Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-23 July...

Daily Current Affairs In Marathi-23 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi

दैनिक चालू घडामोडी: 23  जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 23 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

करार बातम्या 

 1. एमएसएमईना सह-कर्जासाठी ‘यू जीआरओ कॅपिटल’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यात करार

एमएसएमईना सह-कर्जासाठी 'यू जीआरओ कॅपिटल' आणि 'बँक ऑफ बडोदा' यांच्यात करार

  • ‘यू जीआरओ कॅपिटल’ एक गैर बँकिंग वित्तीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यादरम्यान सूक्ष्म,लघू आणि मध्यम क्षेत्र उद्योगांना कर्ज-पुरवठा करण्यासाठी एक करार करण्यात आला आहे.
  • प्रथम या सामायिक कर्ज वितरण कार्यक्रमात बँक ऑफ बडोदा आणि यू जीआरओ एकत्रितपणे एमएसएमईंना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करणार आहेत.
  • या प्रकल्पात रु.50 लाख ते रु.2.5 करोड कर्ज उपलब्ध होणार असून त्यावर कमीतकमी 8% व्याज आकारण्यात येईल आणि कर्जफेड कालावधी 120 महिन्यांचा असेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बँक ऑफ बडोदा मुख्यालय: वडोदरा, गुजरात, भारत
  • बँक ऑफ बडोदा अध्यक्ष: हसमुख अधिया
  • बँक ऑफ बडोदाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव चड्ढा
  • यू जीआरओ कॅपिटल चे व्यवस्थापकीय संचालक: शचिंद्र नाथ

 

 2. द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार

 द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार

  • द्वारा होल्डिंग्जची कंपनी द्वारा ई-डेअरी सोल्यूशन्सने मुस्कीवर(नाकावर) आधारित गोवंश ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डिजिटल टॅग ‘सुरभी ई-टॅग’ सुरू केला आहे.
  • याचा उपयोग इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्सच्या भागीदारीत देऊ केलेल्या गुरांच्या विमा उत्पादनांसाठी केला जाईल.
  • यात गुरांची एक अद्वितीय डिजिटल ओळख निर्माण करून गुरांना विमा सुरक्षा देण्यात येणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इफ्को टोकियो जनरल विमा मुख्य कार्यकारी अधिकारी: अनामिका रॉय राष्ट्रवार
  • इफ्को टोकियो जनरल विमा मुख्यालय: गुरुग्राम
  • इफ्को टोकियो जनरल विमा स्थापना: 2000

 

महत्त्वाचे दिवस 

 3. 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन

 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन

  • वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) मार्फत दरवर्षी 22 जुलैला जागतिक मस्तिष्क दिन आयोजित केला जातो.
  • अनेक जनजागृती कार्यक्रम आणि शैक्षणिक आणि सोशल मीडिया उपक्रम 22 जुलै 2021 पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत मल्टीपल स्क्लेरोसिस थांबविण्याच्या चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जाणार आहेत.
  • 2021 ची संकल्पना: “मल्टीपल स्क्लेरोसिस थांबवा”

 

 4. 23 जुलै: राष्ट्रीय प्रसारण दिवस

23rd July: National Broadcasting Day

  • बातम्यांचे आणि मनोरंजनाचे एक सोपे माध्यम म्हणून भारतीयांच्या आयुष्यात रेडिओचे असलेले महत्त्व  साजरे करण्यासाठी दरवर्षी 23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिन आयोजित केला जातो.
  • 1927 साली याच  दिवशी, देशातील सर्वप्रथम प्रथम रेडिओ प्रसारण बॉम्बे स्टेशन वरून भारतीय प्रसारण कंपनी मार्फत करण्यात आले.
  • 1 एप्रिल 1930 रोजी सरकारने ही खासगी प्रसारण कंपनी ताब्यात घेऊन त्याचे नामकरण भारतीय राज्य प्रसारण सेवा (आयएसबीएस) असे करण्यात आले.
  • 8 जून, 1936 रोजी याचे रुपांतर अखिल भारतीय रेडिओ (ऑल इंडिया रेडियो) मध्ये करण्यात आले.

 

क्रीडा बातम्या

 5. दिव्यांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक

विकलांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक

  • पेरु येथे सुरू असलेल्या पॅरा स्पोर्ट कपमध्ये मध्य प्रदेशची नेमबाज रुबीना फ्रान्सिसने जागतिक विक्रम नोंदविला आहे.
  • महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल पॅरा-स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून तुर्कीच्या आयसेगुल पेहलिवानरचा जागतिक विक्रम मोडला आहे.
  • या विजयामुळे तिला टोकियो ग्रीष्म पॅराऑलिम्पिक 2020 मध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

 

