठी सर्वोत्तम आरोग्य सुविधा, भुवनेश्वरः सामाजिकदृष्ट्या स्मार्ट भुवनेश्वर, टूमकुर: डिजिटल लायब्ररी सोल्यूशन
  2. प्रशासन- वडोदरा: जी.आय.एस., ठाणे: डिजी ठाणे, भुवनेश्वरः एमई अ‍ॅप
  3. संस्कृती- इंदोर: वारसा संरक्षण, चंदीगड: राजधानी कॉम्प्लेक्स वारसा प्रकल्प, ग्वाल्हेर: डिजिटल संग्रहालय
  4. नागरी पर्यावरण- भोपाळ: स्वच्छ ऊर्जा, चेन्नई: जलकुंभांचा जीर्णोद्धार, तिरुपती: नूतनीकरणयोग्य ऊर्जा निर्मिती
  5. स्वच्छता- तिरुपती: बायोरेमेडिएशन आणि बायो-माइनिंग, इंदूर: महानगरपालिका कचरा व्यवस्थापन यंत्रणा, सुरत: उपचारित सांडपाण्याद्वारे संवर्धन
  6. अर्थव्यवस्था- इंदूरः कार्बन क्रेडिट फायनान्सिंग मॅकेनिझम, तिरुपती: डिझाईन स्टुडिओद्वारे स्थानिक ओळख आणि अर्थव्यवस्थेला गती, आग्रा: मायक्रो स्किल डेव्हलपमेंट सेंटर
  7. अंगभूत गुणवत्ता- इंदूर: छप्पन दुकान, सुरत: कालवा कॉरिडोर
  8. पाणी- देहरादून: स्मार्ट वॉटर मीटरिंग वॉटर एटीएम, वाराणसी: अस्सी नदीचे पर्यावरणीय – संवर्धन, सुरत: एकात्मिक आणि शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा
  9. शहरी गतिशीलता- औरंगाबाद: माझी स्मार्ट बस, सुरत: डायनॅमिक शेड्यूलिंग बसेस, अहमदाबाद: मानवरहित पार्किंग सिस्टम आणि स्वयंचलित तिकिट वितरण मशीन एएमडीए पार्क
  10. अभिनव कल्पना पुरस्कार- इंदूरः कार्बन क्रेडिट फायनान्सिंग मॅकेनिझम, चंदीगड: केंद्रशासित प्रदेशांसाठी
  11. कोविड इनोव्हेशन अवॉर्ड- कल्याण-डोंबिवली, वाराणसी
  12. इतर पुरस्कार- सूरत, इंदूर, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, राजकोट, विशाखापट्टनम, पिंपरी-चिंचवड आणि वडोदरा यांना क्लायमेट-स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क अंतर्गत 4-स्टार रेटिंग देण्यात आले
  13. मंत्रालयाच्या माहितीनुसार अहमदाबादला ‘स्मार्ट सिटीज लीडरशिप अवॉर्ड’ मिळाला, त्यानंतर वाराणसी व रांची अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

 

करार बातम्या

5. एनएसडीसी आणि व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केला “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम” 

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_7.1

  • राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरण आणि व्हॉट्सअ‍ॅपने भारतीय तरुणांना डिजिटल कौशल्ये प्रदान करून रोजगार-सक्षम बनविण्याच्या उद्देशाने “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम” सुरु केला आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप डिजिटल कौशल्य अकादमी आणि प्रधान मंत्री कौशल्य केंद्र (पीएमकेके) आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस अ‍ॅप प्रशिक्षण सत्र यांच्यात ही भागीदारी आहे.
  • या कार्यक्रमाद्वारे, शाळा आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाइन कौशल्ये  आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि विध्यार्थ्यांना डिजिटल स्कील चँपियन्स प्रमाणपत्र’ देण्यात येईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • व्हॉट्सअ‍ॅपची स्थापना: 2009 (संस्थापक: जान कौम, ब्रायन अ‍ॅक्टन)
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी: विल कॅथकार्ट
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्यालय: मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • व्हॉट्सअ‍ॅपची पालक संस्था: फेसबुक (2014 पासून)

 

