Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi |...

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_30.1

 

दैनिक चालू घडामोडी:  20 आणि 21 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 20 आणि 21 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

  1. 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ घोषीत 

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_40.1

  • कोव्हीड-19 च्या महामारीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड) आधारकार्डशी संलग्न करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.
  • 2021 च्या अर्थसंकल्पादरम्यान आयकर अधिनियम 1961 मध्ये समविष्ट केलेल्या अनुच्छेद 243एच नुसार 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ रद्दबातल घोषीत करण्यात येईल, तसेच ₹ 1000 एवढा दंड सुद्धा भरावा लागेल आणि त्या व्यक्तीकडे पॅनकार्ड क्रमांक नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.
  • न जोडण्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी: केवायसीची स्थिती अवैध होईल कारण एखाद्याच्या केवायसीसाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे. बँक खात्यावर सुद्धा परिणाम होईल कारण बँकखाते बिना पॅनकार्ड म्हणून गणले जाईल. त्याचबरोबर ₹ 10000 पेक्षा जास्त बचतीवर टीडीएस (उत्पन्न स्त्रोतातून वजावटी कर) दुप्पट होऊन 20% लागेल.

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

2. इराणच्या 2021 च्या अध्यक्षीय निवडणुकांचे विजेते : इब्राहिम रायसी

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_50.1

  • इब्राहिम रायसी 2021 च्या इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 62 टक्के मते मिळवून विजेते ठरले. 60 वर्षीय रायसी ऑगस्ट 2021 मध्ये हसन रुहानी यांच्यानंतर चार वर्षांचा कार्यकाळ सुरू करणार आहेत. मार्च 2019 पासून ते इराणचे मुख्य न्यायाधीशही आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इराण राजधानी: तेहरान
  • इराण चलन: इराणी तोमन

 

3. बोट्सवानामध्ये आढळला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_60.1

  • बोट्सवाना देशातील बोत्सवाना सरकार आणि दक्षिण आफ्रिकेची डायमंड कंपनी डी बीयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या उत्खननात बोट्सवाना येथे 1,098 कॅरेटचा हिरा सापडला आहे. बोट्सवाना अध्यक्ष: मॉकग्वेत्सी मासीसी
  • जगातील सर्वात मोठा हिरा:  3,106 कॅरेट चा कॅलिनन खडक दक्षिण आफ्रिकेत 1905 साली सापडला.
  • दुसरा सर्वात मोठा हिरा: 1109 कॅरेट चा लेसेडी ला रोना खडक बोट्सवाना येथे 2015 साली सापडला.

 

नियुक्ती बातम्या

4. मोंटेक अहलुवालिया यांची जागतिक बँक-आयएमएफ च्या उच्च सल्लागार गटाच्या सदस्यपदी निवड

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_70.1

  • नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष, माँटेकसिंग अहलुवालिया यांची जागतिक बँक आणि आयएमएफ यांनी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सल्लागार गटाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. या गटात मारी पँगेस्टु, गीता गोपीनाथ,  सेला पाजारबासिओग्लू आणि लॉर्ड निकोलस स्टर्न यांचाही समावेश आहे.
  • हा गट कोव्हीड-19 आणि हवामान बदल यांमुळे उद्भवलेल्या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन केला आहे. मेरी पॅनजेस्टु या डेव्हलपमेंट पॉलिसी अँड पार्टनरशिप, वर्ल्ड बँकचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सेला पाजारबासिओग्लू आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, धोरण, पुनरावलोकन आणि पुनरावलोकन विभागाच्या संचालक आहेत.

 

रँक आणि अहवाल बातम्या

5. ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ नुसार बंगळूरु सर्वात राहण्यायोग्य शहर

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_80.1

  • विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) जाहीर केलेल्या ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 (राहण्याच्या सुलभतेचा निर्देशांक)  नुसार बंगळूरु भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून गणले गेले आहे.
  • ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 हा भारतातील पर्यावरणाची स्थिती 2021 (स्टेट ऑफ इंडियाज इंव्हीरोन्मेंट 2021) या अहवालाचा एक भाग आहे. पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये बंगळुरूनंतर चेन्नई, सिमला, भुवनेश्वर आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.
  • 4 प्रमुख मापदंड- जीवनमान, आर्थिक क्षमता, शाश्वतता आणि नागरिकांचा दृष्टीकोन. प्रत्येक शहराला एकूण 100 पैकी गुण देण्यात आले आहेत. ही या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती असून याची सुरुवात 2018 ला झाली.