पुरस्कार बातम्या

 6. संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू

संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू

  • भारताचा ज्येष्ठ बचावपटू संदेश झिंगन याला एआयएफएफने 2020-21 हंगामातील वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू म्हणून घोषीत केले आहे. 2014 ला त्याला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.
  • तसेच मधल्या फळीतील खेळाडू सुरेशसिंग वांगजम याला 2020-21 हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची स्थापना: 23 जून 1937
  • अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे मुख्यालय: द्वारका, दिल्ली

 

शिखर परिषद आणि बैठका बातम्या 

 7. जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021

जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021

  • जी-20 शिखर परिषदेचा एक भाग असलेली जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद ऑक्टोबर 2021 इटली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
  • या बैठकीत लोक; ग्रह आणि समृद्धी या तीन विस्तृत तसेच एकमेकांशी जोडलेल्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.
  • जी -20 हा 19 देशांचा आणि युरोपियन संघाचा एक औपचारिक गट आहे.  यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशियन फेडरेशन, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका हे 19 देश आहेत.

 

निधन बातम्या

 8. गीरा साराभाई यांचे निधन

गीरा साराभाई यांचे निधन

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या सह-संस्थापिका गीरा साराभाई यांचे निधन झाले आहे. त्या देशातील संकल्पन (डिझाईन) शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या तसेच इतर अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता तसेच त्यांनी कला व स्थापत्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  • त्यांनी वस्त्रोद्योगाच्या कॅलीको म्युझियमची स्थापना केली आहे.
  • गीरा साराभाई उद्योगपती अंबालाल साराभाई यांच्या कन्या व डॉ.विक्रम साराभाई यांच्या भगिनी होत्या.

 

 9. सिक्कील आर भास्करन यांचे निधन

 सिक्कील आर भास्करन यांचे निधन

  • प्रख्यात कर्नाटक शास्त्रीय व्हायोलिन वादक ‘कलाईमणी’ सिक्कील श्री आर. भास्करन यांचे निधन.
  • 11 व्या वर्षी त्यांनी तिरुवरूर श्री सुब्बा अय्यर यांच्याकडून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर मयुराम श्री गोविंदराजन पिल्लई यांच्याकडे शिक्षण घेतले.
  • ते आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणी कलाकार होते आणि त्यांनी 1976 ते 1994 या काळात चेन्नई रेडिओ स्टेशनमध्ये जवळपास 2 दशके काम केले.

 

पुस्तके आणि लेखक 

 10. आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’

आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: द स्ट्रेंजर इन द मिरर

  • दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘द स्ट्रॅन्जर इन द मिरर’ या आत्मचरित्राची घोषणा केली आहे.
  • पुस्तकाच्या सहलेखिका – रीटा राममूर्ती गुप्ता आणि प्रकाशक- रुपा पब्लिकेशन.
  • रंग दे बसंती, दिल्ली -6, भाग मिल्खा भाग आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तूफान सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन मेहरा यांनी केले आहे.

 

 11. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन

 उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन

  • भारताचे उपराष्ट्रपती, एम. वेंकैय्या नायडू यांनी माजी खासदार यलामंची शिवाजी यांनी लिहिलेल्या  ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक ग्रामीण भारत आणि शेतीवर आधारित आहे.
  • सोहळ्याच्या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘ग्राम स्वराज्य’ आणण्यासाठी आपण खेडे आणि शेती यांच्या समस्यांकडे समग्रपणे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

 

 12. “बँक विथ ए सोल: इक्विटास”: डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक

"बँक विथ ए सोल: इक्विटास": डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक

  • आरबीआयचे माजी गव्हर्नर,दुव्वरी सुब्बाराव यांनी डॉ. सी के गरियाळी लिखित ‘बँक विथ ए सोलः इक्विटास’ या पुस्तकाचे अनावरण केले.
  • डॉ. गरियाळी ईडीआयटी (इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट) चे संस्थापक विश्वस्त आहेत आणि हे पुस्तक इक्विटास च्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणारे तसेच बँकेच्या इतिहासाबद्दल भाष्य करणारे आहे.

 

विविध बातम्या 

 13. युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले

युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले

  • नवीन फुटबॉल स्टेडियम बांधण्याच्या योजनेसह इतर अतिरिक्त विकासाच्या मुद्द्यावरून युनेस्कोने लिव्हरपूल जलवाहिनीला (वॉटरफ्रंट) जागतिक वारसा स्थळांच्या यादीतून मतदानाच्या (13 विरुद्ध 5) आधारे काढून टाकण्यात आले आहे.
  • एखाद्या वारसा स्थळाला यादीतून वगळण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युनेस्कोचे मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स
  • युनेस्कोच्या प्रमुख: ऑड्रे अझोले
  • युनेस्कोची स्थापना: 16 नोव्हेंबर 1945

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये जसे गट ब संयुक्त आणि गट क संयुक्त विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

adda247

Sharing is caring!