6. जिओ आणि गुगल क्लाऊड 5G तंत्रज्ञानासाठी करणार भागीदारी

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_8.1

  • रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि गूगल क्लाऊड देशभरात कंपन्या आणि ग्राहकांना 5G तंत्रज्ञान वितरीत करण्यसाठी दीर्घकालीन सामरिक संबंध निर्माण करणार आहेत.
  • भागीदारीचा एक भाग म्हणून, रिलायन्स गूगलच्या एआय / एमएल, ई-कॉमर्स, डिमांड फॉरकास्ट ऑफरिंग्स चा फायदा घेऊन रिटेल व्यवसाय अधिक बळकट करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष: मॅथ्यू ओमेन 
  • रिलायन्स जिओ संस्थापक: मुकेश अंबानी
  • रिलायन्स जिओची स्थापना: 2007
  • रिलायन्स जिओ मुख्यालय: मुंबई
  • गूगल मुख्य कार्यकारी अधिकारी: सुंदर पिचाई
  • गूगलची स्थापना: 4 सप्टेंबर 1998, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • गूगल संस्थापक: लॅरी पेज, सेर्गेई ब्रिन

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान

7. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे ‘विंडोज 11’ चे लोकार्पण केले

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_9.1

  • मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे आपली नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ‘विंडोज 11’ सुरू केली. याला विंडोजची “पुढची पिढी (नेक्स्ट जनरेशन )” म्हणून संबोधले जात आहे. आता वापरात असलेली ‘विंडोज 10’ जुलै 2015 ला सुरु करण्यात आली होती.
  • विंडोज 11 ची प्रमुख वैशिष्ट्ये: यामध्ये अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅप स्टोअरद्वारे अँड्रॉइड अ‍ॅप्सचा वापर करता येईल. 2021 च्या अखेपर्यंत विंडोज 10 चा वापर करणाऱ्यांना मोफत विंडोज 11 ला अपडेट करता येईल. इंटेलचे सहाव्या आणि सातव्या पिढीचे प्रोसेसर असलेले पीसी विंडोज 11 वापरण्यास पात्र नसतील.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती: 

  • मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष: सत्य नाडेला
  • मायक्रोसॉफ्ट मुख्यालय: रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स.

संरक्षण बातम्या

8. 2022 मध्ये सुरु होणार भारताची पहिले स्वदेशी विमानवाहू नौका

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_10.1

  • केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली आहे की 2022 पर्यंत भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका नौसेच्या सेवेत दाखल होणार आहे. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात येईल.
  • आयएसी- 1 याची बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत केली जाणार आहे. विक्रांत ची लांबी 262 मीटर (860 फूट) आणि रुंदी 62 मीटर (203 फूट) असून तिची वाहन क्षमता 40,000 मेट्रिक टन (39,000 लॉंग टन). 

 

महत्वाचे दिवस

9. अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_11.1

  • अत्याचारांना बळी पडलेल्या लोकांच्या समर्थनार्थ संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी 26 जून हा दिवस पाळला जातो. मानवी अत्याचार केवळ अस्वीकार्य नसून तो मानवी गुन्हा आहे या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
  • संयुक्त राष्ट्र आम सभेने 12 डिसेंबर 1997 रोजी  52/149 क्रमांकाचा ठराव पारित करून हा दिवस पाळण्याचे ठरविले. 1998 साली पहिला दिवस पाळण्यात आला.

 

10. मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_12.1

  • दरवर्षी 26 जून रोजी मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारा आपल्या आपल्या मादक पदार्थ्यांपासून व्यसनमुक्त आंतरराष्ट्रीय समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि या करिता जगभरात सहकार्य निर्माण करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
  • 2021 ची संकल्पना: “मादक पदार्थांविषयी माहिती द्या आणि जीव वाचवा” (शेअर फॅक्टस ऑन ड्रग्स, सेव्ह लाईफस्) 
  • 42/112 या ठरावाद्वारे 7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 26 जून हा दिवस मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती: 

  • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम, मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
  • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम, स्थापना: 1997 

 

विविध बातम्या

11. एलआयसीने तंत्रज्ञान व्यासपीठ ‘ई-पीजीएस’ सुरु केले

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_13.1

  • भारतीय जीवन विमा महामंडळाने “ई-पीजीएस” नावाचे एक केंद्रीकृत वेब-आधारित आणि वर्कफ्लो-आधारित माहिती तंत्रज्ञान सुरू केले आहे.
  • नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म, ई-पीजीएस एक उच्च स्तरीय केंद्रीकृत जमा आणि देयक लेखे व्यवस्था निर्माण करण्यासाठी डिझाइन केले आहे. ही प्रणाली ग्राहक पोर्टलद्वारे व्यापक सेवा क्षमता प्रदान करण्यास सक्षम आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • एलआयसीचे अध्यक्ष: एमआर कुमार
  • एलआयसी मुख्यालय: मुंबई
  • एलआयसीची स्थापनाः 1 सप्टेंबर 1956

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!

Daily Current Affairs In Marathi-26 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-26 जून 2021_15.1