दैनिक चालू घडामोडी: 24 जून 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 24 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
राज्य बातम्या
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कृषी विविधता योजना आभासी पद्धतीने सुरू केली
- राज्याच्या आदिवासी भागातील शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी या उद्देशाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘कृषी विविधता योजना -2021′ आभासी पद्धतीने सुरू केली. या योजनेचा फायदा गुजरातमधील 14 आदिवासी जिल्ह्यातील 1.26 लाखांहून अधिक वनबंधू-शेतकऱ्यांना होणार आहे.
- राज्य सरकार आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे रू.31 करोड चे खते -बियाणांचे वाटप करेल ज्यात 45 किलो युरिया, 50 किलो एनपीके आणि 50 किलो अमोनियम सल्फेटचा समावेश असेल.
- गुजरात सरकारने मागील दहा वर्षांत या योजनेअंतर्गत 10 लाख आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे रु.250 करोडचे अर्थसहाय्य केलेले आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- गुजरातचे मुख्यमंत्री: विजय रुपाणी
- गुजरातचे राज्यपाल: आचार्य देवव्रत
2. जगातील पहिल्या जनुकीयरित्या सुधारित रबराची आसाम मध्ये लागवड
- आसाममध्ये, गुवाहाटीजवळील सारुतारी येथील फार्म येथे, रबर बोर्डाने जगातील प्रथम जनुकीयरित्या परिवर्तीत (जीएम) रबराचे झाड लावले आहे.
- केरळच्या पुथुप्पल्ली, कोट्टयम येथील रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आरआरआय) येथे हे जीएम रबर विकसित करण्यात आले आहे.
- हे रोप केवळ ईशान्य भारतासाठीसाठी विकसित केले आहे. सध्या हे पीक प्रायोगिक तत्वावर लावले आहे आणि यशस्वी उत्पादन निघाल्यानंतर देशातील रबराच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आसामचे मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा
- आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
3. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी कोविड अनाथांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी ‘आशीर्वाद’ सुरू केले

- ओडिशाचे मुख्यमंत्रीनवीन पटनाईक यांनी कोविडमुळे अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि देखभाल यासाठी एक नवीन योजना ‘आशीर्वाद’ जाहीर केली.
- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की पालकांच्या मृत्यूनंतर (1 एप्रिल 2020 किंवा त्यानंतर झाला असेल) मुलांची जबाबदारी स्वीकारलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा 2500 रुपये जमा केले जातील.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:
- ओडिशाचे मुख्यमंत्री: नवीन पटनायक आणि राज्यपाल- गणेशी लाल.
आंतरराष्ट्रीय बातम्या
4. आर्कोनियाचे पंतप्रधान म्हणून निकोल पशिन्यान यांची निवड झाली
- अर्मेनियाचे कार्यवाहक पंतप्रधान निकोल पाशीन्यान यांनी संसदीय निवडणुकीत सत्ता कायम ठेवली आणि नागोरोनो-काराबाख एन्क्लेव्हमध्ये गेल्या वर्षी लष्करी पराभवाचा ठपका ठेवला गेला असला तरीही त्यांच्या अधिकाराला चालना मिळाली. निकोलच्या सिव्हील कॉन्ट्रॅक्ट पक्षाने दिलेल्या मतापैकी 53.92% मते जिंकली.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे टेकवे:
- आर्मीनियाची राजधानी: येरेवान.
- आर्मेनियाची चलन: अर्मेनियन ड्राम.
अर्थव्यवस्था बातम्या
5. मूडीजने भारताच्या जीडीपी चा सुधारित विकास दराचा अंदाज 9.6% वर्तवला
- मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने 2021 कॅलेंडर वर्षातील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.6% पर्यंत कमी केला आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार तो 13.9% होता. 2022 साली जीडीपीची वाढ 7% होण्याचा अंदाज आहे.
नियुक्ती बातम्या
6. तामिळनाडू सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये रघुराम राजन यांचा समावेश
- तामिळनाडू सरकारने आर्थिक सल्लागार समिती मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या एस्तेर डुफलो आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा 5 सदस्यीय समितीत समावेश केला आहे.
