Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-23 June...

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी:  23 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 23 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

  1. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सुरु केले “जान है तो जहान है” अभियान

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_3.1

  • केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात विषयी कोरोना लसीकरणा जनजागृती करण्यासाठी “जान है तो जहान है” हे देशव्यापी अभियान सुरु केले.
  • या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे कोरोना लसीकरणाविषयी लोकांना जागरूक करणे आणि कोरोना लसीकरणाबद्दलच्या अफवा आणि गैरसमजुती दूर करणे हा आहे. हे अभियान केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने सुरु केले आहे.

 

अर्थव्यवस्था बातम्या

2. वित्त मंत्रालयाने एकूण मालमत्ता रु.100 करोड पेक्षा अधिक असलेल्या एचएफसींना साराफेसी कायदा वापरण्याची परवानगी दिली

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_4.1

  • वित्त मंत्रालयाने एकूण मालमत्ता आकार रु.100 करोड पेक्षा अधिक असलेल्या गृहनिर्माण वित्त संस्थांना (एचएफसी) एसएआरएफएई कायद्याच्या आधारे थकबाकी वसूल करण्याची परवानगी दिली आहे.
  • यामुळे थकबाकीची त्वरित वसुली करण्यात मदत होईल आणि या कंपन्यांना अधिक कर्ज देण्यास प्रोत्साहन मिळेल. याआधी ही अट रु.500 करोड इतकी होती.
  • एसएआरएफएई कायदा, 2002  बँक आणि इतर वित्तीय संस्थांना कर्ज बुडव्यांच्या निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तांचा लिलाव करून कर्ज वसूल करण्याची परवानगी देतो.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री: निर्मला सीतारमण

 

नियुक्ती बातम्या

3. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची एनआयएमएचएएनएस च्या संचालकपदी नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_5.1

  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस), बेंगळूरु मधील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती यांची या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असेल. त्यांना ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन 2021‘ रोजी डब्ल्यूएचओ च्या प्रादेशिक संचालकांकडून विशेष मान्यता पुरस्कार देण्यात आला होता.

 

4. माव्या सुदन बनल्या जम्मू-काश्मीर राज्यातील पहिल्या महिला आयएएफ लढाऊ पायलट

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_6.1

  • फ्लाइंग ऑफिसर माव्या सुदन जम्मू-काश्मीरमधील प्रथम महिला बनल्या आहेत ज्यांची भारतीय वायुसेनेत (आयएएफ) लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती झाली आहे.आयएएफमध्ये समाविष्ट होणारी त्या 12 व्या महिला लढाऊ वैमानिक आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

एअरफोर्स अकादमी: हैदराबाद

 

पुरस्कार बातम्या

5. के.के. शैलजा यांचा 2021 साठीच्या प्रतिष्ठित सीईयू ओपन सोसायटी पुरस्काराने गौरव

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_7.1

  • केरळच्या माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना केंद्रीय युरोपियन विद्यापीठाने (सीईयू) 2021 चा ओपन सोसायटी पुरस्कार जाहीर केला आहे. कोव्हीड महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • हा पुरस्कार अशा व्यक्ती अथवा संस्थेला दरवर्षी देण्यात येतो “ज्याच्या कर्तृत्वाने मुक्त समाज निर्मितीत महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे.

सीईयू स्थापना: जॉर्ज सोरोस (1991) 

 

रॅक्स आणि अहवाल बातम्या

6. बेंगळुरूने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पहिल्या 5 तंत्रज्ञान केंद्रांमध्ये स्थान पटकावले

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_8.1

  • कॉलरियर्सने जाहीर केलेल्या एका अहवलानुसार बेंगळुरू एपीएसी क्षेत्रातील पहिले पाचातील तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास आले आहे तर हैदराबादने पहिल्या दहात स्थान मिळवले आहे.
  • या अहवालाचे नाव “ग्रोथ इंजिन ऑफ इनोव्हेशनः हाऊ एशिया एशिया पॅसिफिक टेक्नोलॉजी हबज रीजॅपिंग रीजनल रीअल इस्टेट” असे आहे.
  • बीजिंग, शांघाय, बेंगळुरू, शेन्झेन आणि सिंगापूर सध्या एपीएसी क्षेत्रातील पहिली पाच तंत्रज्ञान केंद्र आहेत. इतर शहरे तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात विकास करीत आहेत जसे सोल आणि हाँगकाँग फिनटेक मध्ये, हैदराबाद आणि सिडनी ही उदयोन्मुख केंद्रे आहेत.

 

करार बातम्या

7. भारत आणि फिजी या देशांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_9.1

  • केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, श्री. नरेंद्र सिंह तोमर यांची आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ. महेंद्र रेड्डी यांच्या दरम्यान एका आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
  • या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारा (एमओयू) वर स्वाक्षरी केली. हा करार दुग्ध उद्योग विकास,तांदूळ उद्योग विकास,मूळ पीक विविधता,जल संसाधन व्यवस्थापन,नारळ उद्योग विकास,अन्न प्रक्रिया उद्योग विकास,कृषी यांत्रिकीकरण इत्यादी क्षेत्रांशी संबंधित आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • फिजी राजधानी: सुवा
  • फिजी चलन: फिजीयन डॉलर
  • फिजी राष्ट्राध्यक्ष: जिओजी कोनोसी

 

पुस्तके आणि लेखक

8. अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे प्रकाशन केले

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_10.1

  • नाट्य-दिग्दर्शक अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे लोकार्पण केले. हब्बा खातून’ हे पुस्तक संजना प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. 
  • ‘कश्मीरची गानकोकिळा’ या बिरुदावलीने ओळखल्या जाणाऱ्या हब्बा खातून या काश्मिरी कवयित्री आणि तपस्वी असून त्या काश्मीरचा शेवटचा सम्राट यूसुफ शाह चक याची पत्नी होत्या.