 

6. शाश्वत विकास अहवाल 2021 मध्ये भारत 120व्या स्थानावर

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_90.1

  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन), ने प्रकाशित केलेल्या शाश्वत विकास अहवाल 2021च्या 6व्या आवृत्तीमध्ये भारत 120व्या स्थानावर आहे. फिनलँड हा देश पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे स्वीडन व डेन्मार्क यांचा क्रमांक लागतो.
  • कोव्हीड-19 महामारीमुळे 2015 नंतर प्रथमच सर्व देशांची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेत अधोगती दर्शविली आहे. एसडीआर 2021 चे लेखन प्राध्यापक जेफ्री सॅक्स यांनी केले असून त्याचे प्रकाशन केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने केले आहे.
  • हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होत असून 193 देशांना 17 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात येतो. याची सुरुवात 2015 साली झाली असून यामध्ये शासकीय आणि अशासकीय संस्थांकडून माहिती घेण्यात येते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन) अध्यक्ष: जेफ्री सॅक्स
  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनस् नेटवर्क (एसडीएसएन) मुख्यालये: पॅरिस, फ्रान्स आणि न्यूयॉर्क, यूएसए

7. स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक 51 वा

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_100.1

  • स्वित्झर्लंडची मध्यवर्ती बँक, स्विस नॅशनल बँक (एसएनबी) द्वारा जारी केलेल्या ‘बँकेच्या वार्षिक आकडेवारी 2020’ नुसार, स्विस फ्रँक (सीएचएफ) मध्ये ठेवी असणारा परदेशी ग्राहकांच्या यादीत भारत 2020 मध्ये 51व्या स्थानावर आहे.
  • पहिल्या क्रमांकावर युनायटेड किंगडम (यूके) असून भारत;  या देशांच्या पुढे आहे. 2020 मध्ये भारतातर्फे जमा असणारी एकूण रक्कमेत न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, हंगेरी, मॉरिशस, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका20,700 कोटी रुपये वाढ झाली असून ही वाढ मागील 13 वर्षांतील सर्वाधिक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • स्विस नॅशनल बँकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष: थॉमस जे. जॉर्डन
  • स्विस नॅशनल बँकेचे मुख्यालय: बर्न, ज्यूरिख

 

पुस्तके आणि लेखक

8. ‘दि नटमेगस् कर्स’ अमिताव घोष यांचे नवीन पुस्तक

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_110.1

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात लेखक अमिताव घोष यांनी ‘दि नटमेगस् कर्स: पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस’ [ ‘जायफळाचा शाप: संकटात ग्रहाचा दृष्टांत] नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे. जॉन मरे यांनी त्याचे प्रकाशन केले आहे.
  • हे पुस्तक जायफळाच्या कथेच्या माध्यमातून आज जगावर  असलेल्या वसाहतवादाच्या प्रभावाच्या इतिहासाविषयी माहिती देते. घोष यांच्या इतर काही उल्लेखनीय पुस्तकांमध्ये इबिसची त्रयी आणि ‘द ग्रेट डीरेंजमेंट’ यांचा समावेश आहे.

9. नवीन पटनाईक यांच्या हस्ते बिष्णुपदा सेठींचे ‘बियॉन्ड हिअर अँड अदर पोएम्स’ या पुस्तकाचे उद्घाटन

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_120.1

  • मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ सनदी अधिकारी बिष्णुपदा सेठी यांनी लिहिलेल्या ‘बियॉन्ड हिअर अँड अदर पोएम्स’ या कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागातील प्रधान सचिव सेठी यांनी ‘माय वर्ल्ड ऑफ वर्डस्’ आणि ‘बियॉन्ड फिलिंग्ज’ यासह अनेक कविता आणि इतर पुस्तके लिहिली आहेत.

 

क्रीडा बातम्या

10. 2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_130.1

  • नेदरलँड्स देशातील रेड बुलचा चालक मॅक्स व्हर्स्टापेनने 2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली आहे. ही शर्यत 2021 एफआयए फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची सातवी फेरी आहे. दुसर्‍या क्रमांकावर लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज) आणि तिसर्‍या क्रमांकावर सर्जिओ पेरेझ (मेक्सिको- रेड बुल) आहेत.