- इतर सदस्य आहेत भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, विकासात्मक अर्थतज्ञ जीन द्रेज आणि माजी केंद्रीय अर्थ सचिव एस. नारायण हे इतर सदस्य आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- तामिळनाडूचे मुख्यमंत्री: एमके स्टालिन
- तामिळनाडूचे राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित
- तामिळनाडूचे अर्थमंत्री: पलानीवेल थैन्गा राजन
बँकिंग बातम्या
7. कोटक महिंद्रा बँकेने ‘पेय युअर कॉन्टॅक्ट ’ सेवा सुरू केली
- ‘पेय युअर कॉन्टॅक्ट’ ही सेवा सावकाराच्या (Lender’s) मोबाइल बँकिंग अॅपवर उपलब्ध आहे आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्लॅटफॉर्मचा वापर करते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:
- कोटक महिंद्रा बँक स्थापना: 2003;
- कोटक महिंद्रा बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र;
- कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: उदय कोटक;
- कोटक महिंद्रा बँक टॅगलाइनः लेट्स मेक मनी सिम्पल.
रॅक्स आणि अहवाल बातम्या
8. शतकातील प्रमुख दानशूर लोकांच्या यादीमध्ये जमशेटजी टाटा प्रथम
- गेल्या शतकातील जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या क्रमवारीत भारतीय अग्रणी उद्योगपती आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी नुसरवानजी टाटा हे, एडलगिव्ह हुरुन फिलॉनथ्रोफिस्ट ऑफ द सेंच्युरी लिस्ट या अहवालानुसार जगातील 50 अग्रणी दानशूर व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
- या अहवालानुसार मुंबईस्थित उद्योगपती जमशेटजी टाटा यांनी अंदाजे $102.4 अब्ज अमेरिकन डॉलरच्या देणग्या दिल्या आहेत. हुरुन रिसर्च आणि एडलगिव्ह फाउंडेशनने संकलित केलेल्या यादीत पहिल्या दहा लोकांमध्ये ते एकमेव भारतीय आहेत.
- विप्रोचे माजी संचालक अझीम प्रेमजी हे 12 व्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर $74.6 अब्ज डॉलर्सच्या देणगीसह बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स आहेत आणि त्यांच्यानंतर नुक्रमे हेनरी वेलकम ($56.7अब्ज डॉलर्स), हॉवर्ड ह्यूजेस ($38.6 अब्ज डॉलर्स) आणि वॉरेन बफे ($37.4 अब्ज डॉलर्स) आहेत.
- या यादीतील पहिल्या 50 व्यक्ती या केवळ 5 देशात आहेत त्यातील युएस मध्ये 38, युके 5, चीन 3, भारत 2, पोर्तुगाल 1 आणि स्वित्झर्लंड 1 यांचा समावेश आहे
पुरस्कार बातम्या
9. 2021 च्या राष्ट्र निर्मात्यांमध्ये एनटीपीसी सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत
- एनटीपीसी ला पहिल्यांदाच 2021 साठीचे राष्ट्र निर्मात्यांमधील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत करण्यात आले आहे. ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूटने सलग 15व्या वर्षी एनटीपीसी ला ‘काम करण्यसाठी सर्वोत्तम जागा’ म्हणून निवडले आहे.
- या वर्षी त्याचा क्रमांक 38 आहे जो मागील वर्षी 47 होता. एनटीपीसी, एक महारत्न कंपनी असून उर्जा मंत्रालयाअंतर्गत काम करते. एनटीपीसीने मार्च 2021 मध्ये सीआयआय एचआर एक्सलन्स रोल मॉडेल पुरस्कारही जिंकला आहे. देशातील लोक व्यवस्थापन क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
करार बातम्या
10. एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यात बँकाश्युरन्स करार
- एसबीआय जनरल विमा कंपनीने आयडीएफसी फर्स्ट बँके सोबत सामान्य विमा उत्पादने (नॉन-लाइफ इन्शुरन्स) वितरणाचा करार केला आहे.
- बँकाश्युरन्स म्हणजे: विमा कंपनी आणि बँक यांच्यात सहयोग ज्याच्या अंतर्गत विमा कंपनी बँकेच्या ग्राहकांना विमा उत्पादने वितरीत करेल आणि बँकेला या व्यवहारातून कमिशन (दलाली) मिळेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आयडीएफसी फर्स्ट बँक स्थापना: 2018
- आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: व्ही. वैद्यनाथन
- आयडीएफसी फर्स्ट बँक मुख्यालय; मुंबई, महाराष्ट्र
- एसबीआयचे सामान्य विमा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: प्रकाश चंद्र कंदपाल
- एसबीआय सामान्य विमा मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
- सबीआय सर्वसाधारण विमा टॅगलाइनः सुरक्षा और भरोसा दोनो
पुस्तके आणि लेखक
11. हर्षवर्धन यांनी “माय जॉइज अँड सोरोस-ऍज मदर ऑफ स्पेशल चाईल्ड” या पुस्तकाचे अनावरण केले
- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कृष्णा सक्सेना यांच्या “एका विशेष मुलाची आई म्हणून माझे सुख आणि दु:ख” (माय जॉइज अँड सोरोस-ऍज मदर ऑफ स्पेशल चाईल्ड) या पुस्तकाचे अनावरण केले.