 

क्रीडा बातम्या

9. राणी रामपाल, मनप्रीत सिंग यांची भारतीय हॉकी संघांचे कर्णधार म्हणून निवड करण्यात आली

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_11.1

  • मधल्या फळीचा खेळाडू मनप्रीत सिंग याला ऑलिम्पिक साठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले तर अनुभवी बचावपटू बीरेंद्र लकरा आणि हरमनप्रीत सिंग यांना उप-कर्णधार म्हणून निवडण्यात आले. मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली भारताने 2017 मधील आशिया चषक, 2018 मधील आशियाई चॅम्पियन्स करंडक आणि 2019 ची एफआयएच शृंखला जिंकली आहे.
  • तर महिलांच्या कर्णधारपदी राणी रामपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राणी रामपालच्या नेतृत्त्वात भारताने 2017 चा आशिया कप, 2018 च्या आशियाई गेम्स मध्ये रौप्यपदक, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 मध्ये रौप्य तसेच 2019 मध्ये एफआयएच शृंखला जिंकली आहे.

 

10. शेली-ऍन-फ्रेझर-प्राईस बनली जगातील दुसरी सर्वात वेगवान महिला धावपटू

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_12.1

  • जमैकन धावपटू शेली-ऍन-फ्रेझर-प्राईस यांनी किंग्स्टन येथे झालेली 100 मीटर ची शर्यत 10.63 सेकंदात पूर्ण करून जगातील दुसरी सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला.
  • या पूर्वी अमेरिकेच्या फ्लॉरेन्स ग्रिफिथ-जॉयनर हिने 1988 मध्ये इंडियानापोलिस येथे 10.49 सेकंदात 100 मीटर अंतर पार केले होते.  तसेच 1988 सालीच त्यांनी 10.61 आणि 10.62 सेकंदात हे अंतर पार करण्याचा जागतिक विक्रम केला होता.

 

संरक्षण बातम्या

11. भारतीय नौदल आणि युरोपियन संघाच्या नेव्हल फोर्स यांच्यातील प्रथम संयुक्त सराव पार पडला

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_13.1

  • प्रथमच भारतीय नौदल आणि युरोपियन संघ नौसेना {युरोपियन युनियन नेव्हल फोर्स} (ईयूएनएव्हीएफओआर) यांच्यादरम्यान दोन दिवसीय संयुक्त नौदल सराव पार पडला. भारतातर्फे आयएनएस त्रीकंद या सरावात सहभागी होणार आहे.
  • ठिकाण: एडन चे आखात, सहभागी देश– भारतीय नौदल आणि इटली, स्पेन आणि फ्रान्स ची नौदल सेना.

 

महत्वाचे दिवस

12. 23 जून: संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_14.1

  • दरवर्षी 23 जूनला “संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस” जागतिक स्तरावर साजरा केला जातो.हा दिवस विकास प्रक्रियेत सार्वजनिक सेवेच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि समाजाला सार्वजनिक सेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाळला जातो.
  • संकल्पना: “ भविष्यातील अभिनव सार्वजनिक सेवांची निर्मिती: एसडीजी साध्य करण्यासाठी नवीन युगातील नवीन सरकारी प्रारूपे” ( “फ्यूचर पब्लिक सर्व्हिस इनोव्हेटिंग:न्यू गव्हर्नमेंट मॉडेल्स फॉर ए न्यू एरा टू रिच द एसडीजीस्”
  • 20 डिसेंबर  2002 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 23 जून हा दिवस सार्वजनिक सेवा दिवस म्हणून पाळण्याचे 57/277 या  ठरावाद्वारे निश्चित केले.
  • हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जगभरातील सर्व नागरी सेवकांच्या कामकाजाच्या परिस्थितीचे निर्धारण करण्यासाठी कामगार संबंध (लोक सेवा), 1978 (क्रमांक 151) ठराव स्वीकारल्याच्या दिवशी साजरा केला जातो.

 

13. 23 जून: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_15.1

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दरवर्षी 23 जून रोजी आयोजित केला जातो. अधिकाधिक लोकांना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • 2021 ची संकल्पना: #23 जूनच्या ऑलिम्पिक दिनानिमित्तच्या कसरतीसह निरोगी रहा, सशक्त रहा, सक्रीय रहा,”  (स्टे हेल्थी, स्टे स्ट्रॉंग, स्टे ऍक्टिव्ह विथ द #ऑलिम्पिक डे वर्कआऊट ऑन 23 जून ).
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 23 जून 1894 रोजी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्मरणार्थ जानेवारी 1948 मध्ये ऑलिम्पिक दिन पाळण्यास मान्यता दिली.पहिला ऑलिम्पिक दिन 1948 साली साजरा करण्यात आला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष: थॉमस बाख
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापनाः 23 जून 1894 (पॅरिस, फ्रान्स)

 

14. 23 जून: आंतरराष्ट्रीय विधवा दिवस

Daily Current Affairs In Marathi-23 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जून 2021_16.1

  • दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस जागतिक स्तरावर पाळला केला जातो. विधवांच्या आवाजाकडे व अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना मिळालेला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
  • लुंबा फाउंडेशनने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय विधवा दिनाची सुरूवात केली. 23 जून 2010 रोजी,संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये या दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!