 

महत्वाचे दिवस

11. 20 जून: जागतिक निर्वासित लोकांचा दिवस

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_140.1

  • जगभरातील निर्वासितांच्या धैर्य व लढाऊ वृत्तीचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दर वर्षी 20 जून  रोजी संयुक्त राष्ट्रांमार्फात जागतिक निर्वासित दिवस पाळला जातो. नव्याने विथापित झालेल्या देशांमध्ये आपले आयुष्य पुन्हा उभारण्यासाठी  निर्वासितांप्रति विश्वास आणि सहानुभूती निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
  • 2021 ची संकल्पना: टूगेदर वी हिल, लर्न अँड शाईन” (एकत्र आपण निरोगी होऊ, शिकू आणि नव्याने प्रकाश निर्माण करू)”
  • 1951 साली झालेल्या निर्वासितांच्या अधिवेशनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 जून 2001 हा दिवस पाळला जातो. संयुक्त राष्ट्र आम सभेने डिसेंबर 2000 मध्ये अधिकृतपणे 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिवस म्हणून घोषीत केला.

 

12. 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_150.1

  • संयुक्त राष्ट्र संघ योगाभ्यासाच्या फायद्यांविषयी जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा करते. 2021 ची संकल्पना : “योगा फॉर वेल बीइंग” ( हितासाठी योग).
  • 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन स्थापनेच्या ठरावाच्या मसुद्याचा प्रस्ताव भारताने दिला आणि 175 सदस्यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला.
  • त्याचे सार्वत्रिक सहमती ओळखून, 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्र संघाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ठराव करून घोषणा केली.

 

13. वर्षातील सर्वात मोठा दिवस साजरा

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_160.1

  • पृथ्वीवरील सगळ्यात मोठा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय दिन 21 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 20 जून 2019 रोजी ठराव करून आंतरराष्ट्रीय सोलिस्टिस सेलिब्रेशनच्या आंतरराष्ट्रीय दिनाची घोषणा केली.
  • अयन दिन म्हणजे असा बिंदू जेव्हा सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जास्तीत जास्त दूर असतो.संपात दिन म्हणजे जेव्हा सूर्य विषुववृत्तापासून अधिक जवळ असतो.सूर्याचे भासमान भ्रमण उत्तर व दक्षिणेकडे होताना दिसते त्यामुळे वर्षात दोन अयन दिन येतात.
  • उन्हाळ्या जवळ येणाऱ्या अयन दिनास समर सॉलस्टीस ( 21 जून ) म्हणतात. जेव्हा दिवस सगळ्यात मोठा असतो. हिवाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या अयन दिनास विंटर सॉलस्टीस ( 21 डिसेंबर ) म्हणतात. जेव्हा दिवस सगळ्यात लहान असतो.

 

14. 21 जून: जागतिक संगीत दिन

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_170.1

  • दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा दिवस हौशी आणि व्यावसायिक संगीतकारांच्या सन्मानार्थ पाळला केला जातो. जागतिक संगीत दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट प्रत्येकाला विनामूल्य संगीत प्रदान करणे आणि हौशी संगीतकारांना त्यांचे कार्य जगासमोर दर्शविण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे.
  • जागतिक संगीत दिनाची सुरुवात फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लैंग आणि फ्रेंच संगीतकार, संगीत पत्रकार मॉरिस फ्लेरेट यांनी 1982 साली पॅरिसमध्ये केली.

 

निधन बातम्य

15. डीपीआयआयटी सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_180.1

  • उद्योग व अंतर्गत व्यापार विभाग (डीपीआयआयटी) चे सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांचे कोविड -1  संबंधित गुंतागुंतमुळे निधन झाले आहे. ऑगस्ट 2019 मध्ये डीपीआयआयटी सचिव म्हणून नियुक्त होण्यापूर्वी महापात्र यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते गुजरात कॅडरचे 1986 बॅचचे आयएएस अधिकारी होते, त्यांनी यापूर्वी वाणिज्य विभागात सहसचिव म्हणून काम पाहिले होते.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_190.1

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi | 20 and 21 June 2021 Important Current Affairs In Marathi_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.