- हे पुस्तक म्हणजे भारतीय मातृत्वाच्या सर्वोत्कृष्ट परंपरेनुसार, आईच्या धैर्याचे आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे.
12. अभिनेता विल स्मिथने ‘विल’ या आत्मचरित्राची घोषणा केली
- अभिनेता विल स्मिथ, आपले आत्मचरित्र ‘विल’ येत्या 9 नोव्हेंबर ला प्रकाशित करेल ज्याचे प्रकाशन पेंग्विन प्रेस ने केले आहे. मार्क मॅन्सन हे पुस्तकाचे सहलेखक असून मुखपृष्ठ ‘बीमाईक ओडमस’ (“BMike” Odums) ने तयार केले आहे.
- या पुस्तकाचे ऑडिओबुक देखील प्रदर्शित होणार आहे. स्मिथने द फ्रेश प्रिन्स ऑफ बेल-एअर, बॅड बॉईज, मेन इन ब्लॅक, अँड पर्सूट ऑफ हॅपीनेस मध्ये भूमिका केल्या आहेत. समरटाइम, मेन इन ब्लॅक, गेटीन ’जिग्गी विट इट अँड पेरेंट्स जस्ट डॅन्ड अंडरस्टँड’ साठी त्याला ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.
क्रीडा बातम्या
13. भारताचे अधिकृत ऑलिम्पिक थीमचे गाणे ‘लक्ष्य तेरा सामने है’ प्रदर्शित झाले
- टोकियो गेम्सच्या पुढे असता, भारताने ऑलिम्पिक थीम सोंग लाँच केले. मोहित चौहान यांनी “लक्ष्य तेरा सामने है” हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
- हे खेळ 23 जुलै रोजी सुरू होतील आणि आतापर्यंत 100 हून अधिक भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी पात्रता दर्शविली आहे.
- हा कार्यक्रम भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आयोजित केला होता आणि त्याचे अध्यक्ष, सरचिटणीस-जनरल, डेप्यु शेफ डी मिशन, क्रीडा सचिव आणि डीजी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) यांनी हजेरी लावली.
- या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडामंत्री किरेन रिजिजू होते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष: नारायण रामचंद्रन;
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापनाः 1927.
14. न्यूझीलंड प्रथम आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचे विजेते
- न्यूझीलंडने भारताचे 139 धावांचे आव्हान 8 गडी राखत पूर्ण केले आणि पहिल्या आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 23 जून 2021 रोजी कसोटीचा शेवटच्या दिवसाचा खेळ झाला.
- काइल जेमीसन (न्यूझीलंड) याला “सामनावीर” तर केन विल्यमसन (न्यूझीलंड) याला “मालिकावीर” किताबाने गौरविण्यात आले.
- पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात 2019 मध्ये अंतिम फेरी 2021 मध्ये खेळली गेली. पहिले तीन संघ – 1. न्यूझीलंड 2. भारत 3. ऑस्ट्रेलिया
- अंतिम सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन मधील एजियास बाउल (रोझ बाउल स्टेडियम) स्टेडियम येथे खेळविण्यात आला. पुढील कसोटी स्पर्धा – 2021 ते 2023.
विविध बातम्या
15. वनप्लस या कंपनीचे सदिछादूत म्हणून जसप्रीत बुमराह यांची निवड
- वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने आपल्या परीधानयोग्य वस्तूंच्या जाहिरातींसाठी दिछादूत म्हणून जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे.
- वनप्लस वेअरेबल प्रकारात वनप्लस घड्याळ जे स्मार्ट प्रीमियम डिझाइन, अविरत कनेक्शन, स्मार्ट फिटनेस ट्रॅकिंग आणि अविश्वसनीय बॅटरी लाइफ या सुविधा देते